धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. : डिझरेली
फुलांचे चिरोटे
फुलांचे चिरोटे
साहित्य : बारीक रवा एक वाटी, तूप
पाव वाटी, चिमूटभर मीठ, दूध गरजेनुसार,
गुलाबी रंग चिमूटभर, हिरवा रंग चिमूटभर,
तळण्यासाठी तूप.
कृती : रव्याला वनस्पती तूप चोळून
घ्या. मीठ घाला. मिश्रणाचे दोन भाग करा. एका
भागात गुलाबी रंग घालून दुधाने मळून घ्या.
दुसर्या भागात हिरवा रंग घालून दुधाने मळून
घ्या. हे पीठ दोन तास ओल्या कपड्याखाली
ठेवा. नंतर वेगवेगळे कुटून घ्या. गुलाबी रंगाचे
दोन गोळे करा.
एक पातळ लाटून घ्या. त्यावर साटा
पसरवून त्याच्या एक इंचाच्या पट्ट्या कापून
घ्या. हिरव्या रंगाचा एक गोळा घेऊन पातळ
लाटून घ्या. त्यावर साटा लावा, पट्ट्या
कापून घ्या. पहिल्यांदा गुलाबी रंगाचा रोल
करा. त्यावर हिरवी पट्टी गुंडाळून घ्या. मधे
दाबून हलया हातांनी थोडेसे लाटा व तुपात
तळून घ्या. छान फुलाचा आकार येईल.
त्यावर पिठीसाखर घाला.
वास्तू
* बहुतेक घरात तुटलेल्या फुटलेल्या
वस्तू एखाद्या कोपर्यात किंवा माळ्यावर
पडलेल्या असतात. अशा तुटया वस्तू घरात
ठेवू नये. यामुळे आर्थिक अडचणी वाढतात.
या वस्तूंच्या प्रभावामुळे माता लक्ष्मीची कृपा
प्राप्त होत नाही.
* मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर
सरस्वतीमाता, श्रीगणेशाचा फोटो ठेवावा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
दैनिक पंचांग शनिवार, दि. २ मार्च २०२४
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, विशाखा १४|४२
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. मित्रांचा सहयोग मिळेल. मनोबल वाढेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे.
वृषभ : घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग. मनोबल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे.
मिथुन : खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. मानसिक प्रसन्नता लाभेल. खर्च वाढतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
कर्क : व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात वाढ होईल. तब्येतीची काळजी घ्या. व्यापारय्व्यवसायासाठी छान दिवस.
सिंह : घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक लाभ. प्रियजनांची भेट. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. एखादी चांगली संधी लाभेल.
कन्या : आध्यात्मिक क्षेत्रात मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल.
तूळ : आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते. चांगल्या घटना घडतील. कामात यश. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले
राहील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक : स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. लांबलेल्या प्रकरणात यश. एखादी चांगली संधी लाभेल.
प्रवासाचे योग संभवतात. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील.
धनु : विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. कला, संगीत, नाट्य क्षेत्रात सुसंधी मिळेल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील.
मकर : धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. प्रवास शयतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण कमी होईल. महत्वाचे निर्णय घेणे शयतो टाळावे.
कुंभ : अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. खर्च वाढतील. तुमच्या
व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल.
मीन : अध्ययनात छान यश. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. व्यवसायात प्रगती. प्रवासाचे योग संभवतात. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
जुनाट आजारांच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
जुनाट आजारांच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे आजार असलेल्या व्यक्तींनी त्या त्या आजाराची संपूर्ण माहिती डॉटर, इतर तज्ज्ञ वा पुस्तकांतून मिळवावी. म्हणजे हा रोग त्यांना का झाला, त्याची लक्षणे काय असतात, त्यावरचे उपचार कोणते, त्या रोगातील गुंतागुंती कोणत्या इत्यादी गोष्टींबाबत त्यांना माहिती मिळेल व त्या अनुषंगाने दैनंदिन जीवनात काय काय बदल करणे हिताचे आहे हेही कळेल. रोगाची पूर्ण माहिती झाल्यानंतर रुग्ण स्वतःची काळजी जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकेल. दुसरे म्हणजे सर्व तपासण्या व औषधोपचार यांचे रिपोटर्स वा कागदपत्रे जपून ठेवावीत. शयतो तारखांनुसार लावून त्यांची फाईल बनवावी. त्यामुळे कोणत्याही डॉटरांना रुग्णावर उपचार करणे सोपे जाईल, औषध ठरवणे सोपे जाईल, तसेच अनावश्यक औषधोपचार टाळता येतील. फीट्स येणार्या व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब आदी रोगांच्या रुग्णांनी स्वतःविषयीची माहिती असलेले ओळखपत्र कायम जवळ बाळगावे. त्यात नाव, पत्ता, फोन नंबर, झालेला रोग, त्यावर चालू असलेले उपचार इत्यादी बाबींची नोंद असावी. आवश्यकता भासल्यास या माहितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दुर्घटनेविषयी कळवता येईल, तसेच रुग्ण बेशुद्धावस्थेत असल्यास पूर्वीच्या उपचारांची माहिती मिळाल्याने योग्य औषधोपचार करता येतील. जुनाट आजारांच्या रुग्णांनी स्वतःला कशामुळे त्रास होतो याच्याही नोंदी ठेवाव्या. जसे जागरण झाल्यास झटके येणार्या फीट्स वा मिरगीच्या व्यक्तीने जागरण टाळावे. अशा नोंदी ठेवून त्यानुसार दैनंदिन जीवनात बदल केल्यास रुग्ण स्वतःच्या तब्येतीची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकेल व त्याची काळजी घेणार्या डॉटरांना मदतही करू शकेल.
दम्याच्या रुग्णांसाठी
दम्याच्या रुग्णांसाठी
ज्या व्यक्ती दम्याने ग्रस्त आहेत, त्यांनी पावसात भिजणे टाळावे. पावसात भिजण्याने
दम्याचा अॅटॅक येण्याची शयता अधिक असते. जर एखादा पदार्थ खाण्यामुळे आजाराची
तीव्रता वाढत असेल तर नंतर कधीही तो पदार्थ खाऊ नये. या आजाराने त्रस्त व्यक्तींनी नेहमी
इनहेलरचा वापर करावा. शयतो घरी बनविलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. बाहेरचे
पदार्थ खाणे टाळावे.







