आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र आरोग्यपूर्ण म्हातारपण

थोडं काम, योगाभ्यास, सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत चालायला जाणे, संतुलित सकस आहार, बरोबरीच्या मित्रमैत्रिणींशी सुसंवाद व शांत झोप या सगळ्यांची सांगड घालता आली, तर नक्कीच वृद्धावस्थेत आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. वृद्धावस्थेमध्ये शारीरिक हालचाल कमी झालेली असते. बैठ्या स्वरूपातील काम जास्त असते. मासिक पाळी बंद झाल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून कमी उष्मांक असलेले पदार्थ आहारात असावेत. तारुण्यावस्थेमध्ये खाल्लेले पदार्थ या वयात जास्त प्रमाणात खाऊ नयेत. वनस्पती तूप, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साबुदाणा, मैदा, बटाटे, रताळे, भात, साखर, मिठाई असे पदार्थ आहारामध्ये शक्यतो नसावेत. कारण या सर्व पदार्थांमध्ये जास्त उष्मांक (कॅलरीज) असतात. त्यामुळे या वयात रक्त्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, वजन वाढणे, हृदयरोग, मधुमेह, संधिवात असे आजार निर्माण होऊ शकतात. साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, मुरमुरे, सोयाबीनचे फुटाणे, फळांचा ज्यूस, भाज्यांचे सूप, कडधान्य अशा कमी उष्मांक असलेल्या पदार्थांचा आहारात जास्त वापर करावा. चहाऐवजी सकाळ संध्याकाळ साय नसलेले गायीचे दूध प्यावे. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता भरून निघते, ज्वारी व नाचणीची भाकरी खावी. गायीचे तूप घ्या. नाचणीमध्ये कॅल्शिअम, लोह व फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. ही भाकरी पचायला हलकी असते. गायीच्या तुपामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढत नाही. सांध्यामध्ये लवचीकता राहाते. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी व मलावस्तंभाचा त्रास होत नाही. रोज दोन चोथायुक्त फळे खावीत. उदाहरणार्थ, संत्री, मोसंबी, डाळींब, पपई, सफरचंद इत्यादी. म धुमेह असणार्‍या स्त्रियांनी व जास्त वजन असलेल्या स्त्रियांनी चिकू, सिताफळ, आंबा, केळी ही फळे खाऊ नयेत. या वयात शरीरातील पेशींची झीज होत असते व ही झीज प्रथिनयुक्त आहाराने भरून येते. म्हणून जास्त प्रथिनयुक्त (प्रोटीन्स) आहार घ्यावा याकरिता उकडलेल्या अंड्याचा पांढरा बलक, दूध, डाळी, मोड आलेली कडधान्य, मासे, चिकन, ताक, पनीर अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश असावा.. या वयामध्ये दात पडलेले असतील तर कडधान्य उकडून खावीत. वरील सर्व पदार्थ चावता यावेत म्हणून जास्त शिजवावेत. कडधान्याचे, पालेभाज्यांचे, मटण-चिकन सूप असा हलका आहार घ्यावा. यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. सकस पदार्थ मिळाल्यामुळे अशक्तपणाही जाणवत नाही. पोटभर जेवण्यापेक्षा थोड्या-थोड्या अंतराने हलक्या स्वरूपात आहार घ्यावा. शिळे पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यामुळे जुलाब, उलट्या, अपचन, पित्ताचे विकार, मलावस्तंभ असे आजार होतात. मऊ गुरगुट्या भात, वरण, खिचडी भात, मऊ ज्वारी, नाचणीची भाकरी, बिन तेलाची पोळी, पालेभाजी, उसळ असे जेवण करावे. जेवण करताना गोड, ताजे साखर नसलेले ताक प्यावे. जेवताना सुरुवातीला सूप प्यावे. सहसा या वयात फास्ट फूड खाऊ नये. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. बर्‍याच स्त्रिया या वयात शरीर साथ देत नसल्यामुळे बाहेरचे पदार्थ किंवा पटकन होणारे फास्टफूड खातात. परंतु त्यामुळे शरीराचे योग्य पोषण होत नाही. चुकीच्या आहारामुळे अनेक आजार निर्माण होतात. म्हणूनच ताजा व सकस आहार घ्यावा. आयुष्यभर धावपळ केल्यानंतर या वयामध्ये आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वभाव शांत ठेवावा. आध्यात्मिक कार्यामध्ये आवर्जून भाग घ्यावा आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांती मिळते. तसेच ॐकार, प्राणायाम, ध्यानधारणा, योगासनांपूर्वीच्या सूक्ष्म क्रिया, मोकळ्या हवेत फिरायला जागे असा व्यायाम करावा. या वयात गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास खूप जाणवतो. व्यायामामुळे हा त्रास कमी होतो. सांध्यांमध्ये लवचीकता निर्माण होते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

