रसिक ग्रुपच्या पुरस्कारांची घोषणा! गुढीपाडव्याला होणार वितरण

सौरभ बोरा, महेश सूर्यवंशी, प्रा.मिलिंद जोशी, आ.संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, दिनेश आहेर व गणेश भुतारे मानकरी

नगर – सामाजिक व सांस्कृतिकसह विविध क्षेत्रात समाजाभिमुख कार्याद्वारे महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीमत्वांना तसेच  अहिल्यानगरच्या जडणघडणीत, विकासात मोलाची भर घालत नावलौकिक वाढवण्यासाठी भरीव योगदान देणार्‍या व्यक्तींना रसिक ग्रुपच्या वतीने दरवर्षी ‘रसिक गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येते. गेल्या २२ वर्षांपासून अखंडितपणे या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण केले जाते. यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचे खजिनदार महेश सूर्यवंशी, व्याख्याते व मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, आमदार संग्राम
जगताप, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व गणेश भुतारे
यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याचे वितरण ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गुढीपाडव्या निमित्त होणार्‍या
‘रसिकोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमात होणार आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.
यावर्षीचा स्व.शांतीकुमार फिरोदिया स्मृती रसिक गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार नगरचे पुत्र व जगातील सर्वात
मोठ्या व श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरचे सलग तीनवेळा विश्वस्तपद भूषवणारे सौरभ बोरा यांनी
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. तसेच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
देवस्थानचे खजिनदार महेश सूर्यवंशी यांना धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल स्व.प्रदीप गांधी स्मृती
गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व व्याख्याते प्रा.मिलिंद जोशी
यांचा साहित्य चळवळ वृध्दिंगत करत या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करणात येत
आहे. याबरोबरच आमदार संग्राम जगताप यांनी शहरात मोठ्या प्रमाणात सुरु  केलेल्या कामांमुळे शहराच्या विकासात
मोलाची भर घातल्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त
यशवंत डांगे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी  दिलेल्या योगदानाबद्दल व शहराच्या
सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी रखडलेल्या नाट्य संकुलच्या कामास गती दिल्याबद्दल त्यांचाही विशेष गौरव
पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.  या सोहळ्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस
निरीक्षक दिनेश आहेर यांनी कर्तव्य बजावत अनेक गुन्ह्यांचा शोध लावत गुन्हेगारांवर वचक ठेवत जिल्ह्यात कायदा
व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
आहे. तसेच उत्कृष्ट कल्पना शक्तीने मंडप सजावट करणारे गणेश भुतारे यांनाही यावेळी गौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सावेडीच्या जॉगिंग पार्क मधील झाडांची निगा राखत सौंदर्य वाढवून पर्यावरण
क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते जीवन खरात यांचा सुप्रभात ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात येणार
आहे, अशी माहिती दिपाली देऊतकर, सुदर्शन कुलकर्णी यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभाचे नियोजन
ग्रुपचे तेजा पाठक, निखिल डफळ, समीर पाठक, प्रशांत अंतापेलू, श्रीकृष्ण बारटक्के, स्नेहल उपाध्ये, प्रसन्न एखे, बाळकृष्ण गोटीपामुल, तुषार बुगे, मीनाक्षी पाटील, शारदा होशिंग, ऋषिकेश येलुलकर, ओंकार अंतापेलु करीत आहेत.

युवा गायक प्रियांका बर्वे व धवल चांदवडकर यांचा आनंदधाम येथे २८ मार्चला ‘भतिसंध्या’ कार्यक्रम

नगर – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त
जैन सोशल फेडरेशनतर्फे आनंदधाममध्ये २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता गायिका प्रियांका बर्वे व गायक धवल
चांदवडकर यांच्या भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उमेश बोरा यांनी दिली.
भक्तिसंध्येच्या कार्यक्रमात प्रियांका बर्वे आणि धवल चांदवडकर यांची एकापेक्षा एक सरस भक्तिगीते भाविकांना
जवळून ऐकण्याचा आनंद घेता येणार आहे.

