नगर – येथील लेखिका डॉ. सुधा कांकरिया यांचे ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी होत आहे. मानकन्हैय्या ट्रस्ट, आयोजित कार्यक्रम सकाळी १० वाजता पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. लोकशिक्षण आणि जनजागृतीच्या हेतूने प्रकाशित करण्यात येणार्या या पुस्तकाचे प्रकाशन भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, यशोवाणीच्या प्राची गुर्जर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा
विमल बाफना यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सदर पुस्तकाला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटिल, महिला व लविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदिती सुनिल तटकरे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसेच कुंदनऋषीजी म.सा. यांचे संदेश लाभले असुन, पद्मभूषण अण्णा हजारे व विचारवंत, माजी अध्यक्ष अ.भा. मराठी साहित्य संमेलन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा हे पुस्तक हा चळवळीचा भाग असुन त्यातील अनेक नाटिका, कविता, इत्यादी आकाशवाणीद्वारे प्रसारित झाल्या असुन गावागावातुन त्याचे शेकडो प्रयोगही गेल्या २५ वर्षात झाले आहेत. सदर पुस्तकात सहा मराठी, तीन हिंदी नाटिका असुन काही पथनाट्ये, कायदा व त्याचे स्पष्टीकरण देणारे लेख, ११ कलमी कृती कार्यक्रमाची माहिती, आठवा फेरा स्त्री
जन्माच्या स्वागताचा तसेच नकोशीला करूया हवीशी बाबत लेख, अनेक कविता तसेच घोषवायांचाही समावेश आहे. २५ व्या आवृत्तीसाठी कविवर्य चंद्रकांत पालवे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे विभागीय कार्यवाह, शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर यांचे सहकार्य लाभले आहे. प्रकाशन सोहळयास साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.