कोई चीज अचानक आँख के सामने आ जाये तो हमारी आँखें एकदम बंद हो जाती हैं और हाथ एकदम आँखों के आगे आ जाते हैं। हमें अचानक कोई चोट लगे तो हम पर फूंक मारने लगते हैं या चोट वाले अंग को मुँह में डाल लेते हैं और उस स्थान पर हाथ फेरने लगते हैं। ऐसा करने से हमारे सांस, मुँह और हाथों की उंगलियों से विद्युत मिलती है जिससे चोट का दर्द कम हो जाता है। यह सब हम ारे से अपने आप होने लगता है। ये सब छठी इन्द्रिय के कारण होता है। कई लोगों ने अंतिम समय अपनी यात्रा रद्द कर दी और वह दुर्घटना से बच गये। आपको कुछ लोग मिले होंगे जो कहते हैं कि उन्हें अच्छे-बुरे का ज्ञान पहले लग जाता है। लोग उनकी बातों को उनके दिमाग का फितूर समझकर उन्हें अनदेखा कर देते हैं। ऐसी समर्थता वाले साधारण लोग भी हो सकते हैं, जरूरी नहीं को साधू-संत हो। उनकी साधारणता के कारण लोग उन्हें महत्व नहीं देते। आईनस्टाईन जैसा महान् वैज्ञानिक भी बहुत साधारण था। इसलिये हमें अपनी मानसिक दक्षता को बढ़ाते रहना है। नई-नई विधियों से अपनी छठी इन्द्रिय पर कार्य करते रहना है। बहुत कम लोगों में यह जन्मजात होता है। अधिकांश मामलों में ये एक खास उम्र में जाकर पैदा होता है। इसके जागरण की कोई उम्र सीमा नहीं होती। इसलिये छठी इन्द्रिय को जगाने और उससे कार्य लेने के लिये कुछ-न-कुछ प्रयोग जरूर करते रहा करो।

छठी इन्द्रिय जब जागृत हो जाती है तो व्यक्ति को भीड़ में घुटन होती है। उसे अकेलापन अच्छा लगता है। पहले जो लोग करीब थे अब आपको उन्हें भी बर्दाश्त करने में परेशानी होती है। आप ज्यादा से ज्यादा अकेले रहना चाहते हैं। रात में आपको बहुत अच्छा लगता है। अजीब अनुभूति होती है। बहुत अच्छी-अच्छी अनजान तरंगें मिलती हैं। इस प्रक्रिया के दौरान बहुत ज्यादा विद्युत की जरूरत होती है। इसलिये बार-बार भूख लगेगी। जमीन में कहॉं धन गढ़ा हुआ है और कहॉं पर पानी है वह भी विकसित छठी इन्द्रिय से पता लगा सकते हैं। हम दूर से पुस्तक पढ़ सकते हैं। कोई चीज चोरी हो जाये तो पता लगा सकते हैं कि चोरी किसने की है। पीनियल ग्रंथी और पीचुटरी ग्रंथी के सम्मिश्रण से छठी इन्द्रिय जागृत होती है। गहरे ध्यान और योग से ये छठी इन्द्रिय अपने आप जागृत होती है। मेस्मेरिजम या हिप्नोटिज्म जैसी अनेक विद्याएं इस छठी इन्द्रिय के जागरण का ही कमाल है। गंदगी वाले स्थानों और कार्बनडाईऑक्साइड की अधिकता से छठी इन्द्रिय की ऊर्जा का क्षरण होता है। साफ वातावरण और ऑक्सीजन की अधिकता छठी इन्द्रिय जागृत करने में सहायक होते हैं। जब हम किसी बात को, किसी की आहट को या फिर होने वाली क्रिया को समय से पहले ही भांप ले तो छठी इन्द्रिय का कमाल है। किसी के स्वभाव और मनोदशा को सूंघ सकते हैं। अंधा व्यक्ति भी रंग देख सकता है। आप सब में छठी इन्द्रिय है और उसे प्रायः प्रयोग करते हैं। इसकी क्षमता को बढ़ाने का प्रयास करें। जब कभी मम्मी की डांट से बचना हो, बॉस की फटकार से बचना हो या किसी मुसीबत से छुटकारा पाना हो तो मन करता है कि काश हम कहीं गायब हो जाये। किसी ऐसी दुनिया में चले जाये जहॉं कोई हमें ढूंढ न पाये। सबके बीच में रहते हुये कोई हमें देख न सके। कभी-कभी आप भी सोचते होंगे कोई तरकीब, कोई मंत्र, कोई टोना-टोटका ही मिल जाये जिससे मैं जब चाहूँ अदृश्य हो जाऊँ। यह सिर्फ कोरी कल्पना नहीं है। आपने कभी-न-कभी

