पावसाळ्यात मूत्रपिंडाचे विकार जादा

0
132

मॉन्सूनच्या बदलत्या ऋतूमध्ये सर्वत्र ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नक्कीच दिलासा मिळाला असला, तरी या हंगामात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. एवढेच नाही, तर पावसाळ्यात संसर्ग आणि किरकोळ आजारांचा धोका वाढला आहे. त्याचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. वेळीच काळजी न घेतल्यास यामुळे किडनीशी संबंधित गंभीर आजार कायमचा मागे लागू शकतो. पावसाळ्यात बाहेरचे काहीही खाणे टाळावे. कारण घाणेरडे पाणी किंवा खराब अन्न खाल्ले गेल्यास किडनीला दुखापत होण्याचा धोका वाढतो. त्याम ुळे या ऋतूत ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिस’चा धोका वाढतो. त्यामुळे किडनीचे कार्य बिघडते. पावसात डेंग्यू, टायफॉइड, डायरिया, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बी चा धोका जास्त असतो. या सर्व आजारांमुळे किडनीचे खूप नुकसान होते. पावसाळ्यात किडनीचे आजार टाळायचे असतील तर काही पथ्ये पाळली पाहिजेत. किडनी पूर्णपणे स्वच्छ ठेवायची असेल किंवा संसर्गापासून वाचवायची असेल, तर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी किंवा रस प्यावा. पावसाळ्यात पाणी उकळून थंड झाल्यावर प्यावे. याशिवाय तुम्ही फळांचा रस, ताक तसेच इतर ज्यूस पिऊ शकता. या काळात हात साबणाने वारंवार धुवावेत. डास न वाढण्याचा प्रयत्न करावा.