उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे प्रतिपादन; अहिल्यानगर महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नगर – महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना एकत्रित येण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते, त्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत असते, व आपल्या बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळत असतो. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकोप्याचे दर्शन घडले जाते, या धकाधकीच्या जीवनामध्ये अधिकारी कर्मचारी अक्षरशः आपल्या
आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात, व्यायामाच्या माध्यमातून आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते, व
आपल्या दैनंदिन कामकाज करत असताना उत्साह व आनंददायी दिवस जात असतो तरी प्रत्येकाने व्यायामाकडे वळावे असे प्रतिपादन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विजयकुमार मुंडे, उपयुक्त प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, उपायुक्त निखिल फराटे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, लेखाधिकारी डॉटर सचिन धस, क्रीडा अधिकारी फिलिप्स ह्विन्सेंट, संगणक विभाग प्रमुख ए.डी.साळी, अनिल लोंढे आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेत आपल्या आवडीच्या खेळामध्ये चांगले प्रदर्शन दाखविण्याचे काम कर्मचार्यांनी केले. कबड्डी स्पर्धेतील विजेता संघ प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी उपविजेता संघ, शिक्षण विभाग मनपा, क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ मुख्य प्रशासकीय कार्यालय मनपा, उपविजेता संघ प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी, याच बरोबर १०० मीटर, २०० मीटर, गोळा फेक, रिले, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण झाले
असल्याची माहिती क्रीडा अधिकारी फिलिप्स ह्विन्सेंट यांनी दिली. सूत्रसंचालन अनिल लोखंडे यांनी केले. तर मेहर लहारे यांनी आभार मानले.





