जय आनंद महावीर युवक मंडळाचे कार्य प्रशंसनीय

नगर – शहराच्या नवीपेठमधील जय आनंद महावीर युवक मंडळाची ही महाअन्नदानाची सेवा मी गेल्या अनेक वर्षांपासून पहात आली आहे. भुकेलेल्यांना अन्न देण्याची शिकवण  आनंदऋषिजींनी दिली. त्याप्रमाणे हे मंडळ गोरगरीब, कष्टकरी, गरजू, वृध्द, निराधार, अपंग यांच्यासह  हजारो भाविकांना दर्जदार भोजन देत आहे. मंडळाचे हे कार्य प्रशंसनीय
आहे, असे अ.ए.सो.च्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी सांगितले.
मानवसेवेलाच ईश्वरसेवा मानून सर्वांना संस्कारांची शिदोरी देणार्‍या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने सालाबादप्रमाणे यंदाही अन्नदान (महाभोजन) कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी महावीर कन्स्ट्रशन्सचे राजेश भंडारी, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, ग्राहक भांडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, उद्योजक दिपक कासवा, मोहनलाल मानधना, जितेंद्र बिहाणी, सचिन भंडारी, सचिन मुनोत, नेवासकर परिवारातील
ज्येष्ठ शरद मुनोत, मिनाताई मुनोत यांच्यासह मर्चन्टस्  बॅकेतील संचालक उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले, आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या शिकवणुकीप्रमाणे जय आनंद महावीर युवक मंडळाने ३० वर्षांपूर्वी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला. दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. पुरीभाजी, बुंदी, मसालेभात असा  स्वादिष्ट मेनू असतो. वयोवृध्द, अपंगांना खाली मांडी घालून भोजन करताना त्रास होतो हे लक्षात घेवून भोजनासाठी टेबल खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात येते. संपूर्ण स्वयंपाक हायजिन पध्दतीने स्वच्छता राखून आचारी पवन खंडेलवाल हे महाप्रसाद तयार करतात. बाबावाडी, स्नेहालय, अनामप्रेम, मूकबधीर
विद्यालय यांच्यासह अनेक संस्थांना भोजन पाठवले जाते. हजारो लोक या महाअन्नदानाचा लाभ घेतात. शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी मंडळाचा हा उपक्रम म्हणजे संतांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून केलेली महान समाजसेवाच होय, असे सांगितले. मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा यांनी स्वागत करताना या कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते
तब्बल महिनाभर परिश्रम घेतात, असे सांगितले. बाबालाल गांधी यांनी आभार मानताना स्व.योगेश (गुड्डू) मुनोत
यांच्या स्मृतींना उजाळा दिला असता उपस्थितांचे डोळे पाणावले. नवीपेठमध्ये प्रशस्त मंडपात सुरू झालेल्या
भोजन प्रसादाच्या पंगती सामाजिक समरसतेचे आणि सर्वधर्मियाच्या एकतेचे दर्शन घडवणार्‍या ठरल्या.

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार अहिल्यानगर महानगरपालिकेत २० कर्मचार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

नगर – महानगरपालिकेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा केला असल्यामुळे त्याला यश आले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्मचार्‍यांनी देखील चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढावा. महापालिका प्रशासनाने देखील उत्पादनाची साधने शोधून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत. महापालिका
संस्था ही कर्मचार्‍यांची असून सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे संस्था हीच कर्मचार्‍यांची ओळख आहे. मनपा कर्मचारी युनियनने देखील महापालिका कर्मचार्‍यांची बैठक घेऊन कामकाज करण्याचे आदेश द्यावे, संस्था वाढीसाठी पुढाकार
घ्यावा. पूