दैनिक पंचांग रविवार, दि. ३ मार्च २०२४

0
24

भानुसप्तमी, कालाष्टमी, शके १९४५
शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, अनुराधा १५|५५
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य 

मेष : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. वाहने व उपकरणे

सावकाश हाताळावीत. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल.
वृषभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. दिवस

निरुत्साही वाटेल. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे.
मिथुन : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. मागील उधारी उसनवारी वसुल

होईल. दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
कर्क : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. पितृचिंता

सतावेल.शत्रुपक्ष डोके वर काढेल.
सिंह : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. मित्रांची साथ लाभेल. नवपरिणीतांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गुढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नती कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. मातृचिंता सतावेल. वाहने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

वृश्चिक : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतानाही यशस्वी व्हाल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल.

धनु : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आत्मविश्वास द्विगुणीत होईल मात्र बेफिकीर
असायला नको. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात.

मकर : आपली दूरदृष्टी आणि बुद्धीने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होईल. मागील केलेली भती आज फळास येईल व राहिलेली कामे पूर्ण होतील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता.

कुंभ : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. मुलर-मुलींची चिंता सतावेल. हितशत्रू डोके वर काढण्याची शयता आहे. कालच्या दिवसाइतका आजचा दिवस चांगला जाणार नाही. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल.

मीन : अडकलेला पैसा मिळेल. भूमी, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. मानसिक स्थिती उत्तम राहिल. मागील चिंता दूर होतील. मात्र कार्यालयीन सहकार्यांशी सुसंवाद ठेवावे लागतील. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.