नाचणीच्या चकल्या

0
65

नाचणीच्या चकल्या
साहित्य : १ वाटी नाचणी, पाव वाटी
गव्हाचे पीठ, अर्धा चमचा तिखट, १॥ चमचा
तीळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग, २
टे. स्पून तेल/लोणी मोहनासाठी सव्वा वाटी
पाणी.
कृती : सव्वा वाटी पाणी + मीठ +
तिखट + हिंग + ओवा + तीळ तेल सर्व
एकत्र करून गॅसवर ठेवा. खळखळून उकळी
आली की त्यात नाचणी व गव्हाचे पीठ घाला.
नीट ढवळा. २ मि. झाका. नंतर गॅस बंद करा.
१५-२० मिनिटांनी हे पीठ खूप मळून घ्या.
नेहमीप्रमाणे चकल्या करा.