नगर – अथक परिश्रम व चिकाटी तसेच उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळाल्यानेच खेडेगांव असुनही अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व
इतर स्पर्धा परिक्षांमध्ये सुयश संपादन केले. खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात ठासुन भरलेली आहे याची प्रचिती नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दिसली. एक मेंढपाळ देखील प्रखर इच्छा शक्तीने अभ्यास करुन नेत्रदिपक यश मिळवु शकतो. संविधानाने देखील प्रत्येक मुलास शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. पारनेर तालुयातील खडकवाडी
येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रयत्न इंग्लिश मिडीयम स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथील गुणपत्रिका वितरण
समारंभ पालक विद्यार्थी मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन अॅड. सुनिल मुंदडा यांनी प्रतिपादन केले. प्रारंभी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, गावकरी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. अशोक दळवी यांनी प्रास्ताविक केले आणि संस्थेच्या प्रगतीचा व भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी होणार्या सोयीसुविधांचा
आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे आयोजित पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये
उत्तीर्ण झालेल्या कु. आश्लेषा वाबळे, चि. ऋतुराज जाधव व कु. सृष्टी गागरे या विद्यार्थ्यांचा लकांसमवेत सत्कार करण्यात आला. चालु शैक्षणिक वर्षात सुयश मिळविलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले यावेळी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या व शिक्षकांच्या विषयी ऋण व्यक्त करणारे मनोगत सांगितले.
या कार्यक्रमासाठी अहमदनगर येथील विनित ग्राफीसचे संचालक सागर फुलसौंदर, सरपंच संतोष मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण वाबळे, डॉ. सचिन जाधव, सोमनाथ मुसळे, बाबासाहेब काळे, संतोष मुसळे, दिलीप मोरे
व आजुबाजुच्या परिसरातील अनेक नागरीक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक संदिप खैरे यांनी केले आणि मुख्याध्यापक उषा दळवी यांनी आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.