कच्च्या कैरीची बर्फी

0
47

कच्च्या कैरीची बर्फी

साहित्य – १ किलो कच्ची कैरी, दिड किलो साखर, लहान चमचा वेलची पावडर,
थोडेसे केशर व खाण्याचा चूना, वर्ख.

 कृती – कच्ची कैरी सोलून त्याचे कद्दूकस करावे. फोडी चुन्याच्या पाण्यात
घालून थोड्या वाळवाव्या. फोडी सावलीत वाळवाव्या. नंतर या फोडी चार वेळा स्वच्छ
पाण्यात धुऊन वाफवून घ्याव्यात. साखरेचा एक तारी पाक करून फोडी दाबून पाकामध्ये
घालाव्यात. अर्धा तास झाल्यावर फोडी शिजल्यावर मिश्रण घट्ट होत आल्यावर
गॅसवरून उतरावे. आता त्यामध्ये वेलची पावडर व केशर घालावे. एका ताटाला तूप
लावून गार झाल्यावर तुकडे करावे.