लढता लढता मेलेले बरे

0
67

एका गल्लीतला कुत्रा सहज फेरफटका मारावा म्हणून एका दुसर्‍या गल्लीत फिरायला गेला असता हा कोण उपटसुंभ आपल्या हद्दीत घुसला असा विचार करीत त्या गल्लीतली पाच पंचवीस कुत्री त्या कुत्र्याच्या पाठी लागली, तेव्हा भीतीने तो कुत्रा पळू लागला. पण शेवटी पळून पळून थकल्याने आपण आता यांच्या तावडीतून सुटत नाही. आपण नक्कीच प्राणाला मुकू, तेव्हा यांच्या तावडीत सापडून मरण येणारच असेल तर लढून मेलेले काय वाईट? असा विचार मनात येऊन तो कुत्रा गर्रकन पाठीमागे फिरला आणि मोठमोठ्याने गुरकावून त्या कुत्र्यांच्या कळपावर तुटून पडला. त्याचा तो आवेश पाहून धावून आलेले कुत्रे भीतीने पळून गेले.

तात्पर्य – संकटाचा सामना धैर्याने केल्यास संकटातून सुटका होते.