हेल्दी शेंगदाणा चिक्की

हेल्दी शेंगदाणा चिक्की
शेंगदाणा चिक्कीमध्ये एंटीऑसीडेंट्स आणि फायोफिनॉल असत जे ब्लड लाट पासून
बचाव करतो. ही चिकी डिम्नेशिया आणि अल्जाइमरच्या धोयाला कमी करण्यास मदत करते.
तसेच मस्तिष्क तेज करणे आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. शेंगदाणा चिक्कीमध्ये
मोनो सॅचुरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ओलेईक ऍसिड असत. यामुळे कोलेस्टरॉल लेवल नियंत्रित
राहत. त्याचप्रमाणे गुळामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत मिळते.

सुविचार

नशिबावर भरोसा ठेवून राहणे म्हणजे केवळ भेकडपणा आहे. : नेपोलियन

नाचणीच्या चकल्या

नाचणीच्या चकल्या
साहित्य : १ वाटी नाचणी, पाव वाटी
गव्हाचे पीठ, अर्धा चमचा तिखट, १॥ चमचा
तीळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग, २
टे. स्पून तेल/लोणी मोहनासाठी सव्वा वाटी
पाणी.
कृती : सव्वा वाटी पाणी + मीठ +
तिखट + हिंग + ओवा + तीळ तेल सर्व
एकत्र करून गॅसवर ठेवा. खळखळून उकळी
आली की त्यात नाचणी व गव्हाचे पीठ घाला.
नीट ढवळा. २ मि. झाका. नंतर गॅस बंद करा.
१५-२० मिनिटांनी हे पीठ खूप मळून घ्या.
नेहमीप्रमाणे चकल्या करा.

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी
एक चमचा दही घेऊन त्यात एक चमचे
उडद डाळीची पावडर घेऊन पेस्ट करावी.
चेहर्‍यावर लावावे. सुकल्यावर पाण्याचे
सपकाटे मारून मग कापसाने खालून वर अशा
दिशेने पुसावे. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या
कमी होतात.
त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून
सुर्याची किरणे अंगावर घ्यावीत आणि कोवळ्या
उन्हात सुर्यनमस्कार घालण्याचाही त्वचेसाठी
खुप फायदा होतो.

सल्ला

आवळ्याचा चमचाभर रस जिरे व
खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ
दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त
कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते.
लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध
आहे.

वास्तू

मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर
सरस्वतीमाता, श्रीगणेशाचा फोटो ठेवावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

न्यायाधीश : दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्यानंतर
मी तुझ्या बायकोला दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय
घेतला आहे…
गण्या : खूप खूप धन्यवाद जज साहेब…
आपण खूप दयाळू आहात.
जेव्हा केव्हा शय असेल तेव्हा तेव्हा मी देखील तिला
थोडेफार पैसे देत जाईन.. !!!

दैनिक पंचांग रविवार, दि. ३ मार्च २०२४

भानुसप्तमी, कालाष्टमी, शके १९४५
शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, अनुराधा १५|५५
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य 

मेष : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. वाहने व उपकरणे

सावकाश हाताळावीत. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल.
वृषभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. दिवस

निरुत्साही वाटेल. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे.
मिथुन : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. मागील उधारी उसनवारी वसुल

होईल. दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
कर्क : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. पितृचिंता

सतावेल.शत्रुपक्ष डोके वर काढेल.
सिंह : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. मित्रांची साथ लाभेल. नवपरिणीतांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गुढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नती कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. मातृचिंता सतावेल. वाहने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

वृश्चिक : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतानाही यशस्वी व्हाल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल.

धनु : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आत्मविश्वास द्विगुणीत होईल मात्र बेफिकीर
असायला नको. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात.

मकर : आपली दूरदृष्टी आणि बुद्धीने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होईल. मागील केलेली भती आज फळास येईल व राहिलेली कामे पूर्ण होतील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता.

कुंभ : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. मुलर-मुलींची चिंता सतावेल. हितशत्रू डोके वर काढण्याची शयता आहे. कालच्या दिवसाइतका आजचा दिवस चांगला जाणार नाही. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल.

मीन : अडकलेला पैसा मिळेल. भूमी, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. मानसिक स्थिती उत्तम राहिल. मागील चिंता दूर होतील. मात्र कार्यालयीन सहकार्यांशी सुसंवाद ठेवावे लागतील. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

डॉटरांनी किती फी घ्यावी, हे कसे ठरते?

डॉटरांनी किती फी घ्यावी, हे कसे ठरते?

तुम्ही पाहिले असेल की, डॉटरांच्या खोलीत “पहिल्या तपासणीची फी ५० रुपये”, “पुनर्तपासणी २५ रुपये” अशा पाट्या लावलेल्या असतात. वेगवेगळ्या शहरात ही फी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या बाबतीतही ही फी वेगवेगळी असते. वैद्यकीय सेवा ही अत्यंत कौशल्यपूर्ण अशी तांत्रिक सेवा आहे. डॉटरांनी किती फी घ्यावी, याबाबत कोणताही कायदा नाही. एखादा डॉटर ५० घेईल, तर दुसरा ५०० घेईल. स्वतःची फी ठरवण्याचा डॉटरला कायद्याने अधिकार आहे. डॉटरचे स्वतःविषयीचे मूल्यमापन, त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव, त्याच्या पदव्या, त्याला मिळालेली प्रसिद्धी, त्याच्याकडे असलेली आधुनिक उपकरणे व रुग्णांची आर्थिक परिस्थिती या सर्वांच्या आधारे डॉटरांची फी आपोआप ठरत असते. बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या (जसे बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ) संघटना अस्तित्वात असतात. त्या डॉटर व रुग्ण या दोहोंचे हीत लक्षात घेऊन तपासणी शुल्क ठरवतात. यात रुग्णाला फीबाबत माहिती व्हावी, गैरसमज होऊ नये, तसेच डॉटरांचेही नुकसान होऊ नये; हा हेतू असतो. बर्‍याचदा डॉटर इतरांपेक्षा कमी फी घेऊन अनैतिक स्पर्धा चालू करतात. त्यालाही यामुळे आळा बसू शकतो. गरज, पुरवठा व बाजारातील परिस्थिती यांवर जसे सर्व वस्तूंचे भाव ठरतात; त्यानुसारच डॉटरांची फीही ठरते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबू पाण्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. तसेच याचा वापर केल्याने
ताजगी कायम राहते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात राहते. जे रोग
प्रतिरोधक क्षमतेला बूस्ट करण्याचे काम करतो. वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून
लिंबू पाण्यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय नाही आहे.