जुनाट आजारांच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

0
60

जुनाट आजारांच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे आजार असलेल्या व्यक्तींनी त्या त्या आजाराची संपूर्ण माहिती डॉटर, इतर तज्ज्ञ वा पुस्तकांतून मिळवावी. म्हणजे हा रोग त्यांना का झाला, त्याची लक्षणे काय असतात, त्यावरचे उपचार कोणते, त्या रोगातील गुंतागुंती कोणत्या इत्यादी गोष्टींबाबत त्यांना माहिती मिळेल व त्या अनुषंगाने दैनंदिन जीवनात काय काय बदल करणे हिताचे आहे हेही कळेल. रोगाची पूर्ण माहिती झाल्यानंतर रुग्ण स्वतःची काळजी जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकेल. दुसरे म्हणजे सर्व तपासण्या व औषधोपचार यांचे रिपोटर्स वा कागदपत्रे जपून ठेवावीत. शयतो तारखांनुसार लावून त्यांची फाईल बनवावी. त्यामुळे कोणत्याही डॉटरांना रुग्णावर उपचार करणे सोपे जाईल, औषध ठरवणे सोपे जाईल, तसेच अनावश्यक औषधोपचार टाळता येतील. फीट्स येणार्‍या व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब आदी रोगांच्या रुग्णांनी स्वतःविषयीची माहिती असलेले ओळखपत्र कायम जवळ बाळगावे. त्यात नाव, पत्ता, फोन नंबर, झालेला रोग, त्यावर चालू असलेले उपचार इत्यादी बाबींची नोंद असावी. आवश्यकता भासल्यास या माहितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दुर्घटनेविषयी कळवता येईल, तसेच रुग्ण बेशुद्धावस्थेत असल्यास पूर्वीच्या उपचारांची माहिती मिळाल्याने योग्य औषधोपचार करता येतील. जुनाट आजारांच्या रुग्णांनी स्वतःला कशामुळे त्रास होतो याच्याही नोंदी ठेवाव्या. जसे जागरण झाल्यास झटके येणार्‍या फीट्स वा मिरगीच्या व्यक्तीने जागरण टाळावे. अशा नोंदी ठेवून त्यानुसार दैनंदिन जीवनात बदल केल्यास रुग्ण स्वतःच्या तब्येतीची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकेल व त्याची काळजी घेणार्‍या डॉटरांना मदतही करू शकेल.