मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
40

डॉटरांनी किती फी घ्यावी, हे कसे ठरते?

तुम्ही पाहिले असेल की, डॉटरांच्या खोलीत “पहिल्या तपासणीची फी ५० रुपये”, “पुनर्तपासणी २५ रुपये” अशा पाट्या लावलेल्या असतात. वेगवेगळ्या शहरात ही फी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या बाबतीतही ही फी वेगवेगळी असते. वैद्यकीय सेवा ही अत्यंत कौशल्यपूर्ण अशी तांत्रिक सेवा आहे. डॉटरांनी किती फी घ्यावी, याबाबत कोणताही कायदा नाही. एखादा डॉटर ५० घेईल, तर दुसरा ५०० घेईल. स्वतःची फी ठरवण्याचा डॉटरला कायद्याने अधिकार आहे. डॉटरचे स्वतःविषयीचे मूल्यमापन, त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव, त्याच्या पदव्या, त्याला मिळालेली प्रसिद्धी, त्याच्याकडे असलेली आधुनिक उपकरणे व रुग्णांची आर्थिक परिस्थिती या सर्वांच्या आधारे डॉटरांची फी आपोआप ठरत असते. बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या (जसे बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ) संघटना अस्तित्वात असतात. त्या डॉटर व रुग्ण या दोहोंचे हीत लक्षात घेऊन तपासणी शुल्क ठरवतात. यात रुग्णाला फीबाबत माहिती व्हावी, गैरसमज होऊ नये, तसेच डॉटरांचेही नुकसान होऊ नये; हा हेतू असतो. बर्‍याचदा डॉटर इतरांपेक्षा कमी फी घेऊन अनैतिक स्पर्धा चालू करतात. त्यालाही यामुळे आळा बसू शकतो. गरज, पुरवठा व बाजारातील परिस्थिती यांवर जसे सर्व वस्तूंचे भाव ठरतात; त्यानुसारच डॉटरांची फीही ठरते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.