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

काही चांगले बियाणे पेरले असावेत त्यामुळे त्याचे भरपूर पिके त्यांना या जन्मात मिळत आहे किंवा मग हिसका, ओढा आणि जमा करा या नितीवर चालून ते स्वतःसाठी संपत्ती जमा करत असतील, सुखाला भोगणारे हे लोक दुर्भाग्यवश हे विसरून जातात की, न दिसणारी सोन्याची बेडी घालून ते नकळत अडचणीत फसत आहे. एक सामान्य म्हण आहे की, मोठ्या लोकांचा राजवाडा गरिबांच्या घाम पण अश्रूंनी बनतो. चांगले बियाणे पेरल्याशिवाय कोणी चांगली पिके कसे काढू कल ? हे संभव आहे की काही पापाचे ओझे त्याच्यावर असू शकते. यापुढे त्याने चांगले जर बियाणे पेरले नाही, तर भविष्यात त्याला चांगल्या फळाची अपेक्षा कशी आणि किती काळ करता येईल ? याशिवाय चांगले कर्म त्याला त्याच्या वाईट कर्माच्या फळांपासून मुक्त करू शकत नाही. ज्याप्रकारे घाणेरड्या पाण्याने स्वच्छ धुतले जाऊ शकत नाही. एका ईसाई संताने म्हटले आहे सर्व सद्गुण आम च्यात असूनही आम्ही सर्व घाणीने भरलेले आहोत. कोणीही स्वच्छ नाही, एकही नाही. मनुष्य नेहमी देवाण-घेवाण किंवा फळ आणि प्रतिफळाच्या नियमानाने बांधलेले असतो. नक्कीच चांगले कर्म करणे ठिक आहे आणि वाईट कर्मा ऐवजी ते करणे चांगले आहे, परंतु हेच सर्वस्व नाही. सदाचारी जीवनाने कोणाला दीर्घकाळ स्वर्गाची प्राप्ती होऊ शकेल जिथे राहून आरामात तो स्वर्गीय सुख मिळू शकतो. परंतु तेथे ही तो त्याच्या सुक्ष्म आणि कारण शरीरात कैद राहतो. अर्थात जन्म मरणाच्या चक्रातून अजून तो मुक्त झाला नाही. कुणीही स्वतःला जोपर्यंत कर्ता मानतो, जन्म-मरणाच्या चक्रातून त्याची मुक्ती होणे अशक्य आहे व त्यास त्याच्या कर्माची फळ भोगावीच लागतील. मनुष्य ’नाम’ अथवा ’शब्द’ शी एकरूप होऊनच उच्च आध्यात्मिक मंडळांमध्ये प्रवेश करू शकतो आणि मग तो अशाप्रकारे जन्म मरणाच्या छायेपासून खूप दूर जातो. अवागमनाच्या जीवनाच्या चक्रातून मुक्त होण्याचा इतर कुठलाही उपाय नाही.