पुणे येथील प्रियांका बर्वे यांनी मराठीसह अनेक भाषांमध्ये गायन केले आहे. सा रे ग म प मुळे त्या लोकप्रिय
झाल्या. देवराई आणि धुडगूस या मराठी चित्रपटात तर संगीत संशयकल्लोळ नाटकात त्यांनी भूमिका केल्या.
मंद धुंद चांदण्यात, काफिला निघून गेला, मोरी चुनरी, या रूपेरी, कैसे ये बोलू ही त्यांची गाजलेली गीतं. गाणे तुझे अंतरीचे, एक रम्य संध्याकाळ आणि निळे आकाश हे संगीत अल्बम आहेत. त्या आकाशवाणीच्या गायिका आहेत. युवा कलाकार पुरस्कार अत्रे पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. पुण्यातील उदयोन्मुख प्रतिभावान गायक धवल चांदवडकर
हे पार्श्वगायक, कला दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणूनही ओळखले जातात.

पं.हेमंत पेंडसे, पं. रघुनंदन पणशीकर आणि पं.भवदीप जयपुरवाले यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. झी मराठीवरील सा रे ग म प सिझन १० मध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी. त्यांनी प्ले बॅक सिंगर म्हणून त्यांनी वेगळेपणाचा ठसा उमटवला. रफी, मन्ना डे, मुकेश आणि किशोर कुमार यांच्या गाण्यांसाठी ते प्रसिध्द आहेत. राजर्षी शाहू पुरस्कार, राम कदम  पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. मराठी फिल्म मी अर्जुन बोलतो आणि निळकंठ मास्तर यामध्ये त्यांनी
दिग्दर्शन केले आहे. आठवतो का तुला? एका पावसात, कोवळे दिवस, राधा ही बावरी, पाहू बाई पाहू या मराठी गीतांचे
अल्बम आहेत. त्यांचे वेब सिरीज, टायटल सॉग प्रसिद्ध आहेत.

संगीत क्षेत्रात योगदान देत असलेल्या  युवा कलाकार प्रियांका बर्वे आणि धवल चांदवडकर भक्तिसंध्या मैफिली निमित्ताने नगरकरांना भेटणार आहेत. रसिक नगरकरांनी या भक्तिसंध्या कार्यक्रमाचा आनंद प्रत्यक्ष उपस्थित राहून घ्यावा,
असे आवाहन उमेश बोरा, गिरीश शींगी, सचिन भंडारी यांनी केले आहे.

‘हार्टफुलनेस अहिल्यानगर’ आयोजित ‘एकात्मक अभियानास’ प्रतिसाद

नगर – दैनंदिन जीवनात येणार्‍या ताणय्तणावापासून मुक्त होऊन स्वतःच्या हृदयाशी संवाद साधून एक आगळावेगळा एकात्मक होण्याचा अनुभव उपस्थित नगरकरांनी घेतला. हार्टफुलनेस अहिल्यानगर केंद्र आणि भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय यांच्यावतीने एकात्मक अभियानांतर्गत धर्माधिकारी मळा परिसरातील आयुर्वेद व्यासपीठाच्या धन्वंतरी उद्यान सभागृहात आयोजित या ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी
अध्यक्षा माजी नगरसेविका पुष्पा बोरुडे, माजी नगरसेविका सौ. वंदना ताठे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, आंतरराष्ट्रीय
ख्यातीचे गायक पवन नाईक, हार्टफुलनेस संस्थेचे प्रशिक्षक डॉ. दत्तात्रेय गिरगे, सुनील बल्लाळ, वैद्य मंदार भणगे, डॉ.सौ. अर्चना गिरगे, विष्णू पालीवाल, संयोजक महेश लेले याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे पुष्पा बोरुडे यांनी
बोलताना आपल्या धावपळीच्या युगात मनशांती हरवत चालली असताना आज आयोजित हे ध्यान शिबिर स्वतःचा आत्मिक
शोधाकडे घेऊन जाणारे असल्याचे सांगितल. रवींद्र बारस्कर यांनी मनोगतात शारीरिक सुदृढतेबरोबरच मानसिक शांतीकडे
प्रयत्नपूर्वक लक्ष देणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने हार्टफुलनेसने आयोजित केलेले शिबिर महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. गायक पवन नाईक यांनी बोलताना स्वतःचा आत्मिक शोध घेऊन अंतरात्म्याशी संवाद साधण्याची कला ही ध्यानातून येते. अनेक संतांनी आपल्याला परमेश्वरा जवळ पोहोचण्यासाठी हा मार्ग सांगितला आहे. आजच्या या
शिबिरातून स्वतःचा शोध घेण्याचा चैतन्यमय प्रवास सुरू झाला असल्याचे सांगितले.

