हसा आणि शतायुषी व्हा!

0


मालक : (नोकरास) अरे आज एक तास उशीरा आलास ऑफीसला?
नोकर : (कण्हत) मालक मी दुसर्‍या मलज्यावरून खाली पडलो.
मालक : यात तुला एक तास लागला

पहिला चष्मा कुठं वापरला गेला?


जगरहाटी आमूलाग्र बदलून टाकणारा शोध कोणता असा प्रश्न विचारला गेला, तर आपल्याला अग्नि, चाक, मुद्रणयंत्र आणि अर्थातच पर्सनल कॉम्प्युटर किंवा सेलफोन यांची आठवण होईल. ती तशी चुकीचीही असणार नाही. पण
अतिपरिचयादवज्ञा म्हणतात त्याची प्रचिती म्हणूनच की काय आपल्याला साध्यासुध्या चष्म्यांची आठवण
येणार नाही. पण विचार करा चष्म्याचा शोध लागला नसता तर किती जणांची आयुष्यं उद्ध्वस्त
झाली असती. मोटार किंवा असंच दुसरं कोणतंही वाहतुकीचं साधन चालवणं तर सोडाच पण
साधं रस्त्यावरून चालणंही मुश्कील झालं असतं. कशाचंही वाचन करणं अशय होऊन बसलं असतं
आणि ते सर्व सोडून नुसता टीव्ही बघायला म्हटलं तरी तेही साध्य झालं नसतं. तरीही या अतिशय
उपयुक्त साधनाचा शोध कुठं आणि कधी लागला, याविषयी छातीठोकपणे काहीही सांगता येणे शय
नाही. तसा काचेचा शोध चार हजार वर्षांपूर्वीच लागला होता. पण त्या काचेपासून घासून घासून
भिंग बनवता येतात याचा पत्ता मानवाला लागला नव्हता. तो लागला तेव्हाही त्यातून वस्तूची प्रतिमा
वृद्धिंगत करणार्‍या मॅग्निफाइंग ग्लास तयार केल्या गेल्या. त्यांनाच मग वेगवेगळ्या मखरांमध्ये बसवून
त्याच्यापासून हातात धरून वस्तू पाहण्यासाठीची साधनं बनवली गेली. पण त्यांना चष्मा म्हणता
येणार नाही. कारण एक तर ते साधन हातात धरून एखादी वस्तू न्याहाळता येत असे. पण ते सतत
डोळ्यांसमोर धरून वाटेवरून चालणं किंवा वाचन करणं शय नव्हतं.
पुढं क्वाटर्झ या निसर्गात मिळणार्‍या पदार्थापासून भिंग तयार करता येतात याचा शोध
लागल्यावर चष्मा बनवायला सुरुवात झाली. असे पहिले इटलीमध्ये १२६८ ते १२८९ या काळात
तयार केल्याचा पुरावा मिळाला आहे. डॉमिनिकन धर्मगुरू जोर्दानो द पिस्का याने २३ फेब्रुवारी १३०६
या दिवशी दिलेल्या प्रवचनामध्ये आपली दृष्टी सुधारणार्‍या या चष्म्याचा वापर सुरू होऊन वीस
वर्षही उलटली नाहीत, असं स्पष्टपणे म्हटलं होतं. ही भिंगं जनावरांची हाडं, कातडी किंवा धातू यापासून
तयार केलेल्या फ्रेममध्ये बसवली जात. अशा प्रकारचे चष्मे अर्थात नाकावर एका घट्ट बसणार्‍या
चापानं बसवले जात. हे सोईचं नव्हतं आणि काही वेळ गेल्यानंतर नाकाचा तो भाग दुखायला लागे.
पण त्या फ्रेमला काड्या जोडून त्या कानांवर ठेवल्या तर चष्मा कोणतीही वेदना न जाणवता दीर्घ काळ
वापरता येऊ शकतो, याचा शोध लागायला आणखी चारशे वर्षं लोटावी लागली. आज वापरले जातात
तशा प्रकारचे चष्मेही युरोपातच, इटली व फ्रान्स इथं प्रथम तयार केले गेले.
यापुढचं महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं ते अमेरिकेत. तिथं बेन्जामिन फ्रॅन्कलिन याला
दूरवरचं पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी अशा दोन चष्म्यांचा वापर करावा लागत असे. वारंवार त्यांची
अदलाबदल करायला तो कंटाळला. तेव्हा त्यानं त्या दोन्ही चष्म्यांच्या काचा अर्ध्यावर कापून एकमेकींना
जोडून टाकल्या. अशा रीतीनं पहिला बायफोकल चष्मा अस्तित्त्वात आला

