टोमॅटोच्या साली काढण्यासाठी
* जर टोमॅटोच्या साली काढावयाच्या असतील थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून
नंतर त्यांच्या साली काढा. साली सहजतेने निघतील.
* लिंबू शरीरातील पाचकरस वाढवते पालक हाडे कॅल्शियमने बळकट करते.
पालेभाज्यांमध्ये लोह जास्त असते.
* चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर
टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने साबणाच्या पाण्याने धुवावे.