वैद्य मंदार भणगे यांनी प्रास्ताविकात भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय व हार्टफुलनेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने महाराष्ट्रातील गावागावात व घराघरात ध्यान पोहोचावे या प्रमुख उद्देशाने एकात्मक अभियानाचे आयोजन
केले आहे. या शिबिरास प्रतिसाद मिळाला असून यापुढेही विनामूल्य असणार्‍या या प्रशिक्षणात सगळ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

डॉ.दत्तात्रेय गिरगे, सुनील वल्लाळ, सौ. अर्चना गिरगे, वैद्य मंदार भणगे, विष्णू पालीवाल, अमोल आंदे, सौ.रिना
खरमाळे, शुभांगी केंगे यांनी उपस्थितांना ध्याना विषयी प्रशिक्षण दिले. हे ध्यान शिबिर सर्वांसाठी मोफत असून आपल्या
परिसरात, कॉलनी, सोसायटी, गावे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा येथे आयोजन केल्यास प्रशिक्षक तिथे येऊन मोफत  मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रशिक्षक दत्तात्रय गिरगे यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९४०५०५३५४०, ९४२३४६३९८५, ९८२२६९२०६ या क्रमांकावर संपर्क साधावा. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी हार्टफुलनेस केंद्राचे प्रमुख डॉटर ऋषिकेश उदमले, भरत आठरे, महेश लेले, केंद्रातील अभ्यासी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. सौ. सुपर्णा लेले यांनी आभार मानले.

उमेदच्या सामाजिक कार्याने उपेक्षितांना जीवन जगण्याची नवीन उमेद मिळाली

नगर – उमेदच्या सामाजिक कार्याने उपेक्षितांना जीवन जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे. दुर्बल घटकांना आधार देण्याचे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे शिवाजी कपाळे यांनी सांगितले. गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन, समाजातील
दुर्बल घटकांना आरोग्य आरोग्य सेवा पुरविणार्‍या उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथे मोफत आरोग्य शिबिर, स्त्री रोग तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना कार्य गौरव
पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सिनेअभिनेते राजेश मन्चरे यांनी महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. सर्व महिलांनी या कार्यक्रमात एकत्र येऊन
स्त्री शक्तीचा जागर केला.

