स्मार्टफोन वापराबाबत नवं संशोधन

0
106

स्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा जणू काही अविभाज्य भाग बनला आहे. केवळ कॉल करणे किंवा घेणे इतक्या कामासाठी हे उपकरण मर्यादित नाही. हे एक बहुपयोगी उपकरण बनवलेले आहे. सर्चिंगपासून ऑनलाईन पेमेंटपर्यंत अनेक कामे फोनच्या सहाय्याने केली जात असतात. आता ‘विनो’ने एक रिसर्च प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारतात स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर कशासाठी केला जातो याचा खुलासा झाला आहे. जर स्मार्टफोनवर यूजर अक्टिव्हिटीचा विचार केला तर स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर हा युटिलिटी (उपयुक्त वस्तूंच्या) बिलाचे पेमेंट करण्यासाठी होतो असे दिसून आले. रिपोर्टनुसार सुमारे 86 टक्के लोक फोनवरून यूटिलिटी बिलाचे पैसे देतात. ऑनलाईन शॉपिंंगसाठी स्मार्टफोनचा वापर सुमारे 80.8 टक्के केला जातो. तसेच सुमारे 61.8 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर ज़रूरी सामानाची ऑर्डर देण्यासाठी करतात. ऑनलाईन सर्व्हिससाठी 66.2 लोक स्मार्टफोन वापरतात. याशिवाय ग्रॉसरी आयटम म्हणजेच किराणा मालाची ऑर्डर देण्यासाठी 73.2 टक्के लोक स्मार्टफोन वापरतात. डिजिटल कॅश पेमेंटसाठी 58.3 लोक स्मार्टफोन वापराच्या प्रमाणाचा विचार केला तर सुमारे 62 टक्के पुरूषांकडे स्मार्टफोन असतो. महिला याबातीत मागे असल्याचे दिसून आले. देशात केवळ 38 टक्के महिलांकडेच स्मार्टफोन आहे. मोठी शहरे आणि छोट्या शहरांची तुलना केली तर 58 टक्क्यांसह मेट्रो पुढे आहेत. त्यानंतर 41 टक्क्यांसह नॉन मेट्रो सिटींचा क्रमांक लागतो.