बर्ड फ्लूचा मानवाला धोका

जगभरात एव्हीयन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे. धोकादायक म्हणजे बर्ड फ्लू (एच1 एनआय) माणसांनाही संक्रमित करु शकतो. त्यामुळे बर्ड फ्लू संसर्गाचा वाढता धोका पाहता संयुक्त राष्ट्राच्या तीन एजन्सींनी या विषाणूच्या प्रसाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लू म ानवांना अधिक सहज संक्रमित करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्यात एकीकडे आजार आणि विविध संसर्गाचे प्रमाण वाढत असताना आता बर्ड फ्लूने चिंता वाढवली आहे. एच 5 एन 1एव्हीयन इन्फ्लूएंझा हा बर्ड फ्लूचा नवा धोकादायक स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. तो अत्यंत संसर्गजन्य आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करू शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे. संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना आणि ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ऍनिमल हेल्थ’ तसेच जागतिक आरोग्य संघटनेने प्राण्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी सर्व देशांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक स्तरावर एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींनी दिलेल्या इशार्‍यानुसार, बर्ड फ्लू मानवांना अधिक सहज संक्रमित करू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. यूएन एजन्सींनी सर्व देशांना रोगाचे निरीक्षण अधिक बारकाईने करण्यास सांगितले आहे. याशिवाय पोल्ट्री फार्ममध्ये स्वच्छता बाळगण्याचे आणि विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की बर्ड फ्लूची लागण माणसांना झाली आहे. सध्या अशी फक्त सहा प्रकरणे आहेत, ज्यात लोक विषाणू-संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात होते. त्यांना सौम्य लक्षणे होती. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना स्पर्श केल्यास, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यास आणि संक्रमित प्राणी आणि पक्षी खाल्ल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जगभरात चार जणांना एव्हियन फ्लूची लागण झाली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

हसा आणि शतायुषी व्हा!

पती – तुम मेरी फिल्म में काम करोगी।

पत्नी – हॉं करूँगी पर सीन क्या है ।

पती – तुम्हें धीरे-धीरे पानी में जाना होगा ।

पत्नी – ठीक है पर फिल्म का नाम क्या है ।

पती – गयी भैस पानी में ।

सल्ला

कॅसेटचा आवाज खरखरत असेल तर ती थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. आवाज व्यवस्थित येईल.

सौंदर्य

आपण थोडीशी दक्षता घ्याल तर आपले केसही रेशमासारखे मुलायम चमचमते बनवू शकाल. त्यासाठी डोके धुण्याचा अर्धा तास आधी एक लिंबाचा रस दूध वा दह्यात फेटून केसांना लावा.

वास्तू

जर तुमच्या घरातील एखादे टॉयलेट हे घराच्या पूर्व, उत्तर आणि पूर्वोत्तर दिशेला येत असेल, तर हा फार मोठा असा वास्तुदोष मानला जातो. यामुळे सुख, आरोग्य व समृद्धी या तिन्हींवर गंभीर नकारात्मक प्रभाव निर्माण होतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी थोडी चिनी माती, काच वा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये 2-3 मुठी खडे समुद्री मोठ घ्या व ती प्लेट घरात ठेवा. या प्लेटमधील मीठ 15-20 दिवसांनी बदलत राहा. टॉयलेटचा वास्तुदोष हा या उपायामुळे बर्‍याच प्रमाणात नियंत्रित केला जातो.

पौष्टिक मिक्स सलाड

साहित्य – ब्रोकोली 500-750 ग्रॅम, मशरुम 1 पाकिट, बेबी कॉर्न 100 ग्रॅम, स्वीट कॉर्न 100 ग्रॅम, बेल पेपर मध्यम आकाराचे, 250 पनीर, ऑलिव्ह ऑईल, बटर, चिली फ्लेक्स, काळे मिरे पावडर, लसुण, मीठ