महापुरुषाना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोही संगीत विद्यालयाचे स्वप्नील  खराडे व प्रा.आदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  म्हणून अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेचे संतोष लांडे, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, साई आदर्श मल्टीस्टेटचे
शिवाजी कपाळे, व्हेरासिटी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती सोनिग्रा, फाऊंडेशनचे अध्यक्ष
अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, महिला व बाल अपराध प्रतिबंधक शाखेच्या महिला
पोलीस दीपा आठवले, उद्योजक किरण दाभाडे, सिंडिकेट बँक अधिकारी महादेव ढोबळे,
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट उपस्थित होते.
डॉ. दिलीप पवार म्हणाले की, सामाजिक जाणीव ठेऊन उमेद फाऊंडेशनचे कार्य
सुरु आहे. वंचितांचे आश्रू पुसण्याबरोबर त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी सुरु असलेले कार्य
दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल साळवे म्हणाले की, उमेद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागासह
शहरातील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे.
तसेच आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य
शिबिराच्या माध्यमातून आधार दिला जात असल्याचे स्पष्ट केले. कुणाल तनपुरे यांनी
फाऊंडेशनच्या भविष्यातील विविध सामाजिक प्रकल्पाची माहिती दिली.
ज्योती सोनिग्रा यांनी पुढील काळात उमेद बरोबर काम करून गरजू मुलांच्या
शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दीपा आठवले यांनी महिलाची सुरक्षा व कायदा
या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात उमेद सोशल फाऊंडेशनच्या
राहुरी फॅटरी शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात
आली. शाखा प्रमुख कुणाल तनपुरे, कार्यकरी
अधिकारी राजेश मंचरे, प्रमुख सल्लागार रणजित
लहारे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे,
संघटक श्रीकांत राऊत यांना नियुक्ती पत्र देऊन
सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर
सप्रे, आप्पासाहेब सप्रे, आर्ट ऑफ लिविंगच्या
भारती कोळसे, युगन्धर फाऊंडेशनच्या विद्या करपे,
दिव्यांकुर फाऊंडेशनचे (पुणे) अध्यक्ष लक्ष्मण
म्हस्के, वेलनेस कोच कविता खर्डे, रिपाईच्या महिला
शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, आपचे जिल्हाध्यक्ष
भरत खाकाळ, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत
म्हस्के, जिल्हा रुग्णालय नेत्र विभागचे सतीश
आहिरे, शब्दगंधचे सुनील गोसावी, राम शिंदे, प्रिया डोळस, मनीषा कदम, शीतल खराडे,
श्रुती चव्हाण, अर्जुन वायभासे, राधा साळवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन उमेद फाऊंडेशनचे सचिव सचिन साळवी, सल्लागार अ‍ॅड. दीपक
धिवर, सदस्य विजय लोंढे, रवी सुरेकर, रवी साखरे, योगेश घोलप, प्रकाश भालेराव,
अक्षय गाडेकर, शुभांगी सोनवणे, मनीषा साळवे, वैशाली तनपुरे, रेशमा तनपुरे, डॉ. सतीश
गिर्‍हे, अश्विनी वाघ यांनी केले होते. कार्यक्रमासाठी नवनागापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते. या
कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर
खुरांगे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुला, रमेश गाडगे, जय
असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

जंगलाचे संरक्षण हे भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि पौष्टिक अन्नपुरवठा सुनिश्चित करण्याबद्दल देखील आह

नगर – जंगलाचे संरक्षण हे केवळ झाडे वाचवण्याबद्दल नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि पौष्टिक अन्नपुरवठा
सुनिश्चित करण्याबद्दल देखील आहे. जंगलाचे जतन करून, आपण उपासमारीशी लढण्यास, जैवविविधता राखण्यास आणि
जगभरातील शेतकरी समुदायांना पाठिंबा देण्यास मदत करतो, असे सचिन कंद यांनी सांगितले. जागतिक वन दिनाचे महत्त्व सांगून हा दिवस लोकांना पृथ्वीवरील जीवनासाठी जंगले का महत्वाचे आहेत हे समजून समजावून सचिन
कंद यांनी सांगितले. जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात  विभागीय वनाधिकारी सचिन कंद, प्राचार्य बाळासाहेब कर्डिले, हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
करून वन दिन साजरा करण्यात झाला. हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी सांगितले की वनांचे आणि वृक्षांचे महत्त्व सांगितले. जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वृक्ष लागवड संवर्धन काळाची गरज आहे.
त्याकरिता बेकायदा होणारी वृक्षतोड थांबवणे आवश्यक असून उन्हाळ्यामध्ये अनेक वनांना वन वणवे लागतात, ते रोखण्यासाठी त्या त्या भागातील नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे असून वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
सहाय्यक वनसंरक्षक सोनल केसरकर यांनी यावर्षीची वन दिनाची थीम वने आणि अन्न असल्याचे सांगून जी जंगले आणि जागतिक अन्न सुरक्षेमधील मजबूत संबंध अधोरेखित करते. जंगले फळे, काजू, बियाणे आणि वन्य प्राणी यासारखे आवश्यक अन्न स्त्रोत प्रदान करतात. मातीचे आरोग्य सुधारून, पाण्याचे चक्र नियंत्रित करून आणि मधमाश्या आणि पक्षांसारख्या परागकरांसाठी अधिवास निर्माण करून ते शेतीला देखील आधार देतात, असे सांगितले.
प्राचार्य बाळासाहेब कर्डिले यांनी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वृक्ष लागवड यापूर्वी केल्याचे सांगून, भवितव्यात
परिसरातील उपलब्ध जागेवरती मीयावाकी प्रकल्पाद्वारे वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच व्यापक जनजागृती करून, कृतिशील
कार्य करण्यात येत आहे असे तेम्हणाले. यानंतर परिसरात आंबा, आवळा, कांचन, लक्ष्मी तरु आदी
वृक्ष रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख प्रा. डी डी अहिरराव,
डॉ. बी सी खरबस, प्रा. एस डी मुळे, प्रा. एस एस हरिप, प्रा. बी आर पाटील, प्रा. आर आर पवार, प्रा. जी एम
बरबडे, प्रा. एस एस वडीतके, प्रा. जे डी चौधरी, एस एस सारडा, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एस एम
गायकवाड, मनीषा सरोदे याचबरोबर वन रक्षक ज्ञानेश्वर दहिफळे, अफसर पठाण, वैशाली दराडे, रूपाली सत्रे
यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना
समन्यवयक डॉ. डी बी करंजुले यांनी केले. प्रबंधक एम एस.चौधरी यांनी आभार मानले.

डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीमध्ये इलेसा २०२५ उत्साहात

नगर – विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच इलेझा २०२५ हा तीन दिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. यावेळी मुख्य अतिथी संस्थेचे डायरेटर टेनिकल प्रा.सुनिल कल्हापुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय नाईक, ई अ‍ॅण्ड टी.सी.व्ही.एल.एस. आय.डिझाईन अ‍ॅण्ड टेनॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.
अनिता पाटील उपस्थित होते. प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबत विविध सह अभ्यासकम आणि अभ्यासे तर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे मनोगत व्यक्त करताना प्रा. सुनिल कल्हापुरे यांनी सांगितले. या तीन दिवसीय तांत्रिक महोत्सवामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन,
वेब डिझाईनींग, पोएट्री, रांगोळी, स्केचींग आणि ड्राईंग या स्पर्धांमुळे मुलांचे डिझाईन कौशल्य आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो. तसेच डिबेट स्पर्धेमुळे मुलांचे संवादकौशल्य, आंतरव्यक्ती कौशल्य, नेतृत्वकौशल्य, सादरीकरण, विश्लेषणात्मक आणि तार्किक कौशल्य यासारख्या विविध कौशल्यामध्ये वाढ होते. तसेच क्वीझ आणि पाल स्पर्धांमुळे मुलांची तार्किक विचारसरणी सुधारण्यास मदत होते. त्यांची माहिती साठविण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्य सुधारते. गेमींग स्पर्धेमुळे मुलांचा ताण कमी होणे, यशाची भावना निर्माण होणे आणि संज्ञात्मक कौशल्य सुधारते
इ. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. या महोत्सवाम ध्ये सर्व अभियांत्रिकी विभागातील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर महोत्सवाचे समन्वयक म्हणून ई अ‍ॅण्ड टी.सी. विभागातील
सर्व शिक्षक कर्मचार्‍यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ई अ‍ॅण्ड टी.सी अभियंता विद्यार्थी
संघटनेचे विद्यार्थी कु. सामिया शेख, कु. जान्हवी अटकरे, यश नैयर, कु. श्रेया अंबाडे, कु. अनुपमा कहांडळ,
वैभव तुवर, तेजस तरवडे, शुभम अत्रे, कु.श्रेया कोरे, कल्पित जरे, गौरी उगले, चेतन रासणे, कोमल आडसूळ यांनी परिश्रम घेतले. या सर्वांचे ई अँण्ड टी.सी. व्ही.एल.एस.आय. डिझाईन अ‍ॅण्ड टेनॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.अनिता पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमातील उपक्रमाबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील, डायरेटर जनरल डॉ.पी.एम. गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 

