आरोग्य

0

कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदीक औषधे संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस तुळस चार भाग, सुंठ दोन  भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे.

वरील  औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल/खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.

सुविचार

विनाशाचे व पापाचे मुख्य कारण म्हणजे भय. – स्वामी विवेकानंद

दैनिक पंचांग मंगळवार, दि. ५ डिसेंबर २०२३

कालभैरव जयंती, कालाष्टमी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष,
पूर्वा २७|३८सूर्योदय ०६ वा. २० मि. सूर्यास्त ०६वा. ३० मि.

राशिभविष्य-
मेष : पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील.
सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडेलक्ष द्या.

वृषभ:  नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस
आनंदात घालवाल. मागील देणी वसुल होतील. आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी
आजचा दिवस उत्तम आहे.

मिथुन: विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू
शकाल. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल. शत्रू प्रभावहीन ठरतील.

कर्क : मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली
यातूनही आज आनंद मिळवू शकता. आनंदाची बातमी मिळेल.

सिंह: आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा. मनाच्या
एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल.

कन्या: स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात.
मौजमजेत दिवस व्यतीत होईल.

तूळ: देण्या-घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा.
वाहने सावकाश चालवावीत. एखाद्या महत्वाच्याव्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. कौटुंबिक
प्रश्नांचे निराकरण होईल.

वृश्चिक:  शारीरिकस्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल. मागील उधारी
उसनवारी वसुल होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. नोकरदार व व्यापारी
बंधूंना लाभ मिळेल.

धनु: आज अध्यात्माकडे कल राहिल. जुने मित्र व नातेवाईक यांच्या सहवासामुळे
दिवस आनंदात व्यतीत होईल. तब्येत सांभाळा. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.
चांगले भोजन मिळेल.

मकर: उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवून कार्ये शांततेत केल्यास आजचा दिवस हा
यशदायी ठरेल. उधारी वसुल होईल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या.

कुंभ:  हितशत्रुंपासून पिडा संभवते. संततीसौख्य लाभेल. कोर्ट-कचेरी आदी
गोष्टींपासून लांब रहा. कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा.

मीन : आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यतीवर विश्वास ठेवू नका. आजचा दिवस आपणास                              पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे.

                                                                        संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

 

शेतकर्‍याची आळशी मुले

 

एका गावात एक शेतकरी राहत होता. दिवसभर
शेतात राबून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित
असे. त्याला चार मुले होती. आता ती मोठी झाली
होती. पण त्यांना काम करण्याचा, शेतात राबण्याचा
फारच कंटाळा. आयते खाऊन टिवल्या-बावल्या
करण्यातच त्यांचा वेळ जात असे. आता तो शेतकरी
फारच म्हातारा झाला होता. कधी मरण येईल, याचा
भरवसा नव्हता. आपल्यानंतर आपल्या मुलांचे कसे
होणार, याची त्याला चिंता लागली होती.

म्हणून एके दिवशी त्याने आपल्या चारही
मुलांना जवळ बोलावून सांगितले, “मुलांनो, माझा
आता काही भरोसा नही. मी सर्व जमीन, त्यातील
बागा तुमच्या स्वाधीन करतो आहे. याच जमिनीत
कुठे तरी मी पैसा पुरून ठेवला आहे. आता नेमका
कुठे, ते मला आठवत नाही. तुम्ही सर्व जमीन
खोदून काढा. कुठे तरी तो तुम्हाला सापडेल.” हे
ऐकून मुलांना फारच आनंद झाला. आयते घबाड
हाती पडेल, असे त्यांना वाटले.

उद्याच्या उद्या शेतं खांदायला सुरुवात करू,
असे म्हणून ते झोपी गेले. सकाळी बघतात, तो
म्हातारा मरण पावलेला. मग त्याचे सर्व क्रियाकर्म
केल्यावर सर्व आले. जमिनीची चांगली मशागत
केली, तर पीक चांगले येऊन पैसाही हाती येतो,
हे त्यांना कळून चुकले. वडिलांच्या सांगण्याचा हाच
अर्थ, हे त्यांना मनोमन पटले.

तात्पर्य  : धन-पैसा कशाही स्वरूपात मिळतो.
प्रत्यक्ष पैसाच मिळाला पाहिजे, असे नव्हे

हसा आणि शतायुषी व्हा!


आज गण्याने कमालच केली पुन्हा बँकेत जाऊन झोपला
कारण तिथे लिहिले होते की ‘यहाँ सोने पर लोन मिलता है

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

कुंकू लावल्याने महिलांना कोणते लाभ मिळतात?

