वाहतूक नियमांबाबत विशेष मार्गदर्शन : संचालिका पूजा देशमुख
नगर – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने येथील आय.एस.डी.टी. या संस्थेत ८ मार्च रोजी सकाळी १० वा. संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या संचालिका पुजा देशमुख यांनी दिली.
याबाबत बोलताना संचालिका पुजा देशमुख म्हणाल्या, प्रामुख्याने शहरी भागात वाहतूक व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा व गंभीर विषय बनला आहे. याबाबत पोलीस प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक या दोघांनीही समन्वयाने काम केल्यास वाहतूक व्यवस्था सुलभ होऊ शकते. त्या दृष्टीने आय. एस.डी.टी. या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाहतूक नियमांची व नागरीकांनी काय दक्षता घ्यावी, याबाबतची माहिती देण्यासाठी आय.एस.डी.टी. सभागृहात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे यावेळी मार्गदर्शन करणार असुन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंका निरसन देखील करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विनायक देशमुख हे राहणार आहेत.
याप्रसंगी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मागील वर्षी इंटेरियर डिझायनिंग या अभ्यासक्रमात विद्यापीठात सर्वप्रथम आलेल्या आकांक्षा गाडे या विद्यार्थिनीचा तसेच संस्थेत सुरू असलेल्या अल्पमुदतीच्या एम्ब्रॉयडरी व आरि वर्कचे प्रशिक्षण घेऊन उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य आर्किटेट अरुण गावडे यांनी दिले.