आरोग्य शिबिरे हे सेवेचे ‘महाकुंभच

नगर – सध्या न परवडणारा
औषधोपचाराचा खर्च व महागडी उपचार
पद्धती यामुळे सामान्यांना उपचार घेणे
अशय झाले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये वर्षभर विविध आरोग्य शिबिरे घेतली
जातात. यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य
शिबिरांच्या मार्फत आरोग्य सेवेचा महाकुंभच होत आहे. या महाआरोग्य शिबिरात सर्व
प्रकारच्या आरोग्य विषयक तपासणी मोफत करून सवलतीच्या दरात रुग्णांना उपचार
दिले जात आहेत. येथे येणारे रुग्णांना आपुलकीने, जिव्हाळ्याने, सेवाभावी वृत्तीने दिली
जाणारी आरोग्य सेवा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक सुवालाल बोथरा
यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिना निमित्त
अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विनोद बोथरा,
प्रमोद बोथरा, प्रकाश बोथरा, सुबोध बोथरा, मोहक बोथरा, कविताताई बोथरा,
संगीता बोथरा, कल्पना बोथरा, सेजन बोथरा, रवीना बोथरा, सेजल बोथरा, महिमा
बोथरा, सुधांशु बोथरा, कमलेश गुगळे, राजेश गुगळे, निखिल बोथरा आदींसह जैन
सोशल फेडरेशनचे सदस्य संतोष बोथरा, सतिश लोढा, माणकचंद कटारिया, सुभाष
मुनोत, अनिल मेहेर, डॉ.आशिष भंडारी, व्याख्याते नितीन लाठे, अतुल शहा, शिबिराचे
तज्ञ डॉटर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.विशाल शिंदे, डॉ.रोहन धोत्रे, स्टाईन सर्जन डॉ.अमित
सुराणा, डॉ.अक्षय गादिया आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, दरवर्षीप्रमाणे सुवालाल बोथरा व बोथरा
परिवाराच्यावतीने आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरासाठी सहकार्य केले जात आहे.
या शिबिरांमध्ये अहिल्यानगरसह पुणे, बीड, संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यातील
रुग्ण आरोग्याच्या विविध समस्या घेऊन येत असतात. येथे गुणवत्तापूर्वक व आधुनिक
पद्धतीने उपचार केले जात असल्याने या आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना मिळतो.
गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया क्वालिटीचे
ईप्लांट वेगवेगळ्या कंपनीकडून मागविले
जातात. रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा
अल्पदरात मिळावी. यासाठी जैन सोशल फाउंडेशनचे सदस्य कार्य करीत आहेत. ना
नफा ना तोटा हा उद्देश ठेवून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य अखंडपणे सुरू
आहे.
मोहक बोथरा म्हणाले, आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या आशीर्वादाने
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा केली जात आहे. येथे
रुग्णांची योग्य तपासणी करून, आधुनिक पद्धतीने व अचूक निदान करून उपचार
केले जातात. बोथरा परिवाराला या शिबिरात सेवा करण्याची संधी जैन सोशल
फेडरेशनने दिली आहे.
डॉ.अमित सुराणा म्हणाले, पुणे मुंबई येथे अत्यंत खर्चिक व महागडी अशी
उपचार पद्धती आहे. मणयाच्या शस्त्रक्रियेसाठी कमीत कमी तीन लाख रुपयांचा
खर्च पुणे, मुंबई येथे रुग्णांना करावा लागतो. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मणयाचे
बीन टायाची शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केली जाते.
आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या पुण्यतिथी निमित्त शिबिराच्या माध्यमातून मोठ्या
प्रमाणात रुग्णांची सेवा होत आहे.
डॉ.विशाल शिंदे म्हणाले, ज्या रुग्णांचे गुडघे वाकडे झाले, बाक आला अशा
रुग्णांना शस्त्रक्रिया केली जाते. पुणे येथे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कमीत कमी अडीच
लाख रुपये खर्च येतो. तर आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया
केली जाते. शिबिराच्या माध्यमातून अतिशय अल्पदरात व कमी खर्चात आनंदऋषीजी
हॉस्पिटलमध्ये होणारी आरोग्य सेवेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा.
डॉ.आशिष भंडारी यांनी सुत्रसंचालन केले. अनिल मेहेर यांनी आभार मानले.
अस्थिरोग तपासणी शिबिरात २२२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 

नेप्ती गावच्या विकासासाठी कटिबद्ध

माजी सरपंच संजय जपकर यांचे प्रतिपादन; नेप्ती फाटा रस्त्याच्या डांबरीकरणास अखेर प्रारंभ

नगर – विकास कामाच्या माध्यमातून गावाच्या जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे जनतेने आमच्या हातात
सत्ता दिली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार विविध भागातील प्रश्न मार्गी लागले जात आहेत. विकास कामामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. सर्व माध्यमातून गावाला निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता आपण अहोरात्र गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माजी सरपंच संजय जपकर यांनी केले आहे.

