मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- शरीरात पित्त कसे तयार होते?

पित्त किंवा बाईल हे तत्त्व आपल्या यकृतात तयार होते. दिवसभरात साधारणतः 700 ते 800 पित्त यकृत तयार करते. पित्त तयार होण्याची प्रक्रिया ही यकृतात सतत होत असते. हे पित्त यकृतातून पित्ताशयात येते. पित्ताशयात हे पित्त साठवले व लेपलशपींीरींश होते. ज्या वेळेला आपण जेवतो विशेषतः आपल्या जेवणात स्निग्ध पदार्थ येतात त्या वेळेला पित्ताशय आकुंचन पावते व हे पित्त आपल्या छोटया आतडीत येते. पित्ताचे मुख्य काम लिपीड्स किंवा चरबीचे पचन करण्याचा असतो. पित्त मुख्यतः पाणी, बाईल सॉल्ट व कोलेस्टेरॉल याने बनलेले असते. काही लोकांना वेळीअवेळी खाल्ल्याने वा तेलकट तुपकट खाल्ल्याने त्रास होतो. अशा वेळेला पोटात दुखणे, जळजळ होणे, उलटीची भावना होणे, ढेकर येत राहणे या सारख्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा वेळेला उलटी द्वारा पित्त काढणे हा एक पर्याय राहू शकतो. उलटी काढतांना ही काळजी घेणे गरजेचे राहते की घशाल व अन्ननलिकेला इजा होणार नाही. असे झाल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. सोपी पद्धत अशी आहे की 2 ते 4 ग्लास पाणी प्यायल्यानंतर आपल्या बोटाने आपल्या पडजीभेला हलक्याने स्पर्श करणे, त्याने उलटी होण्याची प्रक्रिया होते आणि शरीरातील पित्त बाहेर पडते.

हसा आणि शतायुषी व्हा!

गोट्या – आपण घरात नेहमी 5 जण राहणार तू, बाबा, आई आणि मी न दिदी

आजी – नाही रे…तुझे लग्न झाले की 6 होणार…

गोट्या – दिदीचे लग्न झाले की परत 5 होणार

आजी – तुला मुलगा झाला की परत 6 होणार

गोट्या – तू मेल्यावर परत 5 होणार…

आजी – झोप कुत्र्या…

थंडावा देणारे फळे

उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी बहुतांश काम सकाळी व संध्याकाळी आटोपून घेतलेली बरी. सोयीनुसार टोपी, पांढरा दुपट्टा, रूमाल व उन्हाचा गॉगल घेवून उन्हापासून बचाव निश्‍चित करावा. उन्हात बाहेर निघण्या अगोदर एसी, कुलरची थंड हवा घेणे टाळावे. अति उन्हामूळे शरीरात शुष्कता येत असल्याने खरबुज, टरबुज यासारख्या थंडावा देणारया फळांचे सेवन करणे हितकारक ठरते.

सल्ला

कोथिंबीर व कढीपत्त्याच्या काड्या फेकून न देता सावलीत वाळवा व वाटून घ्या. या दही, रायता, पुलावात टाकू शकता.

देवघरासंबंधी

देवघरात देवाला वाहिलेली फुले व हार दुसर्‍या दिवशी काळजीपूर्वक काढा आणि नवीन हार किंवा फूल घाला.

हेल्दी चॉकलेटस्

साहित्य – खजूर 1 वाटी, काळे मनुके – 1/2 वाटी, तीळ -1/4 वाटी, कोको पावडर – 50 ग्रॅम, शतावरी कल्प -1/2 वाटी, तूप -2 चमचे.

कृती – खजुरातील बिया काढून घेणे. काळे मनुके आणि हा खजूर 1 चमचा तूप घालून मिक्सर मधून फिरवून घेणे. त्यातच तीळ आणि शतावरी कल्प घालून पुन्हा मिक्सर मधून फिरवून घेणे. परातीत हे मिश्रण घेऊन त्यात कोको पावडर घालून छान मळून घेणे. एका ताटाला 1 चमचा तूप छान लावून घेणे. परातीतील मिश्रण या तूप लावलेल्या ताटामध्ये पसरून घेणे. वेगवेगळ्या आकारात कापणे. टेस्टी – हेल्दी चॉकलेट्स तयार!

