मुलतानी मातीत थोडासा पुदिन्याचा
रस मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील
काळवंडलेपणा नाहीसा होतो.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
‘गुरुजी फळ्यावर लिहितात ते मला अजिबात दिसत नाही!’
राजूनं आपलं गार्हाणं सांगायला सुरुवात केली. अनेकदा त्याने सांगितल्यावर
वडील त्याला डॉटरकडे घेऊन गेले.
डॉटरांनी डोळे तपासले. काहीच दोष आढळला नाही. तेव्हा डॉटरांनी
विचारलं,
‘बाळ, तुला का बरं फळ्यावरचं दिसत नाही?’
माझ्या समोरच्या बाकावर सरदारजीचा एक उंच मुलगा बसतो!
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर,पौष शुलपक्ष, कृत्तिका २७|०९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.
राशिभविष्य
मेष : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. आपल्या उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवा.
वृषभ : कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. आरोग्य नरम-गरम राहील.
मिथुन : नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.
कर्क : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली कामे धाडसाने करा. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
सिंह : मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.
कन्या : व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. आरोग्य नरम-गरम राहील.
तूळ : व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. बाहेरचे खाणे शयतो टाळावे.
वृश्चिक : अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.
धनु : राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. कौटुंबिक वातावरण
आनंददायी असेल.
मकर : मागील उधारी-उसनवारी वसुल होईल. दैनंदिन कामात सातत्य राहणार नाही. अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. आपले काम धाडसाने करा. यंत्रे व उपकरणे जपून हाताळावीत.
मीन : पैशासंबंधी येणार्या व अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल. जुने मित्र -मैत्रिणी भेटतील. नुकसान होण्याचा संभव आहे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
‘मीठा जहर’ म्हणजे काय?
गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच ‘मीठा जहर’ असे म्हणतात. अॅकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात अॅकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे. पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ गॅ्रम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके अॅकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो. वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केला जातो. पोटात गेलेले विष टॅनिक अॅसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे ‘मीठा जहर’; चवीला गोड, पण भयंकर.
अॅसिडीटी टाळण्यासाठी
मानसिक ताण, काळजी यांमुळे अॅसिडीटी वाढते, त्याकरिता या गोष्टींवर नियंत्रण मि
ळवण्यासाठी मेडिटेशन, रिलॅसेशन टेनिस करावे. जागरण टाळावे. किमान साडेसहा ते सात
तास झोप घेणे आवश्यक असते. डॉटरांच्या सल्ल्याशिवाय एस्पिरीन, सांधेदुखीची औषधे,
पेनकिलर्स परस्पर घेऊ नयेत. घाईगडबडीने जेवल्याने अपचन, अॅसिडीटी असे त्रास होतात.
मिस्क धान्यांच्या चकल्या
साहित्य : हरभरे, तांदूळ, ज्वारी,
बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल,
तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ,
काळा मसाला, तेल.
कृती : वर दिलेले सर्व धान्ये प्रत्येकी
एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत
व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक
वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ,
एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व
काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर
त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी
घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून
चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस
तळून काढाव्यात.
विंचू डसल्यास काय करावे?
* विंचू डसल्यास डसलेल्या जागी
अत्तर लावा. मध, तूप व चुना समप्रमाणात
एकत्र मिसळून लावल्यास विष उतरेल.
* भाज्या चिरण्यापूर्वी धुऊन घ्याव्यात.
यामुळे त्यातील खनिजे व व्हिटॅमिन नष्ट होत
नाहीत.
* पदार्थ नेहमी मंद आचेवरच
शिजवावेत. यामुळे मसाल्यांचा सुगंध टिकून
राहातो. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत व
भाजी स्वादिष्ट होते.