महाशिवरात्री निमित्त केदारनाथ मंदिर दर्शन देखाव्याचे उद्घाटन

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने महावीरनगर, सावेडी येथे संस्थेच्या
सेवाकेंद्रात केदारनाथ मंदिर दर्शन देखाव्याचे आयोजन केले आहे. या देखाव्याचे उद्घाटन राजयोगिनी
ब्रह्माकुमारी राजेश्वरी दीदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी बी. के. सुप्रभा दीदी, बी. के.
डॉ. दीपक हरके, बी के व्यंकटेश, बी. के. दीपक जोध यांचेसह साधक उपस्थित होते. हा देखावा २७
फेब्रुवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पहावयास खुला असणार आहे.

सुफी साधू-संतांमुळे समता बंधू भावाचा विचार सर्व धर्मियांच्या मनात जागवला

नगर – भारताची अडीच तीन हजार वर्षांची समतेची, एकोपाची, बंधू – भावाची इतकी चांगली परंपरा आहे की या देशाचा आदर जवळपास सर्व देशांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या एकोप्याचे वातावरण कधी बिघडू शकणार नाही या देशातील संतांनी प्रथम कोणाचा आदर्श घेतला असेल तर बाहेरून आलेल्या सुफी संतांचा आदर्श घेतला. त्यामुळे समता,बंधुभावाचा विचार सर्व धर्मीयांच्या मनात जागविला असे विचार परभणी येथील हभप धर्मकीर्ती महाराज यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर येथील सावित्री फातिमा सद्भावना मंच आयोजित सर्वधर्मीय संमेलनात हभप धर्मकीर्ती महाराजांनी राजकारणी लोकांनी जे धर्मयुद्ध सुरू करून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले त्या विषयावर प्रभावीपणे मत मांडले.
मंचाच्यावतीने सर्व धर्मीय सदभावना संमेलनाचे सैनिकलॉन येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, कीर्तनकार पारनेर येथील ह.भ.प. सोपानकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, परभणी येथील ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज सावंत, पारनेर येथील भंते बाळासाहेब पातारे, हभप भारत महाराज
जाधव पंढरपूर, जळगाव येथील मौलाना समी, प्रा.सौ. स्मिताताई पानसरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे,
बाळासाहेब मिसाळ, मुकुंदराव सोनटक्के, अमीन शेख आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंचाचे अध्यक्ष
अ‍ॅड. संभाजी बोरुडे होते. सदर प्रसंगी सत्यपाल महाराज यांना राज्यपातळीच्या सद्भावना पुरस्काराने
शाल सन्मानचिन्ह व ११ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
हभप धर्मकीर्ती महाराज पुढे म्हणाले सुफींने अस्पृश्यांना जवळ केले, वर्षे व्यवस्था जातीव्यवस्था यावर प्रकाश टाकीत सर्व
धर्मीयांना सामाजिक एकतेचा संदेश दिला. भागवत भक्ती धर्मा अगोदर सुफींचे आगमन होते.
प्रचंड जातिवाद अस्पृश्यता परिस्थिती होती. अशावेळी सुफी साधुसतांनी समता बंधू भावनेचा
विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत केला. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हे विठ्ठलाला
मानतात तुकोबाराया हे सुफींना मानतात त्यांचे अभंगातून त्यांनी एक ओळ सांगितली
त्याची लोककथा सांगून तुकाराम महाराजांची दिंडी एका मस्जिद मधे थांबली असता तेथील
मुस्लिमांनी तुकाराम महाराजांना मस्जिदीमध्ये कीर्तन करण्यास सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराज
म्हणाले. अल्ला देवे, अल्ला दिलाये, अल्ला खिलाये अशी ओवी सांगितली हे एकेश्वर सांगणारे महत्त्व त्यांनी
विशद केले.
खासदार निलेश लंके म्हणाले की समाजामध्ये द्वेषाचे प्रमाण दिवसेेंदिवस वाढत चालले आहे.
आजच्या परिस्थितीत सद्भावनेच्या कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. छत्रपतींच्या हिंदुत्वाची
आज खरी गरज आहे. आज सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या संमेलनाची वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची
आवश्यकता आहे. आजच्या संमेलनाचे हेतू सर्वदूर घराघरात पोहोचायला हवे. त्यासाठी त्यांनीही असे
संमेलन भविष्यात आयोजित करण्याचे माणस केले. प्रास्ताविकात डॉ. रफिक सय्यद म्हणाले की
भारतीय समाज अठरापगड जाती धर्मांचा समाज आहे. अर्थातच या समाजामध्ये परस्पर सदभावना सलोखा
बंधुभाव अनिवार्य व परम महत्त्वाचा आहे. त्याशिवाय देशात शांती सुख-समृद्धी नांदणार नाही. सुदैवाने
भारतासह महाराष्ट्राला व अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याला सदभावनेचा महान वारसा लाभला
आहे. येथील सुफी हजरत शाह शरीफ बाबांविषयी मालोजीराजे भोसले यांना परम आदर होता. म्हणूनच
त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफजी अशी ठेवली होती. आजही शाहशरीफ बाब
