जीवन चक्र-कर्म चक्र

चमत्कार करत नाहीत किंवा ते त्यांच्या शिष्यांना असे अहंकारी व दिखावटी कार्य करण्यास परवानगी देत नाही. संत जेव्हा आजारी पडतात तेव्हा ते डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. हे केवळ ऐहिक नियम टिकवून ठेवण्यासाठी करतात. ते संसारीक कामे प्रामाणिकपणे करीत असतांना आवश्यकतेनुसार त्याने योग्य उपचार घ्यावेत असा आदर्श ते मनुष्यासमोर घालून देतात. परंतु शिष्याकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी केवळ असेच औषध घ्यावे ज्याला बनवितांना देहधारी जीवांची हत्या झालेली नसेल. परंतु काही शिष्य ज्यांना गुरूंच्या सामर्थ्यावर पुर्ण व अतुट विश्वास आहे ते बहुतेक वेळा आपल्या रोगाच्या इलाजापासून वाचतात व प्रकृतीला आपले कार्य करू देतात कारण मानव शरीरामध्ये स्वतःला ठिक करण्याची शक्ती पहिल्यापासुनच आहे.

शारीरिक रोग आनंदाने स्विकारून सहन केले पाहिजे. कारण सामान्यतः खाण्या पिण्याच्या चुकांमुळे ते उद्भवतात आणि योग्य आहार व आरोग्याच्या नियमांचे पालन करून त्यावर मात केली जाऊ शकते. आधुनिक वैद्यकिय विज्ञानाचे जनक हिप्पोक्रेटस् यांनी म्हटले आहे की अन्न हे औषध म्हणून घेतले पाहिजे. कर्माच्या परिणामामुळे उद्भवणारे जटिल रोग देखिल तक्रार न करता धैयपुर्वक सहन केले पाहिजेत, कारण कर्माचा हिशोब संपविण्यासाठी त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच राहिलेले कर्मफळ नंतर न भोगता लगेच भोगणे चांगले आहे. महान सुफी संत हजरत मियॉं मीर यांचे शिष्य अब्दुल्ला यांच्या बद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या आजारपणाच्या स्थितीत त्यांनी आपल्या आत्म्याच्या धारेला आपल्या डोळ्यांच्या मध्ये भ्रमध्यावर एकवटले व स्वतःला पुर्णपणे शांत केले व स्वतःचे संरक्षण केले. हे सर्व पाहून हजरत मियॉं मीर यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या शरीरात आणले व आपल्या कर्माचे भुगतान करावयास सांगितले. त्यांनी त्याला सांगितले की अशा युक्ती वापरून तो कर्माच्या प्रभावापासून मुक्त होणार नाही. संत आपल्या शरीराची काळजी व गरजांसाठी जास्त वेळ घालवत नाही.

जितका की आपल्यापैकी बहुतेक लोक देतात. त्यांच्यासाठी हे शरीर कपड्यांसारखे आहे जे एक दिवस उतरावेच लागतील. ते आराम न करता, रात्र रात्र जागून शारीरिक व मानसिकरित्या कठोर परिश्रम करत असतात. असे अद्भुत कार्य विज्ञानासाठी रहस्य आहे परंतु संतांसाठी ही एक सामान्य बाब आहे. ते प्रकृतीच्या त्या नियमांच्या मदतीने कार्य करतात ज्याबाबत आम्हाला पुर्णपणे माहिती नाही. कर्माचे दोन भाग केले जाऊ शकतात. व्यक्तीगत कर्म व सामुहीक कर्म. सामुहिक कर्म ही अशी कर्म असतात जे एकत्रितपणे समाज किंवा देशाद्वारे केली जातात व त्यांना ’धर्म’ असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळते त्याचप्रमाणे समाजालाही चुकींच्या नितींचा परिणाम भोगावा लागतो. याचा परिणाम असा होतो की, निष्पाप लोकसुद्धा आपल्या धर्माच्या चुकीच्या कार्याचे फळे भोगतात. जेव्हा नादीर शाहने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्याने दिल्लीत सामुहिक हत्या करण्याचा वटहुकूम दिला. ही भयानक दहशत पाहुन लोकांमध्ये सर्वसाधारण ही धारणा झाली होती की देशवासियांचे वाईट कर्मच नादिरशाहच्या रूपात प्रकट झाले होते. केलेल्या पापकर्माचा मग ते पाप निषिध्द कर्मासाठी केलेले असो किंवा उचित कर्मासाठी केलेले असो त्यासाठी योग्य शिक्षा देणे हा प्रकृतीचा मुळ आधार आहे. आपण यास संकट, प्रकोप किंवा उन्माद असे काहीही म्हणू शकतो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- माणसाला किती दात असतात