हेल्थ विषयक कानमंत्र

1 आंब्याचे पान 3 महीने खाल्ल्याने अपचन, मुखदुर्गंधी जाते.

नारळाची मुळी मीठाच्या पाण्याने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवावे व ते पाणी दुसर्‍या दिवशी उकळुन प्यायल्याने थॉयराईडचा त्रास नाहीसा होतो.

1 महीना रोज तीळाचे सेवन केल्याने हाड मजबुत होतात.

वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’

सध्या अनेकजण वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. लोक विविध मार्गांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण व्यायाम करून, तर काहीजण डाएट करून वजन कमी करतात. सध्या डाएटिंगसाठी ‘वॉटर फास्टिंग’ करणार्‍यांचे प्रमाण अधिक दिसून येते. ‘वॉटर फास्टिंग’ म्हणने नक्की काय, ते कसे करतात, ‘वॉटर फास्टिंग’ने काय फायदा होतो या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेतली पाहिजेत. वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’ फॉर्म्युला खूप फायदेशीर आहे. उपवास केल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि पचनसंस्थाही चांगली राहते. यासोबतच मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीही राहते. भारतात उपवास आणि धर्म यांचा गहन संबंध आहे. भारतात उपवास करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. आपल्या देशात वस्तुतः लोक देवासाठी उपवास करतात; पण आता काही लोक वजन कमी करण्यासाठी उपवास करतात.

‘वॉटर फास्टिंग’ करताना फक्त द्रव आहार घेऊन उपवास केला जातो. ‘वॉटर फास्टिंग’ करताना अन्नाचे सेवन करण्याऐवजी पाणी, ब्लॅक कॉफी आणि साखर नसलेला चहा असा द्रव आहार घेतला जातो. ‘वॉटर फास्टिंग’ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनांमध्ये पुढे आले आहे. ‘वॉटर फास्टिंग’मुळे जुनाट आजारांचा धोकादेखील कमी होतो. तसेच शरीरातील चरबी कमी करण्यासही मदत होते. अर्थात फायदे अनेक असले तरी ‘वॉटर फास्टिंग’ आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते. ‘वॉटर फास्टिंग’ चुकीच्या पद्धतीने केल्याने शरीराला हानी पोहोचते. ‘वॉटर फास्टिंग’ म्हणजे उपवास. त्यात पाण्याशिवाय दुसरे काहीही खाऊ शकत नाही. आपल्या देशात धार्मिक कारणास्तव अनेक लोक हे व्रत पाळतात; पण आता लोक आपल्या आरोग्याला फायदा व्हावा, यासाठी हे व्रत पाळत आहेत. ‘वॉटर फास्टिंग’ केल्याने शरीरातील जुन्या आणि खराब झालेल्या पेशी पुन्हा विकसित होण्यास मदत होते, असे संशोधनात समोर आले आहे. ‘वॉटर फास्टिंग’ची वेळ 24 तासांपासून तीन दिवसांपर्यंत असू शकते. ‘वॉटर फास्टिंग’ प्रत्येकाच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. हृदय, मूत्रपिंडाचे आजार, मायग्रेन, गाउट, टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असेल तर ‘वॉटर फास्टिंग’ करणे टाळावे. त्याशिवाय गर्भवती महिलांनी ‘वॉटर फास्टिंग’ करू नये. ‘वॉटर फास्टिंग’ सुरुवातीला थोड्या काळासाठी करावे. नंतर हळूहळू वेळ वाढवावा. ‘वॉटर फास्टिंग’ केल्यानंतर लगेचच जड अन्न खाऊ नये. उपवासानंतर हलके अन्नपदार्थ हळूहळू खावेत आणि भरपूर पाणी प्यावे.