हे भोसले घराण्याचे श्रद्धास्थान आहे. श्रीगोंदाचे सुफी शेख मोहम्मद (रह.) संत शेख महंमद महाराज व संत
तुकाराम महाराजांचे घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा आणि पंचकोशीतील
लोकांचे श्रद्धास्थान आहे. सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख या शहरातील लेरा ब्रुस हायस्कूलच्या
विद्यार्थिनी आहेत. हाच परस्पर सदभावनेचा बंधुत्वाचा व प्रेमाचा वारसा जोपासण्यासाठी व आणखी वृद्धींगत
करण्यासाठी सर्व धर्मीय सद्भावना संमेलन आयोजित केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्यपाल महाराज म्हणाले की आज प्रत्येकाला जागरूक व्हावे लागेल. समाजातील
सदभावनेसाठी काम करणारे लोकांनवर हल्ले होतात. कारण सदभावनेसाठी काम करणार्‍यांच्या विचारांना
त्यांना मारायचे आहे. पण विचार मरत नाही, ते अशा सद्भावना कार्यक्रमाद्वारे इतरांमध्ये पसरत असतात.
माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाद्वारे तयार होत
आहे असे सांगितले. जळगावहून आलेले मौलाना समी म्हणाले की युवा पिढीला दिशाभूल करण्याचं काम
सध्या सुरू आहे. त्या युवा पिढीला आपल्याला सत्यमार्ग दाखवावा लागेल. धर्म व इतिहासाचे
विकृतीकरण पण थांबविण्याची आज अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले सदभावना मंच हे सर्वांना
एकत्र आणण्याचे काम करीत आहे. अस्वस्थ वर्तमान काळात राजरोसपणे धर्माचा आणि
सत्तेचा वापर करून दहशत निर्माण करून जाती जाती तेढ निर्माण केली जात आहे. अशा वातावरणात
न घाबरता हे संमेलन ठेवल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देत त्या म्हणाल्या प्रश्न संकटे आव्हानांची
माहिती आहे, ती परतून लावण्यासाठी संघर्ष करून प्रश्न काय आहे त्याची वेळीच उत्तरे दिली तर ते
सुटतात, त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. सावित्री फातेमा सदभावना मंच यामधील एका शब्दाला अनेक
जण विरोध करताना दिसतात सावित्रीच्या पुढे जर बहिणाबाई जनाबाई असे असते तर गजारावर झाला
नसता, फातेमाला कथोकल्पित पात्र आहे हे कोणीतरी आणल आहे असा कांगावा केला जातो. बहुजनांचा
इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. धर्मसत्ता राजसत्ता हे काम करताना दिसत आहे. खरा इतिहास
लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या माणसाच्या वतीने सर्वांचे आहे. फातिमा ही होतीच त्याचा इतिहास
आहे, पुरावा आहे. सावित्रीमाईंनी महात्मा फुले यांना लिहिलेले पत्र आहे ते आजही पुरावा म्हणुन आहे.
सावित्रीबाई या आजारी असताना शाळेची जबाबदारी फातेमा यांच्यावर सोपवण्यासाठी महात्मा फुलेंना पत्र
लिहिले होते. ती जबाबदारी फातेमा यांनी पार पाडली असे असताना त्यांचें नाव कथाकल्पित आहे असे
म्हणणे चुकीचे आहे असे सांगितले. भंते बाळासाहेब पातोरे म्हणाले की राज्यघटना
उध्वस्त करण्याचा काम सध्या होत आहे. त्याला वाचविण्याची गरज असून संविधानाने दिलेल्या
अधिकाराची लोकांना जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून लोक सरकारला जवाब विचारू शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड. संभाजी बोरुडे म्हणाले की संविधानाला अपेक्षित असणार्‍या
भारताच्या निर्माणसाठी सद्भावना मंच प्रयत्नशील आहे. सदभावना असणारा हा जिल्हा असून येथे
शाहशरीफ दर्गा आहे. सावित्री फातिमाची शाळा आहे. अशा जिल्ह्यात सदभावनेसाठी काम करण्याची वेळ
का आली, यावर विचार मंथन करावे लागेल. मानवता धर्म आज खतर्‍यात आहे. जातीला महत्त्व दिले जात
आहे. मूठभर लोक हे कार्य करत आहे व अडाणी व इतिहास भुगोल माहिती नसणारी माणसं त्यांच्या
मागे जात आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे. आजच्या या शिक्षित समाजात अशा भेदभाव करणारी प्रवृत्ती
फोपावत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. व भविष्यात आम्ही सतत या मंचाद्वारे सद्भावनेचे कार्य चालू ठेवु
अशी त्यांनी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एडवोकेट संभाजी बोरुडे, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, संजय झिंजे, युनूसभाई तांबटकर, मुबीन खान, मेजर संजय वाघ, प्रतिक बारसे, फिरोज शेख, राजू शेख, मुकुंदराव सोनटक्के, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, मुस्ताक सर तांबटकर, अब्दुल रहीम साहब, बापू चंदनशिवे, कादीर सर, जहीर सय्यद, मेजर रफीक, अश्फाक शेख, मुनाफ भाई, अ‍ॅड.आरिफ भाई, नदीम भाई, मुश्ताक भाई आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी केले. तर प्रतिक बारसे यांनी आभार मानले.

