तिसर्‍याचा लाभ

0
72

तिसर्‍याचा लाभ

उन्हाळा फार कडक पडला होता. अरण्यात कुठे पाण्याचा टिपूस नजरेस पडत नव्हता. अशा
वेळी पाण्याच्या शोधात फिरत- फिरत एका डबयाजवळ सिंह आणि रानडुक्कर एकाच वेळी
आले. प्रथम कोण पाणी पिणार, यावरुन दोघांचे भांडण जुंपले. कोणीच कोणाचे ऐकेना. शेवटी
ते एकमेकांच्या अंगावर धावून जात एकमेकांना रक्तबंबाळ करु लागले. मग थकून थोडा वेळ
विश्रांती घ्यावी, म्हणून ते थांबले असता, ” येथे कोणाचा तरी मुडदा पडेल आणि त्यावर आपल्याला
ताव मारता येईल” असे वाटून आकाशात गिधाडे घिरट्या घालू लागली. “आकाशात घिरट्या
घालणारी गिधाडे पाहताच व त्याचे मर्म लक्षात येताच रानडुक्कर सिंहाला म्हणाले, ” अरे आपण
असेच एकमेकांशी भांडून एकमेकांना ठार करावं आणि या क्षुद्र गिधाडांनी आपल्या मांसाचे तुकडे
तोडावेत, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? त्यापेक्षा हे भांडण मिटलेले बरं.” हे म्हणणं सिंहालाही पटलं,
तेव्हा रानडुक्कर म्हणाले, “मग सिंह महाराज, तुम्हीच पाणी प्या प्रथम.” तेव्हा सिंह म्हणाला,
“नको, तूच पी.” यावर रानडुक्कर म्हणाले, “नाही महाराज, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे म्हणून
तुमचाच मान प्रथम. आता प्या पाणी.”

तात्पर्य : तडजोड करुन भांडण मिटविले, तर नुकसान होत नाही