पृथ्वीवर केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनुसार देहरहित आत्म्यांना स्वर्ग किंवा नरकात अपेक्षितपणे जास्त काळापर्यंत राहावे लागते. परंतु या लोकामध्ये कायमचा निवास नसतो. तेथे राहिलो तरी आपण जन्म आणि मृत्युच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. काही धर्मात स्वर्गाला मुक्ती मानतात परंतु हे सत्य नाही. आपल्या आपल्या चांगल्या कर्मानुसार एका निर्धारीत काळापर्यतं स्वर्गातील सुखांचा आनंद घेतल्यानंतर जीवाला पुन्हा मनुष्य शरीर प्राप्त होते. कारण याच जन्मात त्याला देहभासाच्या वर येण्याची संधी मिळते जी त्याला मुक्तीकडे घेऊन जाते. देवी देवतासुद्धा आपला कार्यकाळ पूर्ण केल्यावरही मानव देहाची इच्छा करतात. चांगल्या कर्मावर सर्वजण विश्वास ठेवतात आणि त्यांना योग्य मानतात. परंतु चांगल्या कर्माच्या मार्गावर चालूनही मनुष्याला शेवटी कळते की तो अतृप्त इच्छांच्या आणि वासनांच्या जाळ्यात अडकलेला आहे. अशाप्रकारे नकळत तो कर्माच्या लोखंडी जाळ्यात अडकला जातो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

लढता लढता मेलेले बरे

एका गल्लीतला कुत्रा सहज फेरफटका मारावा म्हणून एका दुसर्‍या गल्लीत फिरायला गेला असता हा कोण उपटसुंभ आपल्या हद्दीत घुसला असा विचार करीत त्या गल्लीतली पाच पंचवीस कुत्री त्या कुत्र्याच्या पाठी लागली, तेव्हा भीतीने तो कुत्रा पळू लागला. पण शेवटी पळून पळून थकल्याने आपण आता यांच्या तावडीतून सुटत नाही. आपण नक्कीच प्राणाला मुकू, तेव्हा यांच्या तावडीत सापडून मरण येणारच असेल तर लढून मेलेले काय वाईट? असा विचार मनात येऊन तो कुत्रा गर्रकन पाठीमागे फिरला आणि मोठमोठ्याने गुरकावून त्या कुत्र्यांच्या कळपावर तुटून पडला. त्याचा तो आवेश पाहून धावून आलेले कुत्रे भीतीने पळून गेले.

तात्पर्य – संकटाचा सामना धैर्याने केल्यास संकटातून सुटका होते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- वेड्या व्यक्तींना शॉक दिल्यास ते बरे होतात का?

अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही हा प्रसंग पाहिला असेल. नायक वा दुसरा कोणीतरी वेड्यासारखे करतोय. त्याला सात-आठ लोक धरून दवाखान्यात आणतात. त्या दवाखान्यात मग दोन-चार मिनिटे वेडेच वेडे व त्यांच्या विविध अदा आपल्याला दाखवल्या जातात. मग डॉक्टर या आपल्या हिरोला पलंगावर बांधून ठेवतात व त्याच्या डोक्याला तारा जोडून स्विच ऑन करतात. झालं…. मग नायक खूप वेदना झाल्यासारखा चेहरा करतो…. हातपाय जोरजोरात उडवतो. दोन मिनिटांनी तो एकदम शांत, थकलेला वगैरे दिसतो. बर्‍याचदा तो बराही होतो आणि एकदम मॉंऽऽ म्हणून त्याच्या आईला ओळखतो. खरेच असे होते का? शरीरातील सर्व पेशींचे कार्य हे विद्युत-रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असते. या प्रक्रियांमुळेच वेड्या माणसाच्या मेंदूत कार्यात्मक बिघाड निर्माण झालेले असतात. बर्‍याचदा औषधांच्या वापराने वेड्या व्यक्तीच्या रोगावर नियंत्रण आणता येते. गंभीर मानसिक रोगात कधी कधी व्यक्ती अनावर होते. प्रसंगी कोणाचा खूनही करू शकते. अशा हिंसक व्यक्तीला उन्मादाच्या अवस्थेतून बाहेर आणण्यासाठी शॉक देण्याचा उपयोग होऊ शकतो. शॉक देण्याची ही उपचार पद्धत सर्वच मानसिक रोगांसाठी उपयुक्त नसते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्लामसलतीनेच रुग्णालयात असा उपचार करतात. शॉक द्यायचे वा नाही हे डॉक्टर रुग्णाच्या पूर्ण तपासणीनंतरच दीर्घ निरीक्षणांअखेरीस ठरवू शकतात. चुकीच्या रुग्णात शॉक देण्याची पद्धत वापरल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. रुग्णाच्या नातेवाईकांना बर्‍याचदा शॉक देणे म्हणजे वेडावरचा रामबाण उपाय, असे वाटत असते. त्यामुळे डॉक्टरांना ते याबाबत आग्रह करतात. असे करणे किती घातक असते, ते तुम्हाला समजले असेलच.

सौंदर्य

चेहर्‍यावर सूज दिसत असेल तर कॉफी काळ्या कॉफीचे आइस क्यूब तयार करा. उठल्यावर क्यूब्ज चेहरा, डोळ्यांवर लावा.

सल्ला

पोहे किंवा मुरमुरे दोन तास तरी उन्हात किंवा दोन मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावेत म्हणजे साधळत नाहीत.

नवीन घरासाठी

वनस्पती आणि पाण्याचे माध्यम जसे की वॉटर पेंटिंग, कारंजे, मत्स्यालय इ. तुमच्या जेवणाच्या जागेसाठी घरासाठी महत्त्वाची वास्तू म्हणजे ती मुख्य दरवाजाजवळ नसावी.

घरासाठी वास्तूनुसार, घर शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे असावे.

पनीर पराठा

साहित्य – मल्टि ग्रेन/गव्हाचे पीठ – 1 1/2 कप, मीठ, तेल, पनीरचे सारण, पनीर – 200 ग्रॅम्स, कांदा – 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून, हिरवी मिरची – 1 बारीक चिरून पुदीना पाने – 12 ते 15 बारीक चिरून, कोथंबीर – 1/2 कप बारीक चिरून, आले-लसूण पेस्ट – 2 टिस्पून, ओवा – 1/2 टिस्पून, धणे पावडर – 1 टेबलस्पून, काळी मिरी पावडर – 1 टिस्पून, लाल तिखट – 1 टिस्पून, अमचूर पावडर – 1 टिस्पून (ऐच्छिक), कसुरी मेथी – 2 टिस्पून, मीठ – चवीनुसार, तूप

कृती – एका भांड्यात गव्हाचे पीठ, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या आणि 15 मिनिटे झाकून ठेवा. पनीरचे तुकडे करून 10 मिनिटे थोड्या पाण्यात घालून ठेवा. पनीर पाण्यातून पिळून घेऊन एका भांड्यात छान चुरून घ्या. त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून सारण बनवून घ्या. कणिक थोडी मळून, कणकेचे समान आकाराचे गोळे करून त्याची पोळी थापून अथवा लाटून घ्या. त्यावर पराठ्यात मावेल एव्हढं सारण घाला. वरून अजून एक लाटलेली पोळी ठेऊन कडा घट्ट दाबून घ्या. तवा गरम करून त्यावर काही तेलाचे थेंब टाकून टिश्यू पेपर किंवा कापडाने पुसून टाका. गरम तव्यावर लाटलेला पराठा घाला आणि कडेने थोडे तेल / तूप सोडा. एका बाजूने भाजून झाला कि पराठा परता आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरम पनीर पराठे दही/ राईत्या सोबत सर्व्ह करा.

आरोग्यदायी त्वचेसाठी

सेल्युलाइडशी मुकाबला करण्यासाठी कॅफीन प्रभावी ठरते. मात्र, यासाठी कॉफी पावडरऐवजी ग्राउंड कॉफी वापरणे जास्त योग्य ठरते. अर्धा कप कॉफीत 3 चमचे बॉडी ऑइल आणि 2 चमचे गुलाब पाणी मिसळा. जास्त कोरडे मिश्रण झाल्यास गुलाबपाणी वाढवा. हे स्क्रब थाइज वा हिप्ससारख्या सेल्युलाइड अफेक्टेड त्वचेवर लावा. आठवड्यातून 3 वेळा याचा वापर केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.