अहमदनगर बागवान जमात ट्रस्टच्या अध्यक्षपदी वसीम बागवान यांची निवड

अहमदनगर बागवान जमात ट्रस्टच्या अध्यक्षपदी वसीम बागवान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा
सत्कार करण्यात आला.

नगर – अहमदनगर बागवान जमात ट्रस्टच्या
अध्यक्षपदी वसीम हसन बागवान, उपाध्यक्षपदी
एजाज बागवान व सदस्यपदी जाफर बागवान, रउफ
बागवान, आसिफ बागवान, हाजी तनवीर बागवान,
तौसीफ बागवान, इमरान बागवान, जुनेद बागवान
यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांचा
सत्कार करताना पप्पू भाई वॉच मेकर समवेत जावेद
शेख, भैय्या वॉच मेकर, शाहरुख पठाण, फइम
शेख, समद शेख, इमरान शेख, इमरान खान, एफ
एस इमरान, साबीर शेख, सोनू शेख, शहबाज शेख,
समद शेख, रजा अली आदी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष वसीम हसन बागवान म्हणाले
की, ट्रस्टच्या वतीने एका मताने निवडून दिल्याने
आम्ही प्रथम जमातची संपूर्ण एकत्रित यादी तयार
करून डायरी बनवण्यात येणार व जमातचे जे पूर्वजांनी
ठेवलेल्या ज्या मिळकती आहे. त्याची चांगल्या प्रकारे
विकसित केले जाणार आहे. जमातमध्ये वधु-वर
मेळावा घेऊन लवकरच ११ सामूहिक लग्न कार्याची
सुरुवात करण्यात येईल आहे. जमात खाना विकसित
करुन सदरील जमातचे उत्पन्न वाढेल व चांगल्या
प्रकारे जमातची प्रगती होईल. रमजान महिन्यात
जकातची रक्कम जमा करून गोरगरीब विधवांना
मदत करणे तसेच रुग्णालयात औषधोपचारासाठी
मदत होईल. या उद्देशाने जकातची रक्कम बागवान
जमातमध्ये जमा करावी तसेच बागवान जमातच्या
नावाने (आखरी सफर) गाडी उपलब्ध करण्यात
येणार आहे व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली
जाईल व सर्व जमातच्या लोकांनी एकजूट होऊन
जमातला पूर्णपणे बळकट करण्याचा प्रयत्न करावा,
असे आवाहन त्यांनी केले.

