हसा आणि शतायुषी व्हा!

शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडून
सुट्टी मिळेल..! गण्याने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली
शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?
गण्या : मी, आता घरी जाऊ का?

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १९ जानेवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष शुलपक्ष, भरणी २६|५०
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा.

वृषभ : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे.

मिथुन : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील.

कर्क : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

सिंह : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

कन्या : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा.

तूळ : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापारय्व्यवसायात सावधगिरी बाळगा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

धनु : शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश
मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल.

कुंभ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.

मीन : निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

मन म्हणजे काय?

‘मनाचे श्लोक’, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’, ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’, ‘मनमानी’ असा अनेक ठिकाणी आपण ‘मन’ या कल्पनेचा वापर करतो. मन म्हणजे काय? हा एक यक्षप्रश्नच आहे. मन हे चंचल आहे. ते वार्‍यापेक्षा अधिक वेगाने धावते. सर्व भावभावना हा मनाचाच आविष्कार आहे. कोणी मनाने निर्मळ असतो, तर कोणी दुष्ट असतो. शरीररचनाशास्त्रात मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर ते काही सापडत नाही. हृदय सापडते, मेंदू सापडतो; पण हे मन काही सापडत नाही. खरे पाहायला गेले तर, मन नावाचे कोणतेही इंद्रिय शरीरात नसते. आश्चर्य वाटले ना? नसलेल्या या इंद्रियाविषयी किती म्हणी, वाक्प्रचार सापडतील! शास्त्रज्ञांनी मनाचे शोध लावायचा खूप प्रयत्न केला, पण ते काही सापडले नाही. मेंदूच्या अभ्यासावरून हे लक्षात येते की विचार करण्याची, विश्लेषण करण्याची, कल्पनेचे साम्राज्य निर्माण करण्याची क्षमता मेंदूमध्ये असते. माणसाची बुद्धिमत्ता, त्याचे ज्ञान, त्याला असलेली माहिती, त्याच्या जाणिवा व त्याचे आचारविचार सर्वच मेंदूवर अवलंबून असते. आपण ठरावीक प्रकारे का वागतो, हे आपल्या भोवतालचे वातावरण, आपण काय शिकतो-वाचतो याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणी निर्मळ मनाचा असेल वा वाईट प्रवृत्तीचा असेल; हे जन्मजात वा आनुवंशिक नसून अनुभव, शिक्षण व भोवतालचे वातावरण यावरच अवलंबून असते. असे हे मन. मेंदूच्या रोगांना यामुळेच मनोविकार, मानसिक रोग अशी नावे दिली जातात.

सुविचार

परिश्रमाने शरीर निरोगी राहते व मन निर्मळ बनते. : सी. सायमन्स

गोड पदार्थांवर नियंत्रण हवे

0

गोड पदार्थांवर नियंत्रण हवे

अतिरेकी प्रमाणात चहा, कॉफी नको. त्याऐवजी सुप्स, हर्बल टी, डाळ सूप, काढा
घ्या. पाणी भरपूर प्या. साधं पाणी प्यायलं जात नसेल तर गरम पाणी प्या. तेल, तुपाचा वापर
मर्यादेतच करा. गोड पदार्थांचा अतिरेक नको. ते पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ आणि कार्यशक्ती
खर्च होईल. शरीराचं तापमान कमी होईल.

अनारसे (साखरेचे)

0

अनारसे (साखरेचे)

साहित्य : तांदूळ, साखर, तूप,
खसखस.
कृती : तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून
ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत
घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही
करू नका. नंतर मिसरमध्ये बारीक करून घ्या.
मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ
असतील तेवढी पीठी साखर पिठात मिसळवून
घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे
तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून
स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. ३-४ दिवसांनी
अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या
वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात १/४
साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा
पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या.
नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.

उजळ चेहर्‍यासाठी

उजळ चेहर्‍यासाठी
* ग्लिसरीन, गुलाबपाणी व लिंबाचा
रस समप्रमाणात मिसळून चेहर्‍यावर लावल्यास
चेहरा उजळतो.
* १ मोठा चमचा टोमॅटोचा रस, १
मोठा चमचा काकडीचा रस, १ मोठा चमचा
कोंड्यासकट गव्हाचे पीठ आणि ४-५ थेंब
लिंबाचा रस घेऊन कच्च्या दुधात मिसळा.
चेहरा, मानेला लावा. २० मिनिटांनंतर धुवून
टाका.

सल्ला

0

* मेंदीची पाने बारीक वाटून पोटीस
बांधल्यास गाठ बसते व फोडही बरा होतो.
* ज्या जागी जास्त माशा बसतात तेथे
ही पावडर ओली करून चोळा माशा बसणार
नाहीत.

वास्तू

0

निळ्या, सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाची
मेणबत्ती घराच्या उत्तर कोपऱ्यात जाळणेही
लाभदायक ठरते.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

दिवसेंदिवस चहाचे दुकानात चहाचे कप इतके
बारीक होत चाललेत की
समजत नाहीये, चहा पितो आहे की
‘पोलिओ’चा डोस