प्रौढ माणसाला एकूण 32 दात असतात. वरील जबड्यात सोळा व खालच्या जबड्यात सोळा. यात निम्मे दात डाव्या बाजूला व निम्मे उजव्या बाजूला असतात. वरच्या व खालच्या जबड्यातील प्रत्येकी सोळा दातांमध्ये पटाशीचे चार दात, दोन सुळे, चार उपदाढा व सहा दाढा असे दात असतात. माणसाच्या बाबतीत खायचे व दाखवायचे दात वेगळे नसतात. मग भले एखाद्याला कोणी काहीही म्हणो! उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणसाच्या जबड्याचे हाड लहान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेवटी येणार्‍या दाढांसाठी (अक्कल दाढांसाठी) जबड्यात जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे कधी कधी ह्या दाढा उगवतच नाहीत. कधी वेड्यावाकड्या येतात. त्या जर गालाच्या दिशेने उगवू लागल्या तर खूप त्रास होतो व त्या काढून टाकाव्या लागतात. कालांतराने सर्व मानवांना 28 दात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात म्हणजे आधुनिक मानवाला अक्कलदाढांची गरज नाही. हे निसर्गाच्या ध्यानात आले असावे. अक्कलदाढा व अक्कल यांचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही!

हसा आणि शतायुषी व्हा!

इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं:

’तडफड’ म्हणजे नेमके काय असतं ?

सासु शांतपणे उठली, आणि वायफायचा स्विच बंद केला.

म्हणाली… ‘घे अनुभव’.

सौंदर्य

दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. हे मिक्स करून चेहर्‍यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते.

सल्ला

स्वयंपाकघराच्या भिंतींना कधीही काळा रंग देऊ नये.

कधीही स्वयंपाकघरात मध्यावर गॅस ठेऊ नये.

बेडरूमध्ये आवाज होणार्‍या वस्तू ठेवू नका

तुमच्या बेडरूममध्ये अशी कोणतीही वस्तू नसावी ज्यामुळे आवाज होईल. जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतेही वाद्य यंत्र. यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजारपण इत्यादी समस्या निर्माण होतात. आपल्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाइम लावावे जिथून हवा येत असेल. विंडचाईमचा मधूर आवाज कानावर पडल्याने तुम्हाला एक आनंद मिळतो आणि तणाव कमी होतो.

लाल भोपळ्याचे सुप

साहित्य – लाल भोपळा पाव किलो, 1 छोटा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 1 मध्यम आकाराचे गाजर, 2 मोठ्या लसुण पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा धणे, 4 मिरे, साखर, मिठ (चवीप्रमाणे), 2 चमचे तुप / बटर, 5-6 कडीपत्त्याची पाने, 1 हिरवी मीरची, 4 कोथिंबीरीच्या काड्या (मुळं आणि पान काढुन, फक्त काड्या)

कृती – भोपळ्याची साले काढून घ्यावीत. भोपळा, टोमॅटो, गाजर, कांदा सगळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करुन घ्याव्या. लसुण सोलुन घ्यावा. एका खोलगट भांड्यात तुप घेउन तुप तापल्यावर त्यात कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. नंतर कांदा आणि लसुण थोडा परतून घ्यावा. कच्चटपणा जाईल इतपतच. आता त्यात गाजर, टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धणे, मिरे, साखर, मिठ घालावे. हे सगळे बुडेल इतके पाणी घालावे. पाण्याला चांगली उकळी आली की गाजराच्या फोडिला टोचुन बघावे (गाजर जास्त कडक असल्याने). मऊ झाले असेल तर पाणी गाळून घेऊन बाकी सगळे मिश्रण मिक्सरमधून एकजीव करुन घ्यावे. बाजुला काढलेले पाणी व हे एकजीव केलेले मिश्रण एकत्र करुन एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास थोडे अजुन पाणी घालावे.

