रोबो बनले शिक्षक

0
113

विविध कामांसाठी रोबोंचा वापर केला जातो. विविध बँकांमध्ये रोबो मानवी कर्मचार्‍यांची जागा घेऊ लागले आहेत. सुरक्षेसाठीही रोबो तैनात केले जातात. असे हे रोबो आता शिक्षकाची भूमिका वठवणार आहेत. बंगळुरूमधल्या एका शाळेत हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारे रोबो आणण्यात आले आहेत. हे रोबो शिक्षक म्हणून काम करतील. हे रोबो माणसासारखेच दिसतात. ते विविध विषय शिकवण्यासोबतच संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्नही करणार आहेत. हे रोबो सातवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सात विषय शिकवतात. या रोबोंना म हिलेचं रुप देण्यात आलं आहे. ते ‘ईगल २.०’ या नावाने ओळखले जातात. १७ सदस्यांच्या टीम ने या रोबोंची निर्मिती केली आहे. अशा पद्धतीचा एक रोबो बनवण्यासाठी आठ लाख रुपये खर्च आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या रोबोंच्या निर्मितीसाठी दोन वर्षांचा काळ लागला. त्यांचं वजन ४५ किलो आहे. ईगल २.० प्रकारातले तीन रोबो तयार करण्यात आले आहेत. अशा रोबोंमुळे शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार नसल्याचं हे रोबो तयार करणार्‍या टीमचे प्रमुख विघ्नेश राव यांनी सांगितलं.