पूर्वज होते ‘ऑल राऊंडर’!

0
93

मानवाचे पूर्वज ‘होमो नलेडी’बाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, हे पूर्वज ‘ऑल राऊंडर’ होते. याचा अर्थ ते झाडावरही राहू शकत होते आणि जमिनीवरुन ताठपणे चालूही शकत होते. तसेच ते दगड किंवा काठ्यांसारखी साधने वापरण्यातही कुशल होते.हामो नलेडी मानवाच्या हात आणि पाय संरचना तसेच कार्याबाबत दोन नवी संशोधने करण्यात आली आहेत. त्यानुसार हे मानव विशिष्ट पद्धतीने झाडावर चढण्यास आणि जमिनीवरुन चालण्यास सक्षम होते. दक्षिण आफ्रिकेत विटवाटर्सरँड विद्यापीठातील संशोधकांच्या एका पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी 2013 पासून आतापर्यंत रायजिंग स्टार गुहांमधून 1550 अवशेषांना शोधून त्यांचे निरीक्षण केले आहे. या गुहा जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट आहेत. विल्यम हारकोर्ट स्मिथ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे एक संशोधन केले असून, दुसरे संशोधन ट्रेसे किवेल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.