चेहर्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी
एक चमचा दही घेऊन त्यात एक चमचे
उडद डाळीची पावडर घेऊन पेस्ट करावी.
चेहर्यावर लावावे. सुकल्यावर पाण्याचे
सपकाटे मारून मग कापसाने खालून वर अशा
दिशेने पुसावे. यामुळे चेहर्यावरील सुरकुत्या
कमी होतात.
त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून
सुर्याची किरणे अंगावर घ्यावीत आणि कोवळ्या
उन्हात सुर्यनमस्कार घालण्याचाही त्वचेसाठी
खुप फायदा होतो.