कृती – ब्रोकोली निवडून घ्या. मशरुम, बेबी कॉर्न, पनीर, बेल पेपर धुवून कापून घ्या. स्वीट कॉर्न धुवून घ्या. ऑलिव्ह ऑईल गरम करुन त्यात लसुण आणि चिली फ्लेक्स परतून घ्या. सर्वात आधी ब्रोकोली आणि मशरुम टाका, परतून घ्या. नंतर बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मीठ टाकून मिक्स करुन घ्या. झकण ठेवून वाफेवर शिजू द्या. एक दोन वेळा हलवून घ्या. मशरुम शिजत आले की मिरे पावडर व Bell pepper बेल पेपर टाका. मशरुम शिजलेले आहे की नाही तपासा. पनीर बटरमध्ये परतून घ्या, बाकी घटकांसोबत मिक्स करा.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी

रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते. मेथ्यामध्ये असलेल्या विशेष अमायनो ऍसिड्समुळे हे साध्य होते. परिणामत: उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते.

पाण्याखालचं संग्रहालय

सैन्याचे रणगाडे, तोफा, बंदुका अशा वस्तू समुद्राच्या तळाशी पहायला मि ळाल्या तर… खूप गंमत येईल ना? जॉर्डनमध्ये असंच एक संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. या संग्रहालयात सैन्याचे रणगाडे, हेलिकॉप्टर, बंदुका, बोटी पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे संग्रहालय समुद्राच्या तळाशी आहे. या संग्रहालयात सैन्याची 19 उपकरणं पहायला मिळतील. अकाबा किनार्‍यावरून हे संग्रहालय पहायला जाता येईल. लाल समुद्रात 28 मीटर म्हणजे 92 फूट खोल हे संग्रहालय उभारण्यात आलं आहे. फक्त सात दिवसात हे संग्रहालय उभारण्यात आलं. इथे येणार्‍या पर्यटकांना काही तरी धाडसी, वेगळं पाहिल्याचं समाधान मिळावं, समुद्री जीवनासोबतच सैन्याचं वैभव न्याहाळता यावं या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आलं आहे. हे जगातलं पाण्याखालचं पहिलं मिलिट्री संग्रहालय आहे. पर्यटकांना संग्रहालयात पोहोचवण्यासाठी खास बोटी तयार करण्यात आल्या आहेत. खोल पाण्यात जायचं नसेल तर पर्यटक वरूनच हा नजारा बघू शकतात. यासाठी काचेच्या बोटी तयार करण्यात आल्या आहेत. या बोटींमधून समुद्र तळ न्याहाळता येईल. असं हे अनोखं संग्रहालय जॉर्डनची शान ठरणार आहे.

एका महिलेला एकाच बाळंतपणात पाच बाळे!

बिहारमधील सीवान जिल्हामधील एक बाळंतपण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. हे बाळंतपण एखाद्या चमत्कारासारखे असल्याचे म्हटले जात आहे. सामान्यपणे एखादी महिला बाळांतीण होते, तेव्हा ती एकाच वेळी दोन किंवा जास्तीत जास्त तीन बाळांना जन्म देते; मात्र सीवानमधील एका महिलेने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला आहे. या महिलेचे नाव पूजा सिंह आहे; मात्र या महिलेने जन्म दिलेल्या पाच बाळांपैकी केवळ दोन बाळे जिवंत असून तीन बाळांचा मृत्यू झाला आहे; मात्र एकाच वेळी एका महिलेने पाच बाळांना जन्म दिल्याचे पाहून डॉक्टरांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. सध्या पुजाच्या या बाळांतपणाची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये सुरू आहे. सीवानमधील हसनपुरा येथील तिलौता रसूलपूर गावाची रहिवाशी आहे.