नगर तालुयातील नेप्ती येथील नेप्ती फाटा ते गाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत होती
अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी सरपंच संजय आसाराम जपकर, संजय अशोक जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर यांच्या हस्ते करण्यात आला. या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यासाठी खा.निलेश लंके यांनी ७५ लाख रुपये निधी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाची मोठी दुरावस्था झाली होती. हा रस्ता गावाकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग असल्याने या
मार्गावरून मोठी वाहतूक होत होती. हा रस्ता खराब असल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून अनेकांकडे करण्यात आली होती पण कोणीही या मागणीचा विचार विचार केला नाही. पण खा.निलेश लंके यांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे.

जनतेने मोठा विश्वास ठेवून मला उपसरपंच केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम माझ्या
कार्यकाळात होत आहे याचा मला अभिमान आहे. जनतेच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणार आहे. विकास कामे ही करणार आणि जनतेला सन्मानही देणार आहे. जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला
आहे. त्याला थोडाही तडा लागून देणार नाही. जनतेने गावाचा विकास करणार्याच्या मागे उभे राहावे असे आव्हान उपसरपंच एकनाथ जपकर यांनी केले आहे. यावेळी माजी उपसरपंच बाबासाहेब होळकर, समता परिषदचे तालुकाध्यक्ष राम
दास फुले, चेअरमन विलास जपकर, अशोक जपकर, कारभारी जपकर, ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद, दादू चौगुले, संभाजी गडाख, उमर सय्यद, अतुल जपकर, माजी सरपंच दिलीप होळकर, सुधाकर कदम, शिवाजी होळकर, देवा होले, वसंत पवार, ज्ञानेश्वर जपकर, मल्हारी कांडेकर, नंदू जाधव, नितीन कदम, बाळासाहेब बेल्हेकर,
नानासाहेब कदम, मनोहर ठुबे, मोहन ठुबे, ठेकेदार बाळासाहेब पानसंबळ, अशोक सोनवणे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होत

आई-वडिलांसोबतचे कनेशन सुधारण्याची आवश्यकता

नगर – आपले आई-वडिलांशी अतुट नाते कायम असले पाहिजे. त्यांच्याजवळ जाऊन घट्ट मिठी मारता येईल असे स्नेहबंध आई-वडिलांशी असले पाहिजेत. आजच्या पिढीने आई-वडिलांसोबतचे कनेशन सुधारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक प्रो.नितीन लाठे (मुंबई) यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ’आयुष्याचे गणित’ या विषयावर गुंफताना आनंदधाममध्ये ते बोलत होते.
सौ.मनिषा लोढा व कुंदन कांकरिया यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. सरोजताई कटारिया यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. लाठे पुढे म्हणाले, आपल्याला जन्म देणारी आई प्रेमस्वरूप असते आणि वडिल शक्तिस्वरूप असतात. आईचे प्रेम आणि वडिलांची शक्ती ज्यांच्या सोबत आहे त्यांना जीवनातील आनंद सहजपणे मिळत राहातो. एकत्र कुटूंबाची आपली  परंपरा आहे. अलिकडे  कुटूंब विभक्त झाली तरी वर्षामधून एकदा आपल्या परिवारातील सर्वांना एकत्र आणून देवदर्शन  करावे.  सर्गात रमावे. परिवारासोबतचा आनंद अवर्णनीय असतो जो इतर कोणाच्याही सोबत राहून मिळवता येत
नाही. आपला परिवार आपल्याला आत्मविश्वास देतो. आपलेपणाचे ऋणानुबंध अधिक दृढ करतो. सुखात
सगळेच जवळ येतात. दुःखात आपला परिवारच आपल्या सोबत असतो.
नातेसंबंध चांगले रहाण्यासाठी आपलेपणाने स्तुती करा. आपण कोणाला दुखावले तर लगेच माफी मागा.
आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ’स्तुती करा’ आणि ’माफी मागा’ हे दोन अ‍ॅप आपल्या जीवनात डाऊनलोड
करून ठेवा. आपले आयुष्य आनंददायी होत असल्याचे अनुभवाल. मीपणा कायम बाजूला ठेवा. आपले जीवन केव्हा
संपणार? हे माहित नसते म्हणून सॉरी-थॅयू लगेच म्हणत जा. आपल्या भावना व्यक्त करायला शिका.
आई-वडिल देवाघरी गेल्यावर मी आई-वडिलांची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटून पश्चात्ताप यायला
नको. आपल्याला निरपेक्षपणे जीव लावणार्‍या चांगल्या मित्रांच्या संपर्कात रहा. आपला कोठे अपमान झाला. आपण कोठे
हरलो. आपल्या हातून पाप घडले तर हे सांगायला चांगला मित्र सोबत हवाच. स्वतःसाठी वेळ
काढा. देवाच्या इच्छेशिवाय या विश्वातील पानही हलत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. देवाला केंद्रस्थानी ठेवून आपला धर्म सांभाळत काम करावे. संघर्षाला धीराने सामोरे जावे. आव्हानं स्विकारावीत. सकारात्मक भूमिकेतून सदैव कार्यरत
रहावे. आपला विचार-बोली आणि कृती एकच असावी. जीवन खुप सुंदर आहे. जीवनातील आनंद घेत जगावे,
असे विविध उदाहरणे देत स्लाईड शो आधारे श्री. लाठे यांनी सांगितले. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी
ओम…या भक्तीगातासोबत भजन गात श्री. लाठे यांनी व्याख्यानाचा समारोप केला. संगीताच्या साथीने झालेल्या
भजनावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत चांगलाच ठेका धरला. शहरासह उपनगरातील ज्येष्ठ स्त्री-पुरूष उपस्थित
होते. सिमरन मुनोत यांनी आभार मानले.