पावसाळ्यात मूत्रपिंडाचे विकार जादा

मॉन्सूनच्या बदलत्या ऋतूमध्ये सर्वत्र ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नक्कीच दिलासा मिळाला असला, तरी या हंगामात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. एवढेच नाही, तर पावसाळ्यात संसर्ग आणि किरकोळ आजारांचा धोका वाढला आहे. त्याचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. वेळीच काळजी न घेतल्यास यामुळे किडनीशी संबंधित गंभीर आजार कायमचा मागे लागू शकतो. पावसाळ्यात बाहेरचे काहीही खाणे टाळावे. कारण घाणेरडे पाणी किंवा खराब अन्न खाल्ले गेल्यास किडनीला दुखापत होण्याचा धोका वाढतो. त्याम ुळे या ऋतूत ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिस’चा धोका वाढतो. त्यामुळे किडनीचे कार्य बिघडते. पावसात डेंग्यू, टायफॉइड, डायरिया, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बी चा धोका जास्त असतो. या सर्व आजारांमुळे किडनीचे खूप नुकसान होते. पावसाळ्यात किडनीचे आजार टाळायचे असतील तर काही पथ्ये पाळली पाहिजेत. किडनी पूर्णपणे स्वच्छ ठेवायची असेल किंवा संसर्गापासून वाचवायची असेल, तर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी किंवा रस प्यावा. पावसाळ्यात पाणी उकळून थंड झाल्यावर प्यावे. याशिवाय तुम्ही फळांचा रस, ताक तसेच इतर ज्यूस पिऊ शकता. या काळात हात साबणाने वारंवार धुवावेत. डास न वाढण्याचा प्रयत्न करावा.

चार आठवडे आधीच मिळतो हृदयविकाराचा इशारा

उच्च कोलेस्टेरॉल ही एक गंभीर समस्या आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळे आपण हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतो. कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. तो शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असतो; परंतु मर्यादेबाहेर पातळी वाढते, तेव्हा तो हृदयविकार, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढवू शकतो. तथापि, कोलेस्ट्रॉल रक्ताम ध्ये आढळते, शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा शरीर सतत त्याचे संकेत देते, ते ओळखून उपचार करणे आवश्यक ठरते. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात सहा लक्षणे दिसतात. अनियंत्रित उच्च रक्तदाब अनेकदा उच्च कोलेस्ट्रॉल पातळीशी जोडला जाऊ शकतो. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे धमन्या कठोर होऊ शकतात. त्यामुळे प्रतिरोधक क्षमता आणि रक्तदाब वाढतो. रक्तदाब 130/80 पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांशी उच्च कोलेस्टेरॉलच्या शक्यतेबद्दल चर्चा करणे महत्त्वाचे ठरते. कारण दोन्ही परिस्थितींमुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो.

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदय किंवा फुफ्फुसात रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार झाल्यामुळे अनेक अवयवांना ऑक्सिजनसमृद्ध रक्ताचा पुरवठा होण्यात मर्यादा येतात. यामुळे श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. कोणतेही कष्ट न करता श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. छातीत दुखणे किंवा अस्वस्थतेला एनजाइना असेही म्हणतात. हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. प्लाक तयार झाल्यामुळे धमन्या ब्लॉक होतात, तेव्हा ते हृदयाचा रक्तप्रवाह प्रतिबंधित करते. यामुळे छातीत दुखणे, घट्टपणा किंवा दाब होऊ शकतो. थकवा आणि अशक्तपणा हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. धमन्या प्लेकने अडकतात, तेव्हा रक्तप्रवाह आणि विविध अवयव आणि स्नायूंना ऑक्सिजन वितरणास अवरोधत निर्माण होतो. त्यामुळे थकवा येतो आणि ऊर्जा पातळी कमी असते. असे असल्यास सावध झाले पाहिजे. उच्च कोलेस्टेरॉल असल्यास त्वचेवर पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे चट्टे गुडघे, हात आणि पायांवर दिसतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. त्यामुळे हाताला मुंग्या येतात.