अहमदनगर भूलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल एरंडे व सचिवपदी डॉ.सचिन उदमले

नगर – अहमदनगर भूलतज्ञ संघटना अहिल्यानगरच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल एरंडे व सचिवपदी डॉ. सचिन उदमले
यांची निवड करण्यात आली. अहिल्यानगर येथे भूलतज्ञ संघटनेच्या झालेल्या पदग्रहण समारंभात भारतीय भूलतज्ञ संघटनेचे
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बालावेंकट सुब्रमण्यीन (कोयम्बटूर), महाराष्ट्र भूलतज्ञ संघटनेचे सचिव डॉ. राजेश तगडपल्ले, महाराष्ट्र
कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ व आय.एम.ए. अहिल्यानगरचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मिश्रा
यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. याप्रसंगी नीमा
करकमकर, नगर शहर व परिसरातील डॉटर्स उपस्थित होते.
उपाध्यक्षपदी डॉ. अश्विनी शिंदे, सहसचिव डॉ.
अंजली राऊत, खजिनदार डॉ. विनय छल्लानी यांची
निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. सुभाष तूवर ह्यांनी
मागील वर्षी संघटनेने वतीने राबविण्यात आलेल्या विविध
उपक्रमांची माहिती देत ताळमेळ प्रस्तुत केले.
याप्रसंगी डॉ. बालावेंकट मार्गदर्शन करताना
म्हणाले की, जागतिक पातळीवर आपन जे काम ग्रामीण
भागात मोठ्या प्रमाणात करत आहोत. त्या कामाचे
’पेपर प्रेझेंटेशन’ करायला हवे. प्रत्येकाने वेगवेगळ्या
परिसंवादात, परिषदमध्ये भाग घेऊन नवीन नवीन
तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे व त्याचा उपयोग
आपल्या आपल्या रूग्णांना करून द्यायला हवा. आपण
केलेल्या कामाचे डॉयुमेंटेशन आपल्याजवळ असायला
हवे. रिसर्च मध्ये योगदान देऊन भारताचे नाव जागतिक
पातळीवर नेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करण्याचे
आव्हान करत भुलतज्ञांनी ऑपरेशन करताना व त्यानंतर
देखील रुग्णाची काळजी कशी
घेऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन
केले. दिवंगत भूलतज्ञ डॉ.
करमकर यांनी केलेल्या कामांची
माहिती त्यांनी यावेळी दिली.
डॉ. श्रीकांत मोने यांनी डॉ.
करकमकर यांच्या आठवणींना
उजाळा दिला. त्यांच्या
स्मृतीप्रीत्यर्थ नवीन भूलतज्ञ ज्यांनी
परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले
आहे त्यांना मेडल व सर्टिफिकेट
देऊन सन्मानित करण्यात आले.
नांदेड येथील महाराष्ट्र राज्य भूलतज्ञ संघटनेचे
सचिव डॉ. राजेश तगडपल्ले यांनी नवीन कार्यकारिणीला
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. राज्य
कार्यकारिणीकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन
त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. दिपाली फाळके,
जी.सी. मेंबर डॉ. सचिन लवांडे, महाराष्ट्र कार्यकारिणीचे
माजी अध्यक्ष. डॉ मिलिंद पोळ यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन डॉ. अंजली राऊत व डॉ. वैष्णवी लोहकरे
यांनी केले. अहमदनगर भूलतज्ञ संघटनेचे सचिव डॉ.
सचिन उदमले आभार यांनी मानले.

