बॉडी बिल्डींगसाठी आवश्यक पदार्थ

0

बॉडी बिल्डींगसाठी आवश्यक पदार्थ

तेलबिया म्हणजे पांढरे आणि काळे तीळ, शेंगदाणे, जवस, सूर्यफुलाच्या बिया. सुकामेव्यामध्ये
बदाम, अक्रोड. सोयाबीन, पावटा, मसूर आदी पदार्थांपासून बॉडी बिल्डींग करणार्‍यांसाठी भरपूर
प्रोटीन्स मिळते. थंडीत रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते ती टाळण्यासाठी म्हणून काही पदार्थ
आहारात आवश्यक आहेत. आलं, सुंठ, लसूण, तुळस, गवती चहा असे औषधी पदार्थ जरूर घ्यावेत.
लवंग, मिरे, दालचिनी, मोहरी, हळद असे जंतुनाशक, प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ. ओवा,
हिंग, मेथी दाणे यांमुळे, भूक वाढते, अन्नपचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते व रोगप्रतिकारशती
वाढण्यास मदत होते. बाजरीची भाकरी तुप व तिळाची चटणीही पौष्टिक घटक आहे.

वास्तू

0

प्रगती होण्यासाठी

* मुख्य दरवाजाच्या चौकटीवर आतील
व बाहेरील बाजूस समोरासमोर येईल अशा
पध्दतीने गणपतीचे चित्र लावणे प्रगतीकारक
ठरते.
* स्टडी रूम – स्टडी रूम पूर्व, उत्तर
वा उत्तर पूर्व या दिशेला असावी. या दिशा मन
एकाग्र करण्यात मदत करतात. स्टडीरूममध्ये
कधीही बीम खाली बसून अभ्यास करू नये.
यामुळे अनावश्यक दडपण येते.

सल्ला

0

फोड, पुरळ झाल्यास पिंपळाच्या
पानावर तूप लावून, गरम करून लावा वा
कडुलिंबाच्या पानांचा लेप करून लावा. फोड,
पुरळ बसून जातील.

हसा आणि शतायुषी व्हा!

इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं:
’तडफड’ म्हणजे नेमके काय असतं ?
सासु शांतपणे उठली,
आणि वायफायचा स्विच बंद केला.
म्हणाली… घे अनुभव.

चेहर्‍याची त्वचा

केळाचा गर चेहर्‍यावर लावावा व
वाळल्यानंतर हाताने घासून मसाज करावा.
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा व्यवस्थित
धुवावा. यामुळे चेहर्‍याची त्वचा उजळते.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४

भौमप्रदोष, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष शुलपक्ष, आर्द्रा ३०|२६
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. राजकीय
व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.

वृषभ : इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्त्वाची
कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील.

मिथुन : नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

सिंह : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.

कन्या : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली कामे धाडसाने करा. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात.

तूळ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. आजचा दिवस चांगला आहे.

वृश्चिक : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापारय्व्यवसायात जोखमीचे काम टाळा. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. नोकरदार कामात व्यस्त राहातील. देवाण-घेवाणीत त्रास.

मकर : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा.
कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. मानय्सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल.

मीन : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल.

                                                                                    संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

विंचू चावल्यास काय करावे?
शहरामध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले
तरी दमट, अंधार्‍या जागी, गोठ्यांजवळ विंचू असू
शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात
काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू
चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते.
ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते.
या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या
शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी
असते; परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या
विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.
विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग
होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे,
चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला
पेटके येणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात.
इंगळीच्या विषाने याहून गंभीर परिणाम होऊन
मृत्यूही होऊ शकतो.
हाताला किंवा पायाला विंचू चावल्यास
त्याच्या वरच्या बाजूस पट्टी बांधावी. गरज असल्यास
चावलेल्या जागी छेद घ्यावा. जखम पाण्याने,
अमोनिया किंवा पोटॅशियम परमँग्नेटने धुवावी.
बधिर करण्यासाठी औषध उपलब्ध असल्यास
ते टाकावे. चावलेल्या भागाची हालचाल शयतो
करू नये. त्यामुळे विष कमी शोषले जाते.
लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास, तसेच इंगळीने
म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास,
लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉटरांचा
सल्ला घ्यावा.

सुविचार

परिश्रमांशिवाय प्रारब्ध पांगळे असते. : आर्य चाणक्य

जेवणासंबंधी काही नियम

0

जेवणासंबंधी काही नियम
* जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास चावून खावा. दुपारी जेवून लगेच आडवे होण्याने
हमखास अ‍ॅसिडीटी वाढते. त्यामुळे दुपारची वामकुक्षी टाळावी. रात्रीचे जेवण लवकर करावे.
* जेवणानंतर ३ तासांनी झोपावे. रात्री खूप उशिरा जेवू नये. धूम्रपान, तंबाखू सेवन,
मद्यप्राशन अशी व्यसने, त्याचप्रमाणे चहा-कॉफी, कोला पेये यांचा अतिरेक टाळावा

कॉर्न फ्लॉवर वड्या

0

कॉर्न फ्लॉवर वड्या

साहित्य :  ३ वाट्या ओले खोबरे, १
कप दूध, १ कप दूध, १ वाटी कॉर्नफ्लॉवर,
तिन्ही मिळून जेवढे होईल तेवढी साखर,
४-५ वेलदोड्यांची पूड, केशरी रंग, काजू व
अक्रोडचे काप.
कृती : ओले खोबरे एका बाऊलमध्ये
घ्यावे. त्यावर गरम दूध ओतून तासभर
बाजूला ठेवावे. नंतर नारळाचे दूध काढून
घ्यावे. दूधात कॉर्नफ्लोअर, साखर, थोडा
लाल रंग व वेलदोड्यांची पूड घालून मिश्रण
सारखे करावे. त्यात दूधात भिजवलेला नारळ
खव घालावा. गॅसवर ठेवून ढवळावे. सतत
हलवत राहावे. घट्टसर झाले की, उतरवावे व
तूप लावलेल्या थाळीत ओतावे. वरून काजू व
अक्रोडचे काप पसरवून हलया हाताने थापून
ठेवावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.