बुच पाण्यावर कसे तरंगते?
आपण बुचाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो पाण्यावर तरंगतो. ही गोष्ट आपल्याला शेकडो
वर्षांपूर्वीपासूनच माहिती होती. पूर्वी बुचाचे मोठे तुकडे बुडत्या माणसाला वाचवण्यासाठी वापरले
जात. पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते. बूच म्हणजे ओकवृक्षाचं साल. या सालीमध्ये ती
वाळल्यावर खूप हवा साठवण्याइतकी पोकळ जागा निर्माण झालेली असते. यामुळे बुचाचा
तुकडा पाण्यात टाकला की, या हवेच्या सहाय्यानं तरंगतो.
ओक वृक्ष स्पेन, पोर्तुगाल, अमेरिका व भारतात आढळतात. ते ४० फूट म्हणजे १०
मीटरपर्यंत उंच वाढतात. याचे खोड ३ ते ५ फूट (१ ते १ ॥ मीटर) व्यासाचे असते. साधारणपणे
प्रथम वीस वर्षांनी व नंतर दर नऊ वर्षांनी ओक वृक्षाचे साल काढले जाते. हे चक्र झाड १०० ते
१२५ वर्षांचे होईपर्यंत चालते.
बुचाचे तुकडे आज रबरी बुचांमुळे व्यवहारात दिसत नसले, तरी क्रिकेट व हॉकीच्या चेंडूंचा
गाभा आणि ध्वनीनियंत्रित खोल्या यात वापरण्यात येतात.