राज्यस्तरीय वन-डे सिरीज स्पर्धेत एस.के क्रिकेट संघाने पटकविले विजेतेपद

नगर – वाकोडी येथील मैदानावर साईदीप हिरो क्रिकेट अकॅडमी आयोजित १४ वर्षा खालील राज्यस्तरीय वन-डे
सिरीज स्पर्धा उत्साहात झाली असून, या स्पर्धेचे विजेतेपद एस.के क्रिकेट अकॅडमी संघाने
पटकवले तर उपविजेतेपद समर्थ नेट संघाला मिळाले, तिसरे विजेतेपद टॉपर्स क्रिकेट अकॅडमी
तर चौथे विजेतेपद अजय शितोळे क्रिकेट संघाला मिळाले या स्पर्धेमध्ये राज्यभरातील खेळाडू सहभागी होत असून
खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते स्पर्धे च्या माध्यमिक खेळाडू घडला जातो शालेय जीवनामध्येच
टर्फ विकेट वर खेळण्याची संधी व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगला खेळाडू निर्माण होईल असे प्रतिपादन
संदीप घोडके यांनी केले. विजेतेपद संघाला प्रदान करताना देविका देशमुख, डॉ.मुग्धा तनवर, रमा पंजाबी, शीतल इथापे,
स्मिता फुले, संदीप घोडके, संदीप आडोळे, डॉ.हर्षवर्धन तनवर, सम्राट देशमुख, प्रीतम पवार, रामकृष्ण इथापे,
राहुल गोरे, अनिल शिंदे, चैतन्य निंबाळकर, ओंकार झिपुर्डे, इमरान शेख, कृष्णा गोकुळ, शशांक जोशी आदी
उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या खेळाचे धडे घेतल्यास चांगला विद्यार्थी निर्माण
होत असतो, क्रिकेट खेळामध्ये सातत्य ठेवत मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येत असते,
वारंवार स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे, त्या माध्यमातून खेळाडू आपले प्रदर्शन करीत
असतो आणि त्यातून चुकांचे निरसन देखील केले जाते, स्पर्धा ही खेळाडूंच्या जीवनाला
कलाटणी देणारी असते असे मत देविका देशमुख यांनी व्यक्त केले.

स्पर्धेमधील ’मॅन ऑफ
द सिरीज’ देवांशी घोडके, ’मॅन
ऑफ द मॅच’ शौर्य देशमुख,
’बेस्ट बॅटमॅन’ अनिकेत शिनारे,
’बेस्ट बॉलर’ अभय कोतकर,
’बेस्ट बिल्डर’ शौनक पंजाबी यांना पारितोषकांनी
सन्मानित करण्यात आले. अशी माहिती संदीप आडोळे
यांनी दिली.
या स्पर्धेचे नियोजन ऋषिकेश सुंबे, महेश गागरे,
साहिल सय्यद, अजिंय बिजा, विशाल शिंदे, प्रशांत
शेरकर, अरीफ शेख यांनी केले होते.

विनाअनुदानित ते अनुदानित बदली मान्यता प्रस्ताव आता मंत्रालयात न देता शिक्षणाधिकारी उपसंचालकांना द्यावेत

उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय : रुपालीताई कुरुमकर यांची माहिती

