आरोग्य

0

द्राक्षे आहे नॅचरल टॉनिक

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेल्या मनुकाही एक
चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. काळ्या मनुकांच्या सेवनाने
रत वाढते व हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. लहान मुले व विशेषता महिलांनी याचे सेवन केल्यास
हिमोग्लोबीनमध्ये लक्षणीय वाढ होत

दैनिक पंचांग बुधवार, दि. ६ डिसेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, उत्तरा ३०|२९
सूर्योदय ०६ वा. २१ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य-
मेष : कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल
राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील.

वृषभ: व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. एखाद्या
मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक
विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस.
कर्क:  मान-सन्मानात वाढ होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल.

सिंह : न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील.
यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे. प्रलंबित देणी आल्यामुळे
आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.

कन्या: आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आपल्या करीयरमधील
ध्येयपूर्ती कराल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ: आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात.
आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करेल.

वृश्चिक : आपल्या क्रोधावर संयम ठेवाल आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळाल.
आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील.

धनु : अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य
उत्तम राहील.

मकर : शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. दिवस
संमिश्र जाईल.

कुंभ: आर्थिक नुकसानीची शयता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित
प्रश्न उभे करेल. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात.

मीन : धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान
वाढेल. व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण.जोडीदाराशी वादविवाद टाळा.

                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

वजन वाढलाय का ? पोट फुगलाय का ?

0

पोटाचा घेर वाढणं हे वजन वाढण्याचं पहिलं लक्षण मानलं जातं. मात्र वाढलेलं पोट हे प्रत्येक वेळी वजन वाढल्याचं
लक्षण असतंच असं नाही. कारण पोटफुगीमुळेही ते मोठं वाटू शकतं. पोटात पाणी आणि गॅस असेल तर ते फुगल्यासारखं
वाटतं. आपल्याला पोटफुगीचा त्रास आहे की वजन वाढतंय, हे कसं ओळखायचं याविषयी…
 जेवण झाल्यावर किंवा मुलींना मासिक पाळी दरम्यान पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. पण हा त्रास ठराविक
काळासाठी जाणवतो. ठराविक काळात पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर हे वजन वाढल्याचं लक्षण नाही तर
ठराविक काळासाठी होणारी पोटफुगीची समस्या आहे असंसमजावं. जास्त मीठ खाल्यामुळेही पोट फुगल्यासारखं
वाटू शकतं.
 पोटाकडे नीट लक्ष द्या. फत पोटच फुगलं आहे का शरीराचा इतर भागही फुगीर झाला आहे याचं निरिक्षण करा.
शरीराचा इतर भागही फुगीर वाटत असेल तर हे वजनवाढीचं लक्षण आहे. पण पोटच फुगलं असेल तर हे गॅसमुळे होऊ
शकतं.
 पोटावर थोडा दाब देऊन बघा. पोट टणक वाटलं तर ही पोटफुगी आहे हे समजावं. सर्वसाधारणपणे आपलं पोट मऊ
आणि स्पंजसारखं असतं. वजन वाढलं तरी ते तसंच राहतं.त्यामुळे पोट सहज आत जात असेल तर हे वजनवाढीचं
लक्षण आहे. अन्यथा, तुम्हाला गॅस किंवा पोटफुगीचा त्रास आहे.
 डिहायड्रेशनमुळे पोट फुगू शकतं. तसंच जास्तीचं मीठ पोटफुगीला कारणीभूत ठरतं. पोटफुगी कमी करण्यासाठी
नियमित व्यायाम करा.

तिसर्‍याचा लाभ

तिसर्‍याचा लाभ

उन्हाळा फार कडक पडला होता. अरण्यात कुठे पाण्याचा टिपूस नजरेस पडत नव्हता. अशा
वेळी पाण्याच्या शोधात फिरत- फिरत एका डबयाजवळ सिंह आणि रानडुक्कर एकाच वेळी
आले. प्रथम कोण पाणी पिणार, यावरुन दोघांचे भांडण जुंपले. कोणीच कोणाचे ऐकेना. शेवटी
ते एकमेकांच्या अंगावर धावून जात एकमेकांना रक्तबंबाळ करु लागले. मग थकून थोडा वेळ
विश्रांती घ्यावी, म्हणून ते थांबले असता, ” येथे कोणाचा तरी मुडदा पडेल आणि त्यावर आपल्याला
ताव मारता येईल” असे वाटून आकाशात गिधाडे घिरट्या घालू लागली. “आकाशात घिरट्या
घालणारी गिधाडे पाहताच व त्याचे मर्म लक्षात येताच रानडुक्कर सिंहाला म्हणाले, ” अरे आपण
असेच एकमेकांशी भांडून एकमेकांना ठार करावं आणि या क्षुद्र गिधाडांनी आपल्या मांसाचे तुकडे
तोडावेत, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? त्यापेक्षा हे भांडण मिटलेले बरं.” हे म्हणणं सिंहालाही पटलं,
तेव्हा रानडुक्कर म्हणाले, “मग सिंह महाराज, तुम्हीच पाणी प्या प्रथम.” तेव्हा सिंह म्हणाला,
“नको, तूच पी.” यावर रानडुक्कर म्हणाले, “नाही महाराज, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे म्हणून
तुमचाच मान प्रथम. आता प्या पाणी.”

