जीवन चक्र-कर्म चक्र

कोणीही कर्माच्या फळापासुन वाचु शकत नाही, भुत, प्रेत, राक्षस, दैत्य, गंधर्व, किन्नर, यक्ष किंवा देवता देखील नाही. हे प्राणी दिव्य, सुक्ष्म व परलौकीक शरीर धारण कलेले आहेत व यांना ब्रह्मांडामध्ये (जे अंडी आणि पिंडीवरील तिसरे मंडळ आहे) राहुन आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतात. ते देखील कर्माच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी मनुष्य देहाची अभिलाषा करतात व त्यासाठी वाट पाहण्याची इच्छा करतात, कारण म नुष्य जन्मातच एखाद्या प्रभुरूप संतांची भेट होण्याची संभावना आहे, जे त्यांना आध्यात्मिक मार्गाचे रहस्य अर्थात ’नाम’ किंवा ’शब्दा’ चा भेद सांगु शकतात. परमेश्वराच्या महान रचनेच्या भारी भक्कम प्रशासनास थोडेसे समजण्यासाठीही मनुष्याला सुद्धा काही वर्षापर्यंत निरंतर धैर्यपुर्वक ध्यान धारणा करावी लागते आणि आता एखाद्या जिज्ञासुला एवढेच सांगु शकतो. असेच खरे संत सद्गुरूंना समजणे देखिल खुप अवघड आहे. परंतु असे असुनही संत ह्या संसारात येतात, सामान्य मनुष्यासारखे जगतात व नेहमी स्वतःला प्रभु किंवा त्यांच्या जीवांचे दास, गुलाम किंवा सेवक म्हणून सांगतात.

संत समर्पित जीवांचे, कर्माचे ओझे उचलतांना निसर्गाच्या नियमांची अवहेलना कवा उपेक्षा करत नाही. ते एखाद्या अशा राजासारखे आहेत जे आपल्या प्रजेतील दुःख आणि वेदना समजुन घेण्यासाठी आपल्या प्रजेमध्ये मिसळतात आणि कधी कधी त्यांच्या आनंदात व दुःखात सामील होतात. जिथे मानवीय शरीराचा संबंध आहे, त्याकरीता संत सद्गुरू आपली विशेष आध्यात्मिक सवलत वापरतात. थोडक्यात ते फाशीसारख्या संकटांनाही काटे टोचण्या इतपत बदलवू शकतात. यासाठी ते कधी कधी आपल्या स्वतःच्या देहालाही त्रास देतात जी सामान्य मनुष्यासाठी मोठी आपत्ती ठरू शकते. अशा प्रकारे ते आम्हास सांगतात की शरीरात राहुन प्रत्येकाला दुःख सहन करावे लागते, कारण प्रत्येक देहधारीसाठी हा प्रकृतीचा नियम आहे. शाक्य मुनी, गौतम असे म्हणतात की, भौतिक जीवनात दुःखच दुःख आहे. संत कबीर म्हणतात की, त्यांनी कोणत्याही मनुष्याला सुखी पाहिले नाही, ज्याला पाहिले तो दुःखी होता. गुरूनानक देवजी यांनी अत्यंत सुंदरतेने जगाची प्रतिमा रेखाटली आहे, आता जर आपण आजुबाजुला सर्वत्र दुःख पाहत आहोत म्हणून आपण परमेश्वर रूपी व्यक्तीला ही आपल्या सारखाच सामान्य मनुष्य मानतो. दुः खाचा सामना करतांना तो भलेही बाहेरून म नुष्यासारखा वागतो परंतु प्रत्यक्षात तो नेहमीच भौतिक शरीरापासून विभक्त असतात. प्रत्येक क्षणी ते अंतरी जोडलेले असल्यामुळे ते वेदना सहन करून घेतात जे शिष्यासाठी असा सिद्ध होवू शकते.