या माहिलेने सीवानमधील एका खासगी रुग्णालयामध्ये एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला; मात्र यापैकी दोन बाळे मृतावस्थेतच गर्भातून बाहेर काढण्यात आली. गर्भाबाहेर काढल्यानंतर तीन बाळे जिवंत होती. त्यापैकी एका बाळाचा नंतर मृत्यू झाला. उर्वरीत दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुजाने जन्म दिलेल्या बाळांपैकी तीन मुले होती तर दोन मुली होत्या. प्रसुतीच्या वेळी दोन मुलांचा मृत्यू झाला. जन्मानंतर काही दिवसांनी एका मुलीचाही मृत्यू झाला. सध्या पुजाची एक मुलगी आणि मुलगा जिवंत असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. या महिलेने पाच बाळांना जन्म दिल्याची माहिती केवळ डॉक्टर आणि या महिलेच्या नातेवाइकांना होती; मात्र जगलेल्या दोन मुलांच्या नामविधीनंतर यासंदर्भात इतरांना कळवण्यात आले. ही माहिती वार्‍याच्या वेगाने पसरली. सीवान जिल्ह्यासहीत संपूर्ण बिहारमध्ये या बाळंतपणाची चर्चा झाली. सध्या पूजा आपले वडील श्याम बिहारी सिंह यांच्या घरी म्हणजेच स्वत:च्या माहेरी सिसवन येथील नंद मुडा गावातील घरी आहे. अलिकडेच तिला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या डॉक्टरांनी पूजा आणि दोन्ही बाळांसाठी काही आठवड्यांचा औषधांचा कोर्स दिला आहे. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जून महिन्यात 37 वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल नावाच्या महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिला होता. यामध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. या महिलेची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. मे 2021 मध्ये माली येथील एका महिलेने नऊ बाळांना जन्म देण्याचा विक्रम नोंदवला होता. अवघ्या महिन्याभरात गोसियामी धमारा सिटहोलने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला.

माकडाने पळवली एक लाखांची बॅग

अन्नाच्या शोधात फिरत असताना माकडाची नजर एका बॅगेवर पडली. बॅगेत आपल्याला खाण्यासाठी काही तरी मि ळेल, या आशेने माकडाने धाव घेतली. यानंतर ती बॅग घेऊन ते जाऊन झाडावर बसले; पण माकडाने बॅग नेताच खाली एकच गदारोळ सुरू झाला. कारण या बॅगेत तब्बल एक लाख रुपये होते. त्यामुळे लखपती झालेल्या या माकडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे घडलेल्या या घटनेची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली. शहाबाद येथे विक्री करारासाठी नोंदणी कार्यालयात एक व्यक्ती आली होती. त्याने स्वतःसोबत एक लाखांची रोख रक्कम आणली होती. रक्कम असलेली बॅग त्याने गाडीलाच लावून ठेवली होती. माकडाने बॅग चोरली, तेव्हा सगळा प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. शराफत हुसेन हे दिल्लीत वास्तव्याला आहेत. आपली दुचाकी पार्क केल्यानंतर ते एका बाकड्यावर बसून आपली कागदपत्रे तपासत होते. शराफत हुसेन आपल्या कामात व्यग्र असतानाच माकड तिथे आले. तिथे पार्क करण्यात आलेल्या बँगांमध्ये काही सापडते का, हे ते पहात होते. या वेळी हुसेन यांची बॅग त्याच्या हाती लागली. ते बॅग घेऊन पळून गेले. दुसरीकडे शराफत हुसेन यांना याची कल्पनाच नव्हती. हे कळल्यानंतर मात्र घटनास्थळी एकच गदारोळ सुरू झाला. सर्वजण माकडाचा शोध घेऊ लाग- ले. या वेळी माकड एका झाडावर बसले असल्याचे त्यांना दिसले. उपस्थित लोकांनी माकडाकडून बॅग मिळवण्याचा प्रयत्न केला; पण बॅग हाती लागत नव्हती. म ाकडाचा पाठलाग केला असता अखेर हुसेन यांना बॅग मिळवण्यात यश आले. सुदैवाने त्यांचे सर्व पैसे सुरक्षित होते. शहाबादमध्ये माकडांची दहशत वाढली आहे. जिल्हा प्रशासना- ने त्यांना पकडण्यासाठी एक टीम नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक माकडांना पकडून जंगलात सोडून देण्याचे काम करेल. शहाबादचे उपजिल्हाधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, माकडांचा हैदोस कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तालुका पातळी- वर माकडांना पकडून जंगलात सोडून देण्यात येईल, असे ते म्हणाले.