फुलांचे चिरोटे
साहित्य : बारीक रवा एक वाटी, तूप
पाव वाटी, चिमूटभर मीठ, दूध गरजेनुसार,
गुलाबी रंग चिमूटभर, हिरवा रंग चिमूटभर,
तळण्यासाठी तूप.
कृती : रव्याला वनस्पती तूप चोळून
घ्या. मीठ घाला. मिश्रणाचे दोन भाग करा. एका
भागात गुलाबी रंग घालून दुधाने मळून घ्या.
दुसर्या भागात हिरवा रंग घालून दुधाने मळून
घ्या. हे पीठ दोन तास ओल्या कपड्याखाली
ठेवा. नंतर वेगवेगळे कुटून घ्या. गुलाबी रंगाचे
दोन गोळे करा.
एक पातळ लाटून घ्या. त्यावर साटा
पसरवून त्याच्या एक इंचाच्या पट्ट्या कापून
घ्या. हिरव्या रंगाचा एक गोळा घेऊन पातळ
लाटून घ्या. त्यावर साटा लावा, पट्ट्या
कापून घ्या. पहिल्यांदा गुलाबी रंगाचा रोल
करा. त्यावर हिरवी पट्टी गुंडाळून घ्या. मधे
दाबून हलया हातांनी थोडेसे लाटा व तुपात
तळून घ्या. छान फुलाचा आकार येईल.
त्यावर पिठीसाखर घाला.