इलेट्रिक वाहनांवरील ‘करा’ला तीव्र विरोध, इतर राज्यांत कर नाही, मग महाराष्ट्रातच का?

नगर – जगभरासह देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेट्रिक
कारची मागणी वेग धरू लागली असताना महाराष्ट्रात मात्र राज्य
सरकारकडून इलेट्रिक गाड्यांच्या मागणीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न
सुरु असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात ३० लाख
रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेट्रिक वाहनांवर ६ टक्के मोटार वाहन कर
लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयाला आमदार सत्यजीत तांबे यांनी
जोरदार विरोध केला असून, हा कर अन्यायकारक असल्याचा आरोप केला
आहे.
आ. तांबे यांनी विधीमंडळात सरकारला प्रश्न विचारला की, देशातील इतर
कोणत्याच राज्यात इलेट्रिक वाहनांवर कर नाही, मग महाराष्ट्रातच का? तसेच,
केंद्र सरकार प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी इलेट्रिक
वाहनांना प्रोत्साहन देत आहे, अशा स्थितीत महाराष्ट्र सरकारने कर लावणे म्हणजे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला विरोध करण्यासारखे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत इलेट्रिक वाहनांवर कोणताही
कर लावलेला नव्हता. मात्र, नव्या निर्णयामुळे ही वाहने ६ टक्क्यांनी
महाग होणार आहेत. महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या
प्रमाणावर कार्यरत आहे, त्यामुळे या निर्णयाचा उद्योगावरही परिणाम होईल,
असे आ. तांबे यांनी सांगितले.
तसेच, राज्यात इलेट्रिक चार्जिंग स्टेशनची सुविधा अपुरी आहे. केवळ
मुंबई महापालिकेने पार्किंगमध्ये चार्जिंग पॉइंट सक्तीचे केले असले तरी इतर
ठिकाणी चार्जिंग स्टेशन नाहीत. अशा परिस्थितीत सरकार या करातून चार्जिंग
सुविधांचा विकास करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात सर्वाधिक ईव्हींची विक्री
महाराष्ट्रात २०२४ मध्ये १५,०४४ इलेट्रिक कार विकल्या गेल्या आहेत. भारतातील
एकूण इलेट्रिक कार विक्रीपैकी १५ टक्के विक्री महाराष्ट्रातून होते. या पार्श्वभूमीवर राज्य
सरकारने ६ टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.