वास्तू

0

देवघराची खिडकी व दरवाजे पश्चिम
बाजूला नसून उत्तर वा पूर्व दिशेला असावेत.

जखमेचे व्रण

जखमेचे व्रण रक्तचंदन रोज पाण्यात
उगाळून लावल्यास २ दिवसात कमी होऊ
लागतात.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा :
नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

डॉक्टर : घाबरू नका देशपांडे…खूप छोटे ऑपरेशन आहे.
पेशंट : थॅक्यू डॉक्टर… पण माझे नाव देशपांडे नाही…!
डॉक्टर : मला माहिती आहे… देशपांडे माझे नाव आहे…!!!

दैनिक पंचांग रविवार, दि. २१ जानेवारी २०२४

पुत्रदा एकादशी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष शुलपक्ष, रोहिणी २७|५२
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या.

वृषभ : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम.

मिथुन : अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे.

कर्क : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

सिंह : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल.

कन्या : आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा.

तूळ : आपणास घरात राहून आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात.

वृश्चिक : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.

धनु : हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. आर्थिक बाबतीत उन्नती होईल.

मकर : एखाद्यापासून आपण प्रेरीत व्हाल. आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे.

कुंभ : आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल.

मीन : योजनाबद्धरीत्या आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

डोयात केस नसलेले गोल चट्टे कशामुळे येतात?

काहीजणांच्या डोयात केस नसलेले
चट्टे दिसतात. बरेच जण समजतात की, उंदीर
चावल्यामुळे असे चट्टे येतात व पुन्हा तेथे केस
येत नाहीत. डोयाचे केस जाण्याची अनेक कारणे
आहेत. डोयाच्या त्वचेला जंतूसंसर्ग झाला असेल,
दाह असेल तरी केस गळतात. याखेरीज टिनीया
कॅपिटीससारख्या रोगातही केस गळतात. डोयात
केस नसलेले गोल चट्टे असण्याचे मुख्य कारण
म्हणजे, कारण माहीत नसलेला अ‍ॅलापेशिया एरॅटा
हा रोग. ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणे
सापडतात. यात डोयात दोन वा तीन केस
नसलेले चट्टे असतात; पण डोयाची त्वचा मात्र
निरोगी असते. ह्या चट्ट्यांवर केस नसले तरी ६
ते १२ महिन्यानंतर परत केस उगवतात. त्यामुळे
काळजी करण्याचे कारण नसते. त्वचेच्या जिवाणू
वा बुरसी संसर्गामुळे केस जात असतील, तर मात्र
त्यावर योग्य ते उपाय करावे लागतात. म्हणजे केस
गळायचे थांबतात.

सुविचार

घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुखशांती टिकाऊ नसते.

हे आहेत ऊर्जादायी देणारे पदार्थ

0

हे आहेत ऊर्जादायी देणारे पदार्थ
* गुळ, मध, बाजरी, मका, राजगिरा, शिंगाडा भरपूर उष्णता देतात. हळीव, डिंक यातून
उर्जा मिळतेच आणि हाडांचं आरोग्य सुधारतं.
* खजूर, सुकं अंजीर, मनुका, खारीक उष्णता आणि खनिजं, व्हिटामिन्स, फायबर्स
देतात. सुरण, रताळी, बटाटे अशी कंदमूळं आवश्य खावीत.

सोयाबीन रस्सा

0

सोयाबीन रस्सा

साहित्य : सोयाबीन (बारीक वड्या)
२ वाट्या, किसलेले सुके खोबरे १ वाटी,
उभा चिरलेला कांदा १ मोठा, लसूण पाकळ्या
१५२०, मिरी दाणे ५६, लवंगा ५६, आले-
मध्यम तुकडा, कोथिंबीर १२ वाटी, लाल
तिखट- चवीनुसार, मीठ-चवीनुसार.
कृति : सर्वप्रथम एका सोयाबीनचे
दोन तुकडे असे सर्व तुकडे करून घ्यावे.
कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून किसलेले
खोबरे, आले, लसूण, कांदा, लवंगा, मिरे
भाजून घ्यावे. खोबर्‍याचा रंग बदलला की,
गॅस बंद करून सर्व जिन्नस वाटून घ्यावे.
कढईमध्ये तेल घालून त्यात थोडी साखर
घालावी. साखर घातल्याने तेलाचा छान तवंग
येतो. नंतर त्यात लाल तिखट आवडीनुसार
घालावे. हा रस्सा जरा झणझणीतच चांगला
लागतो. तेल तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट
घालून खूप परतावे. खोबरे तेल सुटेपर्यंत
परतावे. नंतर त्यात तुकडे केलेले सोयाबीन
घालून थोडे परतावे. उकळलेले पाणी घालून
सोयाबीन शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे.
शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी. गरम
गरम भाकरीबरोबर वाढावे. सोबत कांदा
चिरून द्यावा.

सल्ला

0

रस्सा घट्ट होण्यासाठी
* बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त
झाला असेल तर ती भाजी अधिक घट्ट
बनवण्यासाठी त्यात उकडलेला बटाटा
कुस्करुन टाका व वरुन थोडेसे मीठ मिसळा.
चवीसाठी चाट मसालाही मिसळू शकता.
* दारे-खिडया फुगल्याने व्यवस्थित
लागत नसल्यास त्यांच्या कडांवर मेण
घासावे.

वास्तू

0

मुलांची स्टडी किंवा बेडरूममध्ये पूर्वे
कडे ‘मनिप्लँट’ लावावा. शिक्षणात हमखास
यश मिळते.