हृदयाच्या आरोग्यासाठी

सक्रिय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बूस्टर आणि स्ट्रेस बस्टर आहे. दर आठवड्याला 150 मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम करणे.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र- चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

कॉलेजमधील आमच्या लाडक्या प्राध्यापकांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही कॉलेजचे मित्रमैत्रिणी जवळपास वीस वर्षांनी एकम ेकांना भेटलो होतो. मोजकेच मित्रमैत्रिणी कॉलेजला असताना दिसायचे तसेच चाळिशीतही दिसत होते. परंतु बर्‍याचशा मित्रमैत्रिणींच्या चेहर्‍यावर वयाच्या खुणा जाणवत होत्या. चष्मा लागलेला, केस पांढरे, काहींना टक्कल पडलेले, पोटाचा घेर वाढलेला, खांदे झुकलेले, तणावयुक्त चेहरा, चेहर्‍यावर काळे वांग आलेले असे चित्र दिसत होते. कॉलेजमध्ये नेहमी खळखळून हसणार्‍या मैत्रिणी जणू हसणेच विसरल्या होत्या. कॉलेजमध्ये चवळीच्या शेंगेसारख्या दिसणार्‍या मैत्रिणी अगदी दुधीभोपळ्यासारख्या झाल्या होत्या. ओळखू न येण्याएवढा बदल काहींमध्ये झाला होता.

मधल्या वीस वर्षांमध्ये प्रत्येक जण आपल्या करिअर व संसारामध्ये जम बसवण्यासाठी धावपळ करत असतो. हे करताना ’तिशी’तून ’चाळिशी’ मध्ये कधी प्रवेश करतो, हे कुणाला समजतच नाही. साधारणत: 38, 39, 40 तसेच 41, 42, 43 यापैकी कुठलेही वय असले तरी ती चाळिशीचं समजावी. चाळिशीची पहिली खूण जाणवते ती म्हणजे नेहमी वाचता न येणारे वर्तमानपत्र वाचताना डोळे दुखायला लागतात. अक्षरे अंधूक दिसायला लागतात. तसेच आरशासमोर उभे राहिल्यानंतर केसांमध्ये काही बटा पांढर्‍या झालेल्या दिसतात. ’माझे तारुण्य कधी निघून गेले हे मला कामाच्या व्यापांमध्ये लक्षातच आले नाही. मला तारुण्यात जे जीवन जगायचे होते ते राहूनच गेले’ असे प्रत्येकीला वाटते. चाळिशी म्हणजे वृद्धत्वाची चाहूल होय. वृद्धत्व समोर दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते येण्यास पंधरा-वीस वर्ष अवकाश असतो. परंतु तो काळ सुरळीत पार पडण्यासाठी आत्तापासूनच शरीराची काळजी घ्यावी लागते. सुंदर दिसावे असे प्रत्येकीला वाटते. मात्र चेहरा आणि शरीर तजेलदार व सुंदर दिसण्यासाठी फक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग नाही. चिरतारुण्य टिकवण्यासाठी व त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत मसालेदार, तेलकट, पदार्थ खाल्ले तरी जमत होते. रात्रीच्या जागरणाने त्रास होत नव्हता. परंतु इथून पुढे अनियमित जीवनशैली व आहार जमणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. खालील उपाय व पथ्य रोजच्या जीवनात आचरणात आणले तर चांगले आरोग्य टिकून राहील.

