जीवन चक्र-कर्म चक्र

0
97

काही चांगले बियाणे पेरले असावेत त्यामुळे त्याचे भरपूर पिके त्यांना या जन्मात मिळत आहे किंवा मग हिसका, ओढा आणि जमा करा या नितीवर चालून ते स्वतःसाठी संपत्ती जमा करत असतील, सुखाला भोगणारे हे लोक दुर्भाग्यवश हे विसरून जातात की, न दिसणारी सोन्याची बेडी घालून ते नकळत अडचणीत फसत आहे. एक सामान्य म्हण आहे की, मोठ्या लोकांचा राजवाडा गरिबांच्या घाम पण अश्रूंनी बनतो. चांगले बियाणे पेरल्याशिवाय कोणी चांगली पिके कसे काढू कल ? हे संभव आहे की काही पापाचे ओझे त्याच्यावर असू शकते. यापुढे त्याने चांगले जर बियाणे पेरले नाही, तर भविष्यात त्याला चांगल्या फळाची अपेक्षा कशी आणि किती काळ करता येईल ? याशिवाय चांगले कर्म त्याला त्याच्या वाईट कर्माच्या फळांपासून मुक्त करू शकत नाही. ज्याप्रकारे घाणेरड्या पाण्याने स्वच्छ धुतले जाऊ शकत नाही. एका ईसाई संताने म्हटले आहे सर्व सद्गुण आम च्यात असूनही आम्ही सर्व घाणीने भरलेले आहोत. कोणीही स्वच्छ नाही, एकही नाही. मनुष्य नेहमी देवाण-घेवाण किंवा फळ आणि प्रतिफळाच्या नियमानाने बांधलेले असतो. नक्कीच चांगले कर्म करणे ठिक आहे आणि वाईट कर्मा ऐवजी ते करणे चांगले आहे, परंतु हेच सर्वस्व नाही. सदाचारी जीवनाने कोणाला दीर्घकाळ स्वर्गाची प्राप्ती होऊ शकेल जिथे राहून आरामात तो स्वर्गीय सुख मिळू शकतो. परंतु तेथे ही तो त्याच्या सुक्ष्म आणि कारण शरीरात कैद राहतो. अर्थात जन्म मरणाच्या चक्रातून अजून तो मुक्त झाला नाही. कुणीही स्वतःला जोपर्यंत कर्ता मानतो, जन्म-मरणाच्या चक्रातून त्याची मुक्ती होणे अशक्य आहे व त्यास त्याच्या कर्माची फळ भोगावीच लागतील. मनुष्य ’नाम’ अथवा ’शब्द’ शी एकरूप होऊनच उच्च आध्यात्मिक मंडळांमध्ये प्रवेश करू शकतो आणि मग तो अशाप्रकारे जन्म मरणाच्या छायेपासून खूप दूर जातो. अवागमनाच्या जीवनाच्या चक्रातून मुक्त होण्याचा इतर कुठलाही उपाय नाही.

पृथ्वीवर केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनुसार देहरहित आत्म्यांना स्वर्ग किंवा नरकात अपेक्षितपणे जास्त काळापर्यंत राहावे लागते. परंतु या लोकामध्ये कायमचा निवास नसतो. तेथे राहिलो तरी आपण जन्म आणि मृत्युच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. काही धर्मात स्वर्गाला मुक्ती मानतात परंतु हे सत्य नाही. आपल्या आपल्या चांगल्या कर्मानुसार एका निर्धारीत काळापर्यतं स्वर्गातील सुखांचा आनंद घेतल्यानंतर जीवाला पुन्हा मनुष्य शरीर प्राप्त होते. कारण याच जन्मात त्याला देहभासाच्या वर येण्याची संधी मिळते जी त्याला मुक्तीकडे घेऊन जाते. देवी देवतासुद्धा आपला कार्यकाळ पूर्ण केल्यावरही मानव देहाची इच्छा करतात. चांगल्या कर्मावर सर्वजण विश्वास ठेवतात आणि त्यांना योग्य मानतात. परंतु चांगल्या कर्माच्या मार्गावर चालूनही मनुष्याला शेवटी कळते की तो अतृप्त इच्छांच्या आणि वासनांच्या जाळ्यात अडकलेला आहे. अशाप्रकारे नकळत तो कर्माच्या लोखंडी जाळ्यात अडकला जातो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)