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज


वाळूची दलदल हा काय प्रकार आहे? दलदल म्हटली की पाणी आले. दलदलीत
रुतलेला माणूस किंवा प्राणी जसजसा या चिखलातून बाहेर यायचा प्रयत्न करतो, तसतसा
तो अधिकाधिक खोल रुतत जातो हा आपला अनुभव. नेहमीच्या दलदलीत खाली चिकण
मातीचा थर आणि वरती वाळूचा मोठा थर असतो. ही दलदल नदीचा काठ किंवा समुद्र किनारा
यांच्याजवळ असते.
या वाळूत पुराच्या वेळेस किंवा भरतीच्या वेळेस पाणी भरले जाते, पण चिकण मातीतून हे
पाणी मुरू शकत नाही. यामुळे ते वाळूतच साठून राहते व हळूहळू दलदल तयार होते.
या दलदलीत फसल्यावर खूप जलद हालचाल किंवा घाबरून धडपड केली की, बुडत्याचा पाय
खोलात अशी परिस्थिती निर्माण होते. अशा तर्‍हेने दलदलीत माणसापासून हत्तीपर्यंत कुठल्याही
आकार-प्रकाराचा प्राणी सापडून बुडतो. वाळवंटात वार्‍यानं वाळू चाळली जाऊन वाळूचे थर बनतात.
यातच तापमानाचा फरक निर्माण होऊन वाळूचे वरून खाली व खालून वर असे चक्रीप्रवाह सुरू
होतात. अशा वाळूच्या थरांना वाळूची दलदल म्हणतात. मात्र यात पाणी नसते. अशा वाळूप्रवाहात
सापडलेल्या माणसाला किंवा वाहनाला वाचवणे अवघडच असते

वास्तू

0

* ज्या नवीन वास्तूस दारे, खिडया बसविलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण
भोजन झाल्याशिवाय प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा
प्रसंग उद्भवतो. ‘यमघंट’ योगावर गृहप्रवेश करू नये.
* कुठे बोअरिंग करावे, हँडपंप कुठे बसवायचा, अंडरग्राऊंड टाकी बांधायची
असेल तर योग्य जागा म्हणजे उत्तर वा पूर्व दिशा निवडावी. याउलट ओव्हरहेड टाकी मात्र
दक्षिण वा पश्चिम बाजूसच असावी. बांधकाम करताना टाकी लावायची असेल तर टाकीची
शास्त्रोत पूजा-अर्चा करावी.

 

सल्ला

0

एखादा पदार्थ नवनवीन चवींमध्येआजमावू पाहत असाल तर त्यांना वेगवेगळ्या
(मोहरी, खोबरेल इ.) तेलांची फोडणी द्या. हवे तर यामध्ये रोज वापरावयाचे तेलही मिसळू
शकता.

त्वचा अशी उजळा

त्वचा अशी उजळा


जर आपली त्वचा रुक्ष, कोरडी, काळवंडलेली असेल तर रात्री चारोळी भिजत
घाला. सकाळी व्यवस्थित वाटून त्यात मध, दूध व मुलतानी माती मिसळून दाट लेप बनवा.
नंतर हा लेप दीड से. मी. चेहर्‍यावर सुकेपर्यंत लावून ठेवा. सुकल्यावर त्रिफळाच्या पाण्याने
धुवा. आपला चेहरा उजळून निघेल.

किशमिश बर्फी

0

किशमिश बर्फी


साहित्य – २५० ग्रॅम खवा, १००ग्रॅम साखर, १ मोठा चमचा तूप, १० ते १५ काजू.
कृती – आधी किशमिश १५ ते २० मिनिट दुधामध्ये भिजवून बाहेर काढून
मिसमधून वाटून घ्यावेत. एका कढईत तूप घालून खवा पाच मिनिटापर्यंत                                                  भाजून घ्यावा व वाटलेले किशमिश घालून २ ते ३ मिनिटे भाजावे. साखर व सबंध
किशमिश घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवावे. एका ताटाला तूप लावून मिश्रण
पसरावे. वरून काजूने सजवावे. गार झाल्यावर मनाप्रमाणे वड्या कापाव्यात.

 सुविचार

बुद्धी नसणारे लोक शिंगाशिवाय असणार्‍या पशूप्रमाणे असतात. – प्रेमचंद.

आरोग्य

0

केस गळणे बंद होण्यासाठी
मेथीची पाने वाटून केसांना लावल्यास व मेथ्या अर्धा-अर्धा चमचा सकाळ-सायंकाळ
खाल्ल्यास केस गळणे बंद होते. त्याचप्रमाणे लिंबाची फोड डोयाला चोळल्यास केस गळती
थांबते

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, हस्त अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २० मि. सूर्यास्त ०६ वा. २५ मि.

राशिभविष्य :

मेष: राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. महत्त्वाची
कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. मह त्त्वाकांक्षापूर्ण होतील.

वृषभ:  घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंगघडतील. व्यापार-व्यवसायात वातावरण
अनुकूल मिळेल. व्यापार-व्यवसाय सुरळीतराहाणार नाही.

मिथुन : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. वैवाहिक
जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराजित होईल.

कर्क : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची
आवश्यकता आहे. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा.

सिंह : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार
व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या
धाडसात वाढ होण्याची शयता आहे.

कन्या:  मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कौटुंबिक वाद-विवाद टाळा. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. प्रसिद्धी वाढण्याची
शयता आहे.

तूळ : मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या
खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सुख वाढेल. मागील उधारी वसुल होईल. धनाच्या रुपात
यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा.

वृश्चिक : सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम
टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील.नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल.
आरोग्य मध्यम राहील.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज
देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील.राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.
आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे.

मकर : कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य
नरम-गरम राहील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.

कुंभ: व्यापारात वेळ मध्यम राहील. आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम
केल्यानंतर थोडे यश मिळेल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. अत्यंत परिश्रम
केल्यानंतर थोडे यश मिळेल.

मीन : व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. मित्रांचे
सहकार्य मिळेल. महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा
पूर्ण होतील.

                                                              संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर