रोबो बनले शिक्षक

विविध कामांसाठी रोबोंचा वापर केला जातो. विविध बँकांमध्ये रोबो मानवी कर्मचार्‍यांची जागा घेऊ लागले आहेत. सुरक्षेसाठीही रोबो तैनात केले जातात. असे हे रोबो आता शिक्षकाची भूमिका वठवणार आहेत. बंगळुरूमधल्या एका शाळेत हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारे रोबो आणण्यात आले आहेत. हे रोबो शिक्षक म्हणून काम करतील. हे रोबो माणसासारखेच दिसतात. ते विविध विषय शिकवण्यासोबतच संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्नही करणार आहेत. हे रोबो सातवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सात विषय शिकवतात. या रोबोंना म हिलेचं रुप देण्यात आलं आहे. ते ‘ईगल २.०’ या नावाने ओळखले जातात. १७ सदस्यांच्या टीम ने या रोबोंची निर्मिती केली आहे. अशा पद्धतीचा एक रोबो बनवण्यासाठी आठ लाख रुपये खर्च आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या रोबोंच्या निर्मितीसाठी दोन वर्षांचा काळ लागला. त्यांचं वजन ४५ किलो आहे. ईगल २.० प्रकारातले तीन रोबो तयार करण्यात आले आहेत. अशा रोबोंमुळे शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार नसल्याचं हे रोबो तयार करणार्‍या टीमचे प्रमुख विघ्नेश राव यांनी सांगितलं.

पाण्याचा रंग अचानक झाला गुलाबी

तलावाच्या निळ्या पाण्याचा रंग अचानक गुलाबी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला; मात्र त्यानंतर त्यामागचे कारणही समोर आले. ते चिंताजनक आहे. हा तलाव अमेरिकेतील हवाई येथे आहे. रिफ्युजी मॅनेजर ब्रेट वोल्फ यांनी सांगितले की त्यांना सर्वात आधी याची माहिती जवळून जाणार्‍या एका व्यक्तीने दिली. हा माणूस म्हणाला, ‘तिथे काहीतरी विचित्र घडत आहे.’ सुरुवातीला सगळ्यांनी तो विनोद म्हणून घेतला; परंतु तलावाच्या गुलाबी रंगाचे कारण चिंताजनक असू शकते, असे अधिकार्‍यांना सांगितले. हा तलाव हवाई येथिल माऊ प्रांतामध्ये आहे. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की गुलाबी रंगामागे दुष्काळ हेदेखील कारण असू  शकते. पूर्वी विषारी शेवाळ हे पाणी गुलाबी होण्यामागील कारण मानले जात असे; परंतु प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून हे कारण नसल्याचे स्पष्ट झाले. त्याऐवजी हॅलोबॅटेरिया नावाचा जीव कारणीभूत असू शकतो, असे आढळले. हॅलोबॅटेरिया हा एक प्रकारचा आर्किया किंवा एकल-पेशी जीव आहे. तो खारट पाण्यात वाढतो. केलिया तलाव परिसरातील क्षारता  सध्या समुद्राच्या पाण्याच्या दुप्पट आहे. वोल्फ पुढे म्हणाले की या तलावाला
यापूर्वी दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या काळात जास्त क्षारता आली; पण त्याचा रंग बदलण्यामागे अजूनही एक रहस्य आहे. त्याचे डीएनए विश्लेषण होणे बाकी आहे. दरम्यान,  लोकांना या पाण्यात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यातले मासे खाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पाण्याचा रंग बदलण्यामागील कारण
शोधण्यासाठी तपास केला जात आहे

हसा आणि शतायुषी व्हा!

चिंटू : काकू, थोडी साखर मागितली आहे आईने
काकू : अजुन काय म्हणत होती आई?
चिंटू : त्या टवळीनी नाही दिली तर समोरच्या जाडी कडून आण

बोकडाचा भोळेपणा

एक कोल्हा सकाळपासून शिकारीसाठी हिंडत होता. दुपार उलटली, तरी त्याला सावज
काही मिळाले नाही. उन्हा-तान्हात हिंडून तहानेने जीव मात्र व्याकुळ झाला. म्हणून तो इकडे-तिकडे
प्यायला कुठे पाणी मिळते का, ते शोधू लागला. एका ठिकाणी त्याला विहीर दिसली, म्हणून पाणी
किती खोल आहे, हे तो विहिरीत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात तोल जाऊन तो विहिरीत
पडला.

