काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला मारले जोडे, शेण फासून तिरडी काढत आंदोलन करीत नोंदवला निषेध
कॉग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी जगद्रू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा बस स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी घोषणा देत तीव्र शब्दात निषेध करून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करत तिरडी काढून त्यांचा निषेध नोंदवला.
नगर – काँग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी जगदुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी बस स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घोषणा देत तीव्र शब्दात निषेध करुन विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी शिष्यांकडून
बुरुडगांव रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. महाराजांचा अपमान करणाऱ्या वडेट्टीवारांनी माफी मागावी, अन्यथा भक्तांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
तसेच आंदोलनकर्त्यांनी आ. संग्राम जगताप यांची भेट घेतली. यावेळी आ. जगताप बोलतांना म्हणाले की, वडेट्टीवार यांनी नरेंद्रचार्य महाराज यांच्या
बद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला वोट जिहाद झाला. त्यावेळेला या लोकांची तोड बंद होती. त्या वेळेला फतवे निघत होते. त्यावेळेला हे काही बोलले नाहीत, मात्र आता या लोकांच्या मनामध्ये भगवा ध्वज हा सलतो आहे. म्हणून हिंदू धर्माच्या विरोधात हे लोक बोलत आहेत आणि काही संघटना हे काम करत आहेत असे आ. जगताप यांनी म्हटले आहे.