पाण्याचा रंग अचानक झाला गुलाबी

0
64

तलावाच्या निळ्या पाण्याचा रंग अचानक गुलाबी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला; मात्र त्यानंतर त्यामागचे कारणही समोर आले. ते चिंताजनक आहे. हा तलाव अमेरिकेतील हवाई येथे आहे. रिफ्युजी मॅनेजर ब्रेट वोल्फ यांनी सांगितले की त्यांना सर्वात आधी याची माहिती जवळून जाणार्‍या एका व्यक्तीने दिली. हा माणूस म्हणाला, ‘तिथे काहीतरी विचित्र घडत आहे.’ सुरुवातीला सगळ्यांनी तो विनोद म्हणून घेतला; परंतु तलावाच्या गुलाबी रंगाचे कारण चिंताजनक असू शकते, असे अधिकार्‍यांना सांगितले. हा तलाव हवाई येथिल माऊ प्रांतामध्ये आहे. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की गुलाबी रंगामागे दुष्काळ हेदेखील कारण असू  शकते. पूर्वी विषारी शेवाळ हे पाणी गुलाबी होण्यामागील कारण मानले जात असे; परंतु प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून हे कारण नसल्याचे स्पष्ट झाले. त्याऐवजी हॅलोबॅटेरिया नावाचा जीव कारणीभूत असू शकतो, असे आढळले. हॅलोबॅटेरिया हा एक प्रकारचा आर्किया किंवा एकल-पेशी जीव आहे. तो खारट पाण्यात वाढतो. केलिया तलाव परिसरातील क्षारता  सध्या समुद्राच्या पाण्याच्या दुप्पट आहे. वोल्फ पुढे म्हणाले की या तलावाला
यापूर्वी दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या काळात जास्त क्षारता आली; पण त्याचा रंग बदलण्यामागे अजूनही एक रहस्य आहे. त्याचे डीएनए विश्लेषण होणे बाकी आहे. दरम्यान,  लोकांना या पाण्यात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यातले मासे खाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पाण्याचा रंग बदलण्यामागील कारण
शोधण्यासाठी तपास केला जात आहे