वजन वाढलाय का ? पोट फुगलाय का ?

0
28

पोटाचा घेर वाढणं हे वजन वाढण्याचं पहिलं लक्षण मानलं जातं. मात्र वाढलेलं पोट हे प्रत्येक वेळी वजन वाढल्याचं
लक्षण असतंच असं नाही. कारण पोटफुगीमुळेही ते मोठं वाटू शकतं. पोटात पाणी आणि गॅस असेल तर ते फुगल्यासारखं
वाटतं. आपल्याला पोटफुगीचा त्रास आहे की वजन वाढतंय, हे कसं ओळखायचं याविषयी…
 जेवण झाल्यावर किंवा मुलींना मासिक पाळी दरम्यान पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. पण हा त्रास ठराविक
काळासाठी जाणवतो. ठराविक काळात पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर हे वजन वाढल्याचं लक्षण नाही तर
ठराविक काळासाठी होणारी पोटफुगीची समस्या आहे असंसमजावं. जास्त मीठ खाल्यामुळेही पोट फुगल्यासारखं
वाटू शकतं.
 पोटाकडे नीट लक्ष द्या. फत पोटच फुगलं आहे का शरीराचा इतर भागही फुगीर झाला आहे याचं निरिक्षण करा.
शरीराचा इतर भागही फुगीर वाटत असेल तर हे वजनवाढीचं लक्षण आहे. पण पोटच फुगलं असेल तर हे गॅसमुळे होऊ
शकतं.
 पोटावर थोडा दाब देऊन बघा. पोट टणक वाटलं तर ही पोटफुगी आहे हे समजावं. सर्वसाधारणपणे आपलं पोट मऊ
आणि स्पंजसारखं असतं. वजन वाढलं तरी ते तसंच राहतं.त्यामुळे पोट सहज आत जात असेल तर हे वजनवाढीचं
लक्षण आहे. अन्यथा, तुम्हाला गॅस किंवा पोटफुगीचा त्रास आहे.
 डिहायड्रेशनमुळे पोट फुगू शकतं. तसंच जास्तीचं मीठ पोटफुगीला कारणीभूत ठरतं. पोटफुगी कमी करण्यासाठी
नियमित व्यायाम करा.