1) संतुलित आहार घ्यावा – चमचमीत, चटकदार, मसालेदार, तेलकट, मटन, अंडी तसेच फास्ट फूड खाणे टाळावे आणि नैसर्गिक समतोल आहार घ्यावा. कारण चुकीच्या आहारामुळे वजन वाढते व त्यातूनच रक्तदाब, हृदयरोग असे आजार होतात. गाजर, काकडी, टोमॅटो, कोबी व कांद्याची पात हे पदार्थ सॅलड स्वरूपात सुरुवातीलाच कच्चे खावेत.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

असभ्यता से प्रतिक्रिया नहीं करना चाहे वह कितना भी गलती पर हो। जिस व्यक्ति से मन में टकराव होने लगे तुरंत मन में स्नेही व्यक्ति को देखने लग जाओ, किसी अच्छे दोस्त को देखने लग जाओ या अपने इष्ट को देखो, परमात्मा शिव को देखो। वह व्यक्ति, जिससे हमें प्यार है, जब हम उसके पास जाते हैं, वह हमें चाय क्यों नहीं पिलाता, इस भावना को क्लेश कहते हैं। कोई व्यक्ति जिनसे हमें आशायें होती हैं, वह बोलते ही नहीं, सदा मौन ही रहते हैं। यह मौन क्लेश उत्पन्न करता है। आप कहीं गये थे, आपके वापिस आने पर, आपके चाहने वाला बस स्टैंड पर लेने ही नहीं आया। यह पीड़ा क्लेश कहलाती है। आप घर पहुँचे, किसी ने भी आपका स्वागत नहीं किया, किसी ने पानी भी नहीं दिया, बैठने को भी नहीं कहा, यह पीड़ा क्लेश है। बीते हुए बुरे व्यवहार, अपमान, तिरस्कार, उत्पीड़न की घटनाएं रह-रहकर मन में पीड़ा देती हैं। ये क्लेश है। ये क्लेश योग नहीं लगने देते। आगे नहीं बढ़ने देते। योग तब लगेगा जब क्लेशों से बचेंगे। क्लेशों से बचने के लिये आपको अपनी सूझबूझ, बुद्धिमता प्रयोग करनी पड़ेगी। आपको व्यक्तिगत सोचना और निर्णय लेना होगा। यहॉं कोई नियम व सिद्धांत नहीं बनाया जा सकता। क्लेशों से दशाएं व नक्षत्र निर्धारित होते हैं। जिनसे क्लेश आते हैं, उनका अगर नुकसान कर देते हैं तो आपका नक्षत्र खराब हो जाता है। आगे एक समय आयेगा जब आपको यह नुकसान भुगतना पड़ेगा। ऐसे व्यक्ति के प्रति कल्याण की भावना रखो, उसका आर्थिक नुकसान नहीं करना। अगर वह आप पर निर्भर है तो उसकी आर्थिक मदद करते रहो। जिसका परिणाम तुम्हें कभी भी किसी भी जन्म में आर्थिक तंगी नहीं होगी। अगर ऐसा व्यक्ति संस्था में है तो भी उसकी यथा-सम्भव मदद करते रहो अगर आपका दिल नहीं मानता तो उसकी मदद किसी दूसरी संस्था से करवा दो। इसका शुभ फल यह होगा कि जब कभी आप पर बुरे दिन आयेंगे तो एक रास्ता बंद होगा तो दस खुल जायेंगे। क्लेशित व्यक्ति के प्रति कल्याण की भावना रखें, यह वातावरण में जायेगा, जिससे आप पर सदा ब्रहस्पति की दशा बनी रहेगी। हर एक व्यक्ति की मजबूरियां हैं, कमजोरियां हैं, जिम्मेदारी हैं, दबाव है, जिस कारण से न चाहते हुए भी उसे ऐसा-वैसा व्ययहार करना पड़ता है। उसके प्रति दया भाव रखो। बाबा ने आपको मौका दिया है कि लोग कैसे बदलते हैं, आप ज्ञान योग में अपने को सम्पन्न बनाओ, लोगों के व्यवहार से सीखो।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)