नगर – विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच इलेझा २०२५ हा तीन दिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. यावेळी मुख्य अतिथी संस्थेचे डायरेटर टेनिकल प्रा.सुनिल कल्हापुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय नाईक, ई अॅण्ड टी.सी.व्ही.एल.एस. आय.डिझाईन अॅण्ड टेनॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.
अनिता पाटील उपस्थित होते. प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबत विविध सह अभ्यासकम आणि अभ्यासे तर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे मनोगत व्यक्त करताना प्रा. सुनिल कल्हापुरे यांनी सांगितले. या तीन दिवसीय तांत्रिक महोत्सवामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन,
वेब डिझाईनींग, पोएट्री, रांगोळी, स्केचींग आणि ड्राईंग या स्पर्धांमुळे मुलांचे डिझाईन कौशल्य आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो. तसेच डिबेट स्पर्धेमुळे मुलांचे संवादकौशल्य, आंतरव्यक्ती कौशल्य, नेतृत्वकौशल्य, सादरीकरण, विश्लेषणात्मक आणि तार्किक कौशल्य यासारख्या विविध कौशल्यामध्ये वाढ होते. तसेच क्वीझ आणि पाल स्पर्धांमुळे मुलांची तार्किक विचारसरणी सुधारण्यास मदत होते. त्यांची माहिती साठविण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्य सुधारते. गेमींग स्पर्धेमुळे मुलांचा ताण कमी होणे, यशाची भावना निर्माण होणे आणि संज्ञात्मक कौशल्य सुधारते
इ. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. या महोत्सवाम ध्ये सर्व अभियांत्रिकी विभागातील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर महोत्सवाचे समन्वयक म्हणून ई अॅण्ड टी.सी. विभागातील
सर्व शिक्षक कर्मचार्यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ई अॅण्ड टी.सी अभियंता विद्यार्थी
संघटनेचे विद्यार्थी कु. सामिया शेख, कु. जान्हवी अटकरे, यश नैयर, कु. श्रेया अंबाडे, कु. अनुपमा कहांडळ,
वैभव तुवर, तेजस तरवडे, शुभम अत्रे, कु.श्रेया कोरे, कल्पित जरे, गौरी उगले, चेतन रासणे, कोमल आडसूळ यांनी परिश्रम घेतले. या सर्वांचे ई अँण्ड टी.सी. व्ही.एल.एस.आय. डिझाईन अॅण्ड टेनॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.अनिता पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमातील उपक्रमाबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील, डायरेटर जनरल डॉ.पी.एम. गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.





