नगर – राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधून रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने मेहर इंग्लिश स्कूल,
आनंदी बाजार, अहिल्यानगर येथे स्वसंरक्षण जागरूकता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.
यावेळी ज्युदो, कुस्ती, लाठी काठी या खेळात श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू सौ. अंजली देवकरय्वल्लाकट्टी यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व, आपत्कालीन परिस्थितीत कसे सामोरे जायचे, आत्मरक्षणासाठी आवश्यक तंत्रे व मूलभूत उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेत प्रात्यक्षिकांसह विविध स्वसंरक्षण तंत्रे शिकली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. या कार्यक्रमाला रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा रोटरीयन मीनल बोरा, सचिव रोटरीयन स्वाती गुंदेचा, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुरिता झगडे, विभावरी तांबडे, गीता गिल्डा, डॉ. अश्लेषा भांडारकर तसेच लबच्या सदस्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाविषयी बोलताना मिनल बोरा यांनी सांगितले की, आजच्या काळात स्वसंरक्षणाचे शिक्षण ही काळाची गरज आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षणाची जागरूकता निर्माण करून त्यांना सक्षम बनवण्याचा आमचा उद्देश आहे. लब सामाजिक बांधिलकी जोपासत अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचे व विद्यार्थ्यांचे
सशक्तीकरण करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे. रोटरीने सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याची परंपरा कायम ठेवत, महिलांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम यशस्वीपणे पार
पाडला