नगर – माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विनाअनुदानित
अंशतः अनुदानित शाळा पद अथवा तुकडी मधून अनुदानित तुकडीतील रिक्त पदावर बदलीचे प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवण्याचे निर्देश २९ एप्रिल २०२४ व ३ ऑटोबर २०२४ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार होते. परंतु महाराष्ट्र शाळा कर्मचारी सेवाशर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ मधील बदली संदर्भात नियम ४१-अ चे उल्लंघन होते. त्यामुळे उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांच्या आदेशान्वये विनाअनुदानित ते अनुदानित बदली मान्यता प्रस्ताव शिक्षणाधिकारी, उपसंचालकांना द्यावेत अशी माहिती शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी कृती समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा रूपालीताई कुरुमकर यांनी दिली. विनाअनुदानित पद, तुकडी वरून अनुदानित पद, तुकडीवर
बदली करण्याचा एक चांगला शासन निर्णय होता, सदर निर्णयाच्या अंमलबजावणी ही ८ जून २०२० अधिसूचना व १ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार होत होती. या निर्णयामुळे विनाअनुदानित पात्र शिक्षकांना अनुदानित पद तुकडीवरून बदली जाण्याचा लाभ मिळत होता. परंतु शासनाने १ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे उपरोक्त शासन निर्णयाला स्थगिती दिली. सदर शासन निर्णयामुळे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली १९८१ मधील नियम ४१-अ स्थगित करण्यात आले होते. म्हणून सदरचा शासन निर्णय फ्रेंडस् सोशल सर्कल विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि
इतर या प्रकरणात अंशतः रद्द करण्यात आले. तद्नंतर महाराष्ट्र शासनाने १९/४/२०२४ व ३/६/२०२४ शासन निर्णय
पारित करून विनाअनुदानित अंशतः अनुदानित वरून अनुदानित अंशतः अनुदानित पदावर बदली संदर्भातील सर्व प्रकरणे विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना शासन स्तरावर निर्णयार्थ मंत्रालयात सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी फ्रेंड सोशल सर्कल विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर या प्रकरणात २९-०४/२०२४ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.ला स्थगिती देण्यात आली त्यामुळे शासनस्तरावर बदली संदर्भात मान्यतेचे निर्णय घेता
येत नाही सदर संदर्भातील अनेक प्रस्ताव मान्यतेस्तव प्रलंबित आहे म्हणून रुपाली अरविंद कुरुमकर
व मानसी केळकर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल केली. सदर
याचिका उच्च न्यायालयाने असे अभिनिर्धारित केले की, शासनाने २९/४/२०२४ रोजी पुन्हा शासन
निर्णय जाहीर करणे म्हणजे उच्च न्यायालय निर्णयाचा अवमान करण्याचे स्पष्टपणे प्रयत्न आहे आणि तसेच महाराष्ट्र
खाजगी शाळातील कर्मचारी नियमावली १९८१ नियमात सुधारणा करण्याआधीच राज्य सरकारची भूमिका अत्यंत आक्षेपार्ह आहे. तसेच उपरोक्त याचिकेत मान्य न्यायालयाने विनाअनुदानित ते अनुदानित बदली करून मान्यता देण्याच्या प्रस्तावावर ४ आठवड्यात निर्णय देण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक पुणे यांना दिले आहे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित अंशतः अनुदानित वरून अनुदानित वर बदली मान्यता प्रस्ताव हा शिक्षणाधिकारी उपसंचालक व शिक्षणाधिकार्‍यांना देण्याचा निर्णय शिक्षक भारती संघटनेच्या वतीने रूपालीताई कुरुमकर यांनी केला.
त्याबद्दल त्यांचे शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड, शिक्षक भरती संघटनेचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, राहुल पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, उच्च माध्यमिक विभागाची अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामराव काळे, उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल
चंदनशिवे, तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात, संजय भालेराव, नानासाहेब खराडे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, मफीज इनामदार, कल्पना चौधरी, अकील फकीर, बाबाजी लाळगे, संपत वाळके, गणपत धुमाळ, विजय पांडे, प्रवीण मालुंजकर, अमोल तळेकर, संतोष नवले, श्याम जगताप आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

काँग्रेसचे किरण काळे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन

समर्थकांसह शिवसेना उबाठात केला प्रवेश

मुंबई – अहिल्यानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला
आहे. रविवारी दुपारी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल दिली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, किरण काळें सारखे लढवय्ये नेतृत्व आता शिवसेनेमध्ये आले आहे. त्यांचा प्रवेश म्हणजे
प्रवाहाच्या विरुद्ध येणे नव्हे तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचे काम ते करत आहेत
असे म्हणत ठाकरे यांनी काळे यांचे स्वागत केले. यावेळी प्रवक्ते खा. संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, शिवसेना संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, रावजी
नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, दिलदारसिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, सुरज ठोकळ, मनीष गुगळे, ऋतुराज आमले, जेम्स आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ,
दत्तात्रय गोसंके, मुन्ना भिंगारदिवे, अमित लद्दा आदी उपस्थित होते. यावेळी विलास उबाळे, आकाश
आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, दत्ता गायकवाड, किशोर कोतकर, विनोद दिवटे, मयूर भिंगारदिवे, आकाश डहाने, राकेश बोरुडे, गणेश भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, अक्षय साळवे,
कुणाल कुजागरे, वैभव दिवटे, लकी काळे, सुदर्शन पवार, दर्शन आल्हाट, अनिकेत गायकवाड,
सुरज बोर्डे, आदित्य साळवे, ओंकार काळे, रोहित वाघमारे, श्रीकांत फुलारी, सनी चव्हाण, जयराम
आखाडे, बाबासाहेब वैरागळ, दीपक काकडे, देवराम शिंदे, राजेंद्र तरटे, भगवान शेंडे, विठ्ठल
अनारसे, बबन ससाने, संतोष वाघमारे, गणपत वाघमारे, अनिल कारले, गोरख कारले, रोहिदास
भालेराव, बाळासाहेब अनारसे, गौतम शेंगदाणे, पंडित झेंडे, गोरख माने, विनोद शिरसाठ, लखन कापुरे, ईश्वर
पवार, अर्जुन जाधव, राहुल साळवे, मछिंद्र पांढरे, सचिन लोंढे, सुरेश विधाते, वैभव खरात, कुणाल भालेराव, प्रशांत कदम, संदेश काळे, अमोल माळी, अंकुश गवळी, अक्षय शिरसाठ, मनोज उबाळे, पांडुरंग हजारे,
दत्तात्रय कळमकर, सचिन वाघमारे, अमर डाके, संतोष गरुडकर, गणेश गवळी आदींसह
शहर काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्यकारणी, विविध फ्रंटल, आघाड्या, सेलचे पदाधिकारी,
कार्यकर्ते, समर्थक यांनी प्रवेश केला.

