मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
46

वृत्तपत्रे केव्हा सुरू झाली?

आजकाल दिवस उजाडतो तो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आरोळ्यांनी. या आरोळ्या हीच आपली
भूपाळी ठरते. सकाळी उठून हातात पेपर पडला नाही तर आपण अस्वस्थ बनतो. वृत्तपत्रांतून
घरबसल्या आपल्याला जगभरच्या बातम्या कळतात. सिनेमांच्या जाहिरातीही बघायला मिळतात.
चीनमध्ये सुमारे १००० वर्षांपूर्वी ’चिंग पाव’ नावाचा एक जाहीरनामा निघायचा. चिंग पाव याचा
अर्थ राजधानीतील घडामोडी. या जाहीरनाम्याद्वारे सरकार जनतेला राजधानीतल्या घटनांची माहिती
देत असे.

इ. स. १७७२ मध्ये लंडनमध्ये ’मॉर्निंग पोस्ट’ हे वृत्तपत्र सुरू झाले. हे आधुनिक अर्थाने
खरे वृत्तपत्र. त्याआधी व्हेनिसमध्ये भिंतीवर सरकारी गॅझेटियर चिकटवण्यात यायचे. हे गॅझेटियर का?
तर याची किंमत एक ’गॅझेटा’ होती. पुढे बर्‍याच वृत्तपत्रांनी ’गॅझेट’ हे नाव स्वीकारले.
मध्यंतरी आर्थिक संकटात सापडलेले आणि  संपामुळे बंद झालेले आणि आता पुन्हा चालू होऊन
बंद पडण्याच्या मार्गावर असलेले ’लंडन टाइम्स’ हे आजचे सर्वांत जुने वृत्तपत्र. भारतातल्या
‘बेंगाल गॅझेट’ची सुरुवात ही भारतीय वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात मानण्यात येते. इ. स. १९८० मध्ये भारतीय
वृत्तपत्रसृष्टीची द्विशताब्दी साजरी करण्यात आली.