एक नवीनच लग्न झालेला फॉरेस्ट ऑफीसर आपल्या पत्नीसोबत जंगलातील क्वार्टरमध्ये रहात
होता. त्याच्या पत्नीला ब्लीडिंगचा त्रास सुरू झाला. रक्त जाणे थांबतच नव्हते. शहरातील डॉटरकडे
बायकोला घेऊन गेला. डॉटरांनी खुप प्रयत्न केले. शेवटी डॉटर म्हणाले की, तुमची पत्नी वाचणे
कठीण आहे. तीच्या काही इच्छा असतील तर त्या पुर्ण करा. फॉरेस्ट ऑफीसर आपल्या पत्नीला
घेऊन परत जंगलातील क्वार्टरमध्ये आला. फॉरेस्ट ऑफीसर चिंता करत होता की, काय करावे?
तेवढ्यात तेथे जंगलातील आदीवासी म्हातारा आला. त्याने ऑफीसरला विचारले की, काय
झाले? ऑफीसरने सर्व सांगीतले. तेव्हा तो म्हातारा म्हणाला की, मी सांगतो तसे कर.
म्हातार्‍याने शुद्ध कुंकू व एक केळ आणायला लावले. केळ सोलून फाकवून त्यात ते शुद्ध कुंकू
घातले. आणी ते केळ ऑफीसरच्या पत्नीला खायला दिले. तासा दोन तासाने तीन वेळेस अशी तीन केळ
खायला दिली. काय आश्चर्य! ब्लीडिंग थांबले. तीन चार दिवसात त्याची बायको चालायला व फिरायला
लागली. लहान मुली व लग्न झालेल्या महीला या कपाळावर कुंकू लावतात. जिथे कपाळावर कुंकू लावतात तेथे
अयुप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्डचा पॉईंट आहे तसेच तेथे आज्ञाचक्र पण आहे.

तीथे शुद्ध कुंकू लावले
की, कुंकवातील द्रव्य तीथे ऍबसॉर्व्ह होऊन पिच्युटरी ग्लॅण्ड एटीव होते. त्यामुळेच शरीरातील
हार्मोन्स सिक्रीशन व्यवस्थित होते. म्हणुनच पुर्वी महिलांना मासीक पाळीचे त्रास जास्त होत नव्हते.
हळदीच्या शुद्ध कुंकवाचे टिंचर करून ते होमिओपॅथिक पद्धतीने सुक्ष्म करून त्याची साखर
केल्यास आणि मासीक पाळीचा त्रास असलेल्या महीलांना खायला दिल्यास तीन ते चार महिन्यात
त्यांचा मासीक पाळीचा त्रास कमी होऊन पाळी नॉर्मल होऊ लागते. कुंकवाच्या गोळ्या करून
दिल्या त्यामुळेच चार दिवसांनंतर होणारे ब्लीडिंग थांबले. आपल्या पुर्वजांनी लग्न झालेल्या महीलांनी
दररोज कुंकू लावावे, हि प्रथा पाडून आपल्या घरातील महीलांचे आरोग्य संभाळले.
पण आज ज्या सुशिक्षित, फॉरवर्ड महीला आहेत, त्यांना कुंकू लावायला लाज वाटते किंवा
कमीपणाचे वाटते. त्या कुंकवाऐवजी टिकली लावतात. हि गोष्ट खूप चुकीची आहे. जो फायदा
कपाळावर कुंकू लावून होतो तो फायदा टिकली लावून मिळत नाही. कपाळावर कुंकू लावताना किंवा
औषध म्हणून घेताना, ते कुंकू शुद्ध असणे खुपच आवश्यक आहे. मात्र कुंकू शुद्ध आहे की नाही याची
दक्षता जरुर घ्यावी. शुद्ध कुंकवाला हळदीचा वास येतो. थोडे कुंकू हातावर घेऊन त्यात थोडा ओला
चुना मिसळला तर शुद्ध कुंकू काळे पडते पण जर त्या कुंकवात भेसळ असेल तर ते लाल होते.

सुविचार

 

महान समुद्राच्या अजस्र लाटांमध्ये ज्याप्रमाणे लहान होडी बुडून जाते,
तद्वत विवेकाची जोड नसणारा पराक्रम लोप पावतो. – बेकन.

वास्तू

0

* झोपण्याच्या खोलीत नेहमी सुंदर,
कलात्मक व हसणार्‍या बाळाची प्रतिमा
लावा.
* जेवणाच्या खोलीचा रंग शांत आणि
शीतलता प्रदान करणारा असावा.
* च्युइंगम चावल्याने मानसिक क्षमतेत
पन्नास टक्के इतका फायदा होऊ शकतो. याने
आपला हार्ट रेट वाढतो आणि या कारणाने
रक्ताचा असरही वाढतो. यामुळे मेंदूतील
ऑसिजनचे प्रमाण वाढते.
* ईशान्य कोपर्‍यामध्ये एक अंडरग्राऊंड
वॉटर टँक निर्माण करून तसेच त्यात
पाण्याचा साठा करून त्या क्षेत्रातील वास्तुदोष
दूर करता येतात.
* आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये
ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज
चिरता व किसता येते.
* सर्दी-पडसे झाल्यास मोहरी पूड
थोडी मध घालून चाटावे. लवंगतेल हुंगावे.
* ओवा भाजून मीठ मिसळून खाणे.
हळद पूड, गूळ, हिंगपूड मिसळून वरचेवर
चिमुटभर खावे.

                                                                 संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

 

सल्ला

0

 

* आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये

ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज

चिरता व किसता येते.

* सर्दी-पडसे झाल्यास मोहरी पूड

थोडी मध घालून चाटावे. लवंगतेल हुंगावे.

* ओवा भाजून मीठ मिसळून खाणे.

हळद पूड, गूळ, हिंगपूड मिसळून वरचेवर

चिमुटभर खावे.

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

* पपई-चेहर्‍यावर सुरकुत्या दिसत

असतील तर पपईचा गर काढून चेहर्‍यावर

लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.