नगर – मुलांवर योग्य वयात चांगले संस्कार केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होवून ते भविष्यात आदर्श बनू शकतात. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या आशिर्वादाने आणि प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने अशीच आदर्श, सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी जैन धार्मिक परीक्षा बोर्डच्यावतीने १ मे पासून आनंद बाल संस्कार
शिबिराला प्रारंभ झाला आहे. ६ मे पर्यंत आनंदधामच्या पवित्र प्रांगणात हे शिबिर होणार आहे. सकाळी ७ ते
११ यावेळेत होणार्या या शिबिरात जवळपास ६०० मुले-मुली सहभागी झाली आहेतन. आनंदधामचे पवित्र प्रांगण मुला-मुलींच्या किलबिलाटाने गजबजून गेल्याचे पहायला मिळाले.
शिबिरात जैन साधू साध्वींच्या सान्निध्यात मुलांवर धार्मिक संस्कार केले जात असून महान परंपरा असलेल्या जैन धर्माचे मर्म मुलांना अतिशय साध्याय्सोप्या भाषेत शिकवले जात आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात एकत्र आल्यावर सामूहिक प्रार्थनेने शिबिराचे सत्र सुरु होते. विपुलदर्शनाजी, उदयप्रभाजी, आराधनाजी, पुष्पकंवरजी, विचक्षणाजी, अमितज्योतीजी, विभक्तीजी
यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना संस्कारीत केले जाते आहे.
शिबिरात दररोज प्रार्थना, योग प्राणायाम, मेडिटेशन, सामायिक, चौवीसी पठण, गुरूदेवांचे सचित्र चरित्र, मंत्र, मांगलिक असे धडे दिले जातात. याशिवाय स्तोत्र पठण, एरोबिस, व्यक्तीमत्व विकास, सामाजिक जागृतीवर प्रबोधन केले जाते. मुलांना दररोज पौष्टिक नाश्ता दिला जातो. युकेजी ते दहावी पर्यंतची मुले मुली यात सहभागी झाले आहेत. दररोजच्या शिबिराच्या सांगते प्रसंगी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा., आलोकऋषीजी
म.सा. यांच्याकडून जैन धार्मिक गीते व मार्गदर्शनाने आणि मांगलिक देऊन होते.
मागील ४० वर्षांपासून उन्हाळ्याची सुट्टी आणि आनंदधाम येथील संस्कार शिबिर असे समीकरण रूढ झाले आहे. सरोज कटारिया, सपना कटारिया, सिमरन मुनोत यांच्यासह आनंद संस्कार शिक्षा अभियानाच्या शिक्षिका, ब्राम्ही युवती मंचच्या सदस्या शिबिराची नियोजन व्यवस्था पाहत आहेत.














