महाआरोग्य शिबिरे ही रुग्णांसाठी मोठी पर्वणी

0
29

उद्योजक सतीश बोथरा यांचे प्रतिपादन; प्लास्टिक सर्जरी शिबिरास प्रतिसाद

नगर – आचार्य आनंदऋषीजींच्या आशीर्वादाने व आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने आरोग्य शिबिरे भरविले जातात. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हे समजून या आरोग्य
शिबिरांच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा घडत आहे. या शिबिराचे आयोजन करण्याची संधी बोथरा परिवाराला मिळाले आहे. हे मी माझे भाग्य समजतो. आनंदऋषीजी हॉस्पिटल मधील महाआरोग्य शिबिरे ही रुग्णांसाठी
मोठी पर्वणी ठरत आहे, असे प्रतिपादन उद्योजक सतीश बोथरा यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन उद्योजक सतीश बोथरा, सौ.अपर्णा बोथरा, परेश बोथरा, सौ.कोमल बोथरा, प्रबल बोथरा व अर्णव बोथरा व बोथरा परिवाराच्या वतीने दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी सुनील कोठारी, सौ.सुरेखा कोठारी, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉ.प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, मानकचंद कटारिया, सतीश
लोढा, अभय गुगळे, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी, शिबिराचे तज्ञ डॉटर डॉ.माया
मरकड, डॉ.आदित्य दमानी आदी उपस्थित होते.
सौ.अपर्णा बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सेवाभावी पद्धतीने रुग्णांची सेवा केली जाते. येथील डॉटर्स, नर्सेस, तसेच सर्व स्टाफ अत्यंत तळमळीने, निस्वार्थपणे व काळजीने रुग्ण सेवा करीत आहेत. हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. या शिबिराच्या माध्यमातून बोथरा परिवाराला खारीचा वाटा उचलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी केले. स्वागत डॉ.आशिष भंडारी यांनी केले. प्रकाश छल्लाणी यांनी
आभार मानले. प्लास्टिक सर्जरी शिबिरात ७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली