85 हजार रुपयांची भाजी!

0
105

सध्या आपण टॉमॅटोच्या आणि अन्यही काही भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे त्रस्त आहोत. अशा स्थितीत एक भाजी अशी आहे जिची किंमत आपले डोळे विस्फारू शकते. युरोपियन देशांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली आणि ‘जगातील सर्वात महाग भाजी’म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भाजीचे नाव आहे ‘हॉपशूटस्’ही भाजी इतकी महाग असण्याचे कारण म्हणजे या हॉपशूटस्मध्ये अनेक औषधी गुणधर्म भरपूर आहेत. या भाजीची किंमत सुमारे 85 हजार रूपये किलो असून भारतात या भाजीची लागवड सहसा केली जात नाही. अनेक मिडिया रिपोर्टनुसार, सर्वात आधी हिमाचल प्रदेशच्या शेतात याची लागवड करण्यात आली होती. एका अहवालानसार, हॉप शूटस् कापणीसाठी ‘बॅक-ब्रेकिंग’आहेत आणि हेच एकमेव कारण आहे की हॉपशॅटसची किंमत इतकी महाग आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मूळच्या लोकांनी जगातील सर्वात महागड्या भाजीची लागवड करण्यास सुरूवात केली. ही वनस्पती मध्यम गतीने 6 मीटर (19 फूट 8 इंच) पर्यंत वाढू शकते आणि सुमारे 20 वर्षे जगू शकते. हॉपशूटला कापणीसाठी तयार होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागतो. या वनस्पतीची कापणी करण्यासाठी बरेच शारीरिक श्रमही करावे लागतात, कारण वनस्पतीच्या लहान हिरव्या टोकांना तोडताना अतिशय काळजी घेणे आवश्यक असते. वैद्यकीय अभ्यासानुसार, असे सूचित केले गेले आहे आहे की, भाजी क्षयरोगाविरूद्ध अँटीबॉडी बनवू शकते तसेच चिंता, निद्रानाथ, अस्वस्थता, तणाव, अटेंशन डेफिसिट-हाइपरक्टिविटी डिसऑर्डर अशा विविध समस्यांवर मदत करते. या भाजीचा वापर मद्य, हर्बल चहा, हर्बल, औषधे, शीतपेये अशा वेगवेगळ्या उत्पादनांसाठी केला जात असतो.