ह्या मार्गावरील प्रत्येक वाटसरू ज्याला हा मार्ग सापडला आहे व ज्याने अंतर्मुख होण्याचा सराव केला आहे. तो आपल्या शरीरातुन आपले ध्यान खेचुन त्यास दोन डोळ्यांच्या मागे, भ्रमध्यावर आत्म्याच्या ठिकाणावर एकाग्र करू शकतो. ह्या अवस्थेत पोहचण्याचा कालावधी विभिन्न मानवासाठी कमी अधिक असु शकतो. परंतु हे निश्चित आहे की ध्यान धारणेचे फळ मिळेल आणि याची पुष्टीही केली जाऊ शकते. समर्पित शिष्य ऑपरेशनच्या वेळी शरीराच्या एखाद्या भागावर भुलीचे औषध लावण्यास नकार देतात. ते आपल्या चेतनतेला शरीरातुन समेटून घेतात व सर्जनद्वारा (शल्य चिकीत्सक) शरीरावर कापल्यानंतर त्यांना ते जाणवत नाही. भाई म नीसिंह यांना अशीच शिक्षा देण्यात आली की त्यांच्या शरीराचे प्रत्येक जोड कापून तुकडे तुकडे करण्यात यावे. त्यांच्याबाबत असे म्हटले जाते की त्यांनी ते हसत हसत स्विकारले परंतु जो प्राणदंड देणारा जल्लाद होता त्याला त्या आदेशाचे पुर्ण पालन करण्याचे आवाहनही केले. कारण अंमलबजावणी करणार्‍याला हे वेदनादायक कृत्य टाळायचे होते व शरीराला प्रत्येक जोडांपासून काढून टाकू नये असे त्याला वाटत होते. जे सत्संगी आपले डोळे उघडे ठेवतात त्यांना अशा अनेक घटना पहावयास मिळतात. ज्या आत्म्यांची अंतरी उडाण असते, ते प्रभुमध्ये लीन असतात व ते आपल्याला सामर्थ्याचा दिखावा करत नाही. याचे साधे कारण हे आहे की असे कार्य चम त्कारांमध्ये मोजली जातात आणि म्हणूनच त्यांना पूर्णपणे टाळले पाहिजे. संत कधी

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

माकडाचा उपद्व्याप

काही सुतार लोक नदीकाठी असलेले एक झाड कापत होते. अर्धे लाकूड कापून होताच कापलेल्या लाकडात पाचर ठोकून सुतारमंडळी जेवणासाठी घरी गेली. जवळच्याच झाडावर एक माकड सुतारांची करामत गमतीने पाहत होते. सुतार मंडळी जेवायला जाताच त्यांची गंमत करावी, या हेतूने माकड खाली उतरुन लाकडाजवळ गेले आणि लाकडावर बसून त्याने सुतारांनी ठोकलेली पाचर उपसून काढली. त्याबरोबर लाकूड मिटले आणि नेमकी त्यात माकडाची शेपटी चांगलीच अडकली. माकड शेपटी ओढून काढण्याचा प्रयत्न करु लागले, पण ती काही निघेना. इतक्यात सुतार मंडळी तेथे आली. त्यांनी माकडाचा प्रताप पाहून त्याला चांगले बदडून काढले. या माराने माकड जागीच मरुन पडले.

तात्पर्य – नसत्या उठाठेवी केल्यास पश्‍चातापाची पाळी येते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज पृथ्वीचा परीघ किती आहे?

या प्रश्‍नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहीत धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथं ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण, ती गोल गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणावर पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्‍नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पूर्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणार्‍या नावाड्यांना आपण कुठं आहोत, कुठं चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधनं नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारत त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात धु्रव तारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे, हे समजण्यासाठीही अशाच गणिताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच ‘नौकानयनातला मैल’ ही संकल्पना पुढं आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन ‘नॉट’ हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नॉट असा मोजला जातो.

जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचं एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे 360 अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक- साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण 360 अंशांचा प्रवास करायचा झाल्यास 60 x 360 म्हणजेच 21600 नॉटिकल माईल इतकं अंतर होतं; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर 24857 मैल किंवा 40003 किलोमीटर इतकं भरतं.

कपडे नवे दिसण्यासाठी

किचनमध्ये वापरावयाचे छोटे-छोटे सुती कपडे कुकरमध्ये पाण्यासोबत वॉशिंग सोडा टाकून उकळले तर त्यात नव्यासारखी चमक येते.

वास्तू

रोज पाण्यात थोडे खडे मीठ टाकून त्याने घरातली लादी पुसा. या योगे संपूर्ण घराची दृष्ट काढल्यासारखे होईल.

सौंदर्य

नारळाचे तेल नैसर्गिक प्रकारे सनटैन दूर करतो. उन्हात बाहेर निघण्यापूर्वी 20-25 मिनिटे पहिले चेहरा, हात-पायावर लावावे.

ब्रेड-बटाटा पकोडा

साहित्य – 4 मोठे उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून 1 चमचा, कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धी वाटी, मीठ, पाव चमचा हळद, 4 ब्रेडच्या स्लाईस, 1 टेबलस्पून डाळीचे पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ, आले पेस्ट अर्धा चमचा, धने-जिरे पूड, 1 टी स्पून, तळण्यासाठी तेल.

कृती – बटाटे उकडून हाताने कुस्करून घ्यावेत. बे्रडच्या कडा कापून थोडा वेळ पाण्यात बुडवून बे्रड पुन्हा हाताने दाबून पूर्णपणे पाणी काढून घ्यावा. पाण्यातून काढलेले ब्रेड हाताने कुस्करून भाजीत घालावा. त्यात डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, आले-मिरच्या, हळद व चवीप्रमाणे मीठ घालावे. चिरलेली कोथिंबीर व 2 टी स्पून लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण चांगले कालवून प्लॅस्टिक पेपरवर गोल चपटे वडे थापावेत, मध्ये छिद्र पाडून हे सर्व पकोडे तेलात खरपूस तळावेत. टोमॅटो सॉस किंवा खोबर्‍याच्या चटणीबरोबर खावेत. बे्रडमुळे पकोडे खुसखुशीत होतात.

केसांच्या वाढीसाठी

केसांच्या नियमीत वाढीसाठी एका अंड्यातील पांढर्‍या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑईल मिसळावे. मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा.

हसा आणि शतायुषी व्हा!

पहिला मित्र – अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस…?

गेल्या वर्षीच तर तू फर्स्ट क्लास आलास ना??

रमेश – हळू आवाजात…अरे माझे सोड…जो वडापाव आणि

भजी तळत आहे ना तो इंजिनियर आहे.

दूर करा अस्वस्थता

अचानक भीती वाटणं, नैराश्य येणं, अस्वस्थता ही चिंता किंवा काळजीची लक्षणं मानली जातात. वैद्यकीय मदतीसोबतच इतर काही मार्गांनी आपण चिंता, काळजी दूर करू शकतो. अशी लक्षणं सातत्याने दिसत असल्यास काही उपाययोजना करता येतील. एखादी गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करत आहे हे स्वीकारा. शांत बसा, स्वत:शी बोला. ही परिस्थिती बदलणार आहे, हे मनाला समजावून सांगा. अचानक काळजी वाटू लागली तर त्या ठिकाणाहून किंवा परिस्थितीतून बाहेर पडा. मजेशीर व्हिडिओ बघा. जोक्स वाचा. बाहेर फिरून या. यामुळे बरं वाटेल. मोकळे व्हा. अचानक अस्वस्थता जाणवू लागली तर जवळच्या व्यक्तीला फोन करा. रडल्याने तसंच बोलल्याने तुम्ही मोकळे होऊ शकता.