मिक्स भाजी रोल
साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, चवीनुसार मीठ, पाऊण चमचा मीठ, पाऊन चमचा तेल. कांदा १ उभा पातळ चिरलेला. कोबी अर्धी वाटी बारीक लांब चिरलेला, सिमला मिरची १ बारीक चिरून, गाजर किसलेले २ चमचे, दुधी भोपळा व श्रावणी घेवडा बारीक चिरलेला १ वाटी, लसूण आलं वाटलेले १ चमचा, कोथिंबीर, मीठ, तेल अर्धा चमचा.
कृती: पीठात अर्धा चमचा तेल घाला. जीरे, मीठ व पाणी घालून पीठ डोसासाठी भिजवतात त्याप्रमाणे पीठ भिजवावे. सर्व भाज्या तेलात परतून भाजी बनवावी. पाणी घालू नये. तव्याला तेल लावून भिजवलेले पीठ जाडसर पसरावे. बाजूने थोडे तेल सोडावे. झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. नंतर दुसरी बाजू उलटून धिरडे बनवावे. धिरड्यालानारळाची चटणी लावून त्यावर भाजी पसरावी आणि धिरडे गुंडाळावे