हरबर्‍याच्या डाळीचे गुलाबजाम

0
132

हरबर्‍याच्या डाळीचे गुलाबजाम

साहित्य : १ मोठी वाटी हरबर्‍याची
डाळ, अर्धी वाटी खवा, अर्धी वाटी मैदा,
चिमूटभर खायचा सोडा, २ चमचे साजूक तूप,
५-६ वेलदोड्यांची पूड, पाकासाठी ३ वाट्या
साखर, ३ वाट्या पाणी.
कृति : साखर व पाणी एकत्र करून
एकतारी पाक करावा. पाकात वेलदोड्यांची
पूड घालावी. हरबर्‍याची डाळ शिजवून घ्यावी.
नंतर चाळणीवर ओतून पाणी निथळावे.
शिजलेली डाळ पुरणयंत्रावर वाटून घ्यावी.
खवा कुस्करून घ्यावा. मैद्याला तूप चोळून
घ्यावे.
नंतर हरबर्‍याची शिजवून वाटलेली
डाळ, मैदा, खवा व खायचा सोडा एकत्र
करून गोळा तयार करावा. नंतर ह्या मिश्रणाचे
गुलाबजामसारखे लांबट गोळे करून तळून
घ्यावेत. गडद रंगावर येईपर्यंत तळावे व
तळल्यावर लगेचच पाकात टाकावेत.