नगर – मराठी भाषेविषयी माहिती व मराठी भाषेची महती सांगणारे ’अभिजात मराठी राजभाषा गौरव गीता’चे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या गीताचे गायन अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि अंगद गायकवाड यांनी केलेले आहे. गायकवाड भगिनी या ’सारेगमप लिटिल चॅम्प, संगीत सम्राट, तसेच लखनौ मधील लासिकल वॉईस या स्पर्धेच्या विजेत्या आहेत. अंजली गायकवाडला शाहू मोडक पुरस्कार, संगीत सम्राट पुरस्कार मिळालेले आहेत.
या गीताला गेल्या पंचवीस वर्षापासून संगीताचे शिक्षण देणारे अंगद गायकवाड यांनी संगीत दिलेले आहे. शुद्ध कल्याण हा मुख्य राग या गाण्यामध्ये वापरलेला आहे. याबरोबरच मिश्र मारु बिहाग, मिश्र भूप, मिश्र यमन, भटियार, शंकरा, हंसध्वनी,
ललित, मारवा, पूरिया धनश्री या रागांचा वापर या गीतामध्ये करण्यात आलेला आहे.
या गाण्याचे गीतकार डॉ महेश दळे हे आहेत. मराठी भाषेतील कंदर्प वृत्तामध्ये या गाण्याचे बोल लिहिलेले
आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या भाषेविषयी आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटणारी
तळमळ व तिच्या विषयीचा अभिमान गीतकाराने शब्दबद्ध केला आहे. या शब्दांना पूर्णपणे न्याय देईल, असेच
संगीत संगीतकार अंगद गायकवाड यांनी दिलेले आहे. गीतकार व संगीतकारांच्या कौशल्यांवर शोभून दिसणारा मुकुट म्हणजेच गायकवाड भगिनी व त्यांचे गुरु व पिता अंगद गायकवाड यांचे सुमधुर गायन हे होय. ’सत्ययुग योगायुर्वेदम’ या यूट्यूब चॅनल वर हे गीत उपलब्ध करण्यात आलेले आहे. https://www.youtube.com/ watch?v=BhFs3mV4sk तसेच सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे गीत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.