तात्पर्य : तडजोड करुन भांडण मिटविले, तर नुकसान होत नाही

 

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

चीनची भिंत कोणी व का बांधली?

युरी गागारिन या अंतराळवीराने पहिल्यांदा जेव्हा पृथ्वीप्रदक्षिणा केली तेव्हा पृथ्वीवरच्या ज्या

प्रमुख खुणा त्यानं बघितल्या, त्यांत जगातल्या सात आश्चर्यांत समाविष्ट होणारी चीनची भिंतही होती.  चीनची भिंत हे ’चायनीज वॉल’ चं मराठी भाषांतर आपण गेली कित्येक वर्षे वापरतोय. प्रत्यक्षात ती  तटबंदी आहे.

ही भिंत १६८४ मैल लांब (२६९५ कि. मी.) असून तिची उंची ४ ते १० मीटर आहे.तर जाडी १० मीटर आहे. ही भिंत बांधायला इ. स. पूर्व २२१ मध्ये सुरुवात झाली आणि १५ वर्षांनंतर ती पूर्ण झाली. शिह-हुंग-ली या चिनी सम्राटानं चीनमधली छोटी छोटी राज्ये एकत्र करून इ. स. पू. २४६ मध्ये चिनी साम्राज्याची स्थापना केली होती. चीनच्या उत्तरेला क्रूर असे मंगोल लोक होते.  त्यांच्याकडून आपल्या साम्राज्यास धोका पोहोचू नये.

म्हणून शिह-हुंग-लीने ही भिंत बांधायचा निर्णय घेतला. अर्थात याचा उपयोग झाला नाही तो नाहीच. १५ वर्षे बांधकाम चाललेल्या या भिंतीपायी निम्मी चिनी जनता वेठबिगार करत होती, या बांधकामात हजारो कामगार मृत्युमुखी पडले. यामुळे चिनी क्रौर्याचे प्रतीक म्हणून या भिंतीकडे बघण्यात येते.

हसा आणि शतायुषी व्हा!

0

मुलगी : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?
मुलगा : एखाद्या व्यतीला आपल्या नियंत्रणात करुन त्याच्याकडून
पाहिजे ते काम करुन घेणे
मुलगी : चल खोटारडा कुठला…याला तर ‘बॉयफ्रेंड’ म्हणतात.

मिक्स भाजी रोल

0

मिक्स भाजी रोल

साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, चवीनुसार  मीठ, पाऊण चमचा मीठ, पाऊन चमचा तेल. कांदा १ उभा पातळ चिरलेला. कोबी अर्धी वाटी बारीक लांब चिरलेला, सिमला मिरची १ बारीक चिरून, गाजर किसलेले २ चमचे, दुधी भोपळा व श्रावणी घेवडा बारीक चिरलेला १ वाटी, लसूण आलं वाटलेले १ चमचा,  कोथिंबीर, मीठ, तेल अर्धा चमचा.

कृती:  पीठात अर्धा चमचा तेल घाला. जीरे, मीठ व पाणी घालून पीठ डोसासाठी भिजवतात त्याप्रमाणे पीठ भिजवावे. सर्व भाज्या तेलात परतून भाजी बनवावी. पाणी घालू नये. तव्याला तेल लावून भिजवलेले पीठ  जाडसर पसरावे. बाजूने थोडे तेल सोडावे. झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. नंतर दुसरी बाजू उलटून धिरडे बनवावे. धिरड्यालानारळाची चटणी लावून त्यावर भाजी पसरावी आणि धिरडे गुंडाळावे

 

केसांची मुळे बळकट करण्यासाठी

डोक्यावरील सर्व केस पुढे पाडून विंचरा, डोके डावीकडे झुकवून केस डावीकडे पाडून

व उजवीकडे डोके करून केस उजवीकडे पाडून विंचरावेत. यामुळे केसांची मुळे बळकट

होऊन केस चमकदार व निकोप होतात.

संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0

स्वयंपाककर्त्या स्त्रीचे तोंड पूर्वेस असावे. दक्षिण दिशेला घरातील किचन प्लॅटफॉर्म (स्वयंपाकाचा ओटा) असू नये. यामुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

सल्ला

0

टोमॅटोच्या साली काढण्यासाठी

* जर टोमॅटोच्या साली काढावयाच्या  असतील थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून

नंतर त्यांच्या साली काढा. साली सहजतेने निघतील.

* लिंबू शरीरातील पाचकरस वाढवते पालक हाडे कॅल्शियमने बळकट करते.

पालेभाज्यांमध्ये लोह जास्त असते.

* चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर

टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने साबणाच्या पाण्याने धुवावे.