आता विहिरीबाहेर कसे पडावे, याचा तो  विचार करीत असता एक बोकडही पाणी पिण्यासाठी
तेथे आला. विहिरीच्या काठावर उभे राहत तो विहिरीत असलेल्या कोल्ह्याला म्हणाला, “काय
रे मित्रा, प्यायला पाणी चांगले आहे का?” त्यावर कोल्हा ढोंगीपणाने म्हणाला, “अरे बोकड़दादा,
पाणी नुसते चांगलेच नाही, अमृतासारखे गोड आहे बघ.” हे ऐकताच मागचा-पुढचा विचार न करता
बोकडाने विहिरीत उडी टाकली. बोकडाची शिंगे चांगलीच लांब होती. कोल्ह्याने ही संधी हेरली.
बोकडाच्या शिंगावर उभा राहात त्याने विहिरीबाहेर उडी मारून संकटातून आपली सुटका करून
घेतली. बोकड मात्र पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊन मरण पावला.

तात्पर्य : लबाड लोकांच्या आमिषाला फसू नये.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

वृत्तपत्रे केव्हा सुरू झाली?

आजकाल दिवस उजाडतो तो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आरोळ्यांनी. या आरोळ्या हीच आपली
भूपाळी ठरते. सकाळी उठून हातात पेपर पडला नाही तर आपण अस्वस्थ बनतो. वृत्तपत्रांतून
घरबसल्या आपल्याला जगभरच्या बातम्या कळतात. सिनेमांच्या जाहिरातीही बघायला मिळतात.
चीनमध्ये सुमारे १००० वर्षांपूर्वी ’चिंग पाव’ नावाचा एक जाहीरनामा निघायचा. चिंग पाव याचा
अर्थ राजधानीतील घडामोडी. या जाहीरनाम्याद्वारे सरकार जनतेला राजधानीतल्या घटनांची माहिती
देत असे.

इ. स. १७७२ मध्ये लंडनमध्ये ’मॉर्निंग पोस्ट’ हे वृत्तपत्र सुरू झाले. हे आधुनिक अर्थाने
खरे वृत्तपत्र. त्याआधी व्हेनिसमध्ये भिंतीवर सरकारी गॅझेटियर चिकटवण्यात यायचे. हे गॅझेटियर का?
तर याची किंमत एक ’गॅझेटा’ होती. पुढे बर्‍याच वृत्तपत्रांनी ’गॅझेट’ हे नाव स्वीकारले.
मध्यंतरी आर्थिक संकटात सापडलेले आणि  संपामुळे बंद झालेले आणि आता पुन्हा चालू होऊन
बंद पडण्याच्या मार्गावर असलेले ’लंडन टाइम्स’ हे आजचे सर्वांत जुने वृत्तपत्र. भारतातल्या
‘बेंगाल गॅझेट’ची सुरुवात ही भारतीय वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात मानण्यात येते. इ. स. १९८० मध्ये भारतीय
वृत्तपत्रसृष्टीची द्विशताब्दी साजरी करण्यात आली.

सुविचार

अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वांत मोठे पाप आहे.

सल्ला

0


* शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्यांना पाणी लावून ते चोळावे त्यानंतर वीस मिनिटांनी
ते भाजण्यास घ्यावे म्हणजे शेंगदाण्याची साले पटकन सुटतील.

* टोमॅटोची आंबट-गोड चटणी तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.

* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात वाळवावीत.
संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

स्वच्छ चेहरा

रात्री चेहर्‍यावर कच्च्या बटाट्याची फोड
चोळावी. सकाळी धुवावे. चेहरा स्वच्छ होतो.

वास्तू

0

बाथरुम संबंधी टिप्स

* बाथरूममध्ये बाथटब पूर्व, उत्तरकिंवा ईशान्य दिशेस असावा.

* शौचालयातील नळ पूर्व किंवा उत्तरदिशेस असावा.

साबुदाण्याची इडली

0

साबुदाण्याची इडली

साहित्य – २०० ग्रॅम साबुदाणा, २०० ग्रॅम दही, २५० ग्रॅम वरईचे तांदूळ, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे

कृति – साबुदाणा आणि वरईचे मि सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या.हे मिश्रण एकत्र करून त्यात दही,       मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवायचे. हेमिश्रण एक तास झाकून ठेवायचे. इडलीपात्राला
तूप किंवा तेल लावावे. गरजेनुसार पातेल्यात झाकलेले मिश्रण काढून त्यात पाव टी स्पून चमचा बेकिंग सोडा टाकून एकजीव करा. ते मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या. हलकी, चवदार इडली
तयार. चटणीसाठी ओल्या नारळाचा चव किंवा ते नसल्यास सुया खोबर्‍याचा किस, त्यात मिरची, मीठ, चवीपुरती साखर आणि अर्धे लिंबू पिळून मिसरमध्ये दाटसर होईलअसे फिरवा. तुपात किंवा तेलात अर्धा चमचाजिरे टाकून ती फोडणी चटणीवर टाकूनइडलीसोबत खायला घ्या