नगर जिल्ह्यात गुंडगिरी पद्धतीने पोलिस व महसूल यंत्रणेचा गैरवापर

खासदार नीलेश लंके यांचा आरोप नगर – गुंडगिरी पध्दतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधार्‍यांकडून करण्यात येत
असल्याचे सांगत नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके यांनी
संताप व्यक्त केला. गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता
सकाळी सात वाजता बुर्‍हाणनगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय
उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेउन राजकीय
आकसातून अशी कारवाई करणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ते
पत्रकारांशी बोलत होते. खा. लंके म्हणाले, जिल्ह्यातील नागरीकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी त्यांचे अतिक्रमण सिध्द करून ते पाडण्याचा कट जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रचण्यात येत आहे. जो माणूस कायद्याच्या चौकटीत
काम करतो, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत हे बुर्‍हाणनगर येथील देवीचे भक्त
आहेत. तिथे त्यांचा स्वतःचा ले-आउट असताना, सर्व कर भरण्यात आलेले असताना तसेच त्यांनी त्यांच्या
जागेतून ग्रामस्थांसाठी रस्तेही काढून देण्यात आलेले आहेत असे असताना सकाळी गुंडाराज पध्दतीने शंभर
दिडशे पोलीस तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून त्या ठिकाणी आले व सर्व जमीनदोस्त करण्यात
आल्याचे लंके यांनी सांगितले. एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो हे सांगायचे आणि दुसरीकडे २१०० वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंदर्भात आपण जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून
तक्रार केल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे

नगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून
चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत. लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे
जमीनदोस्त करण्यात आले. ज्या अधिकार्‍यांनी राजकीय आकसापोटी या कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर
कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खा. लंके यांनी केली.

विरोधकांना टार्गेट केले जात आहे

ज्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणूकीत सत्ताधार्‍यांचे काम केले नाही अशा लोकांना ठरवून टार्गेट केले जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमीनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर आम्हाला ठोस पाउले उचलावी लागणार आहेत. वेगळ्या पध्दतीने समाजाला
वेठीस धरले जाणार असेल तर त्यांना धडा शिकविण्याची ताकद आमच्यात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील.

तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल महानगरपालिकेतील कारनामे बाहेर काढलेतर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल. महापालिका व महसूल प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई
करू नये. अधिकार्‍यांना फोन केल्यावर ते आमच्यावर दबाव असल्याचे सांगतात. अधिकार्‍यांवर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांना उध्वस्त करणार का? असा सवाल लंके यांनी केला.

जल जीवन मिशनमध्ये मोठा घोटाळा
ठराविक अधिकार्‍याला एखाद्या पदावर बसविण्याचा घाट घातला जातो कारण त्यामागे आर्थिक
हितसबंध असतात. जल जीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचारावर आपण आवाज उठविला आहे. त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराचे पुरावे, व्हिडीओ सादर केले आहेत.
आएएस दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली
आहे. हा नगर जिल्ह्यातील घोटाळा नसून राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. एखादी पाणी योजना
झाल्यानंतर पुन्हा तीस वर्षे पाणी योजनेसाठी निधी मंजुर होत नाही. कागदोपत्री किंवा निकृष्ट दर्जाच्या या योजना
होणार असतील, अर्धा फुटांवर पाईप गाडले जाणार असतील, ज्या कंपनीचे पाईप घेण्यासाठी मान्यता नाही
त्या कंपनीचे पाईप टाकले जाणार असतील, योजना पुर्णत्वास जाणार नसेल तर हे सर्व काही चुकीचे आहे.

सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे यश

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे समर्थ विद्या मंदिर दासनवमी उत्सवनिमित्त आयोजित निबंध
स्पर्धेत बक्षीस मिळवणारे सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे विद्यार्थी.

नगर – श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे समर्थ विद्यामंदिर आयोजित दासनवमी उत्सवनिमित्त ६ फेब्रुवारी रोजी घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील कुमारी कशिश आमिन शेख (इयत्ता ७ वी) हिचा निबंध
स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला तसेच इयत्ता पाचवी ते सातवी गट मुले यांचा सूर्य नमस्कार स्पर्धेत
प्रथम क्रमांक आला. कुमारी वैष्णवी अंकुश सोनवणे (इयत्ता नववी) हिचा हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक
आला तसेच ८ वी ते१० वी गटातून मुलांचा सूर्यनमस्कार स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. श्रीमती मनीषा नरेंद्र बोर्डे कदम यांचा
खुल्या गटातून मराठी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे
सचिव गाडीलकर सर तसेच सर्व पदाधिकारी व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड
सर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग
यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले

दादा चौधरी विद्यालयातील १९९३-९४ च्या दहावीच्या मित्र मंडळींच्या हस्ते कुबेर गणपतीची महाआरती

अहिल्यानगर-चौपाटी कारंजा मित्र मंडळाचा साप्ताहिक आरतीचा उपक्रमाने हिंदू समाज जोडला

नगर – चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्यावतीने दर गुरुवारी चौपाटी कारंजा येथील दत्त मंदिरात होणारी साप्ताहिक
आरती मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असल्याने दिल्लीगेट येथील विश्व हिंदू परीषद कार्यालय सातभाई गणपती मंदिरात श्री कुबेर गणेश मंदिरात मंगळवारी करण्यात येते. यावेळेस कुबेर गणपतीची महाआरती दादा चौधरी
विद्यालयातील १९९३-९४ च्या दहावीच्या बॅचमधील सर्व मित्र मंडळींच्या हस्ते करण्यात आली.
दहावीच्या बॅचचे उदय जोशी, अमित मुनोत, संतोष संबळे, सुरेंद्र सोनवणे, सचिन अग्रवाल,
विजय खांडेकर, जयंत वाघ यासह मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते. मंडळाने ८० व्या आरतीला भिक्षेकरांना आरतीचा
सन्मान दिला. त्यावेळेसच विश्व हिंदू परिषदेचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. भिक्षेकरी देवाच्या
दारात बसतात. ते देखील देवाचे भक्त आहेत. परंतु त्यांना आपुलकीने व आपलेपणाने आरतीचा सन्मान
देऊन मंडळाने सामाजिक समरसतेचे दर्शन घडविले. महेश कुलकर्णी म्हणाले १०९ आठवड्यांपासून
साप्ताहिक आरतीचा उपक्रम चौपाटी कारंजा येथील श्री दत्त मंदिरात सुरू आहे. मंदिराचा जिर्णोद्धार सुरू झाला असल्याने
विश्व हिंदू परिषदेच्या श्री कुबेर गणेश मंदिरात दर मंगळवारी साप्ताहिक आरतीचा प्रारंभ करण्यात आला आहे. आत्तापर्यंत चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्या या उपक्रमात ३०० कुटुंबांनी सहभाग घेतला आहे. हिंदू समाजावर आरतीचे
संस्कार व्हावेत. तसेच हिंदू समाज एकत्रीकरण व्हावा यासाठी हा उपक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात
येत आहे. या साप्ताहिक आरतीला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दादा चौधरी विद्यालयातील १९९३-९४ च्या दहावीच्या बॅचमधील सर्वांनीही या उपक्रमाचे कौतुक
केले. या माध्यमातून समाज एकत्र जोडला जात आहे. असे उपक्रम सर्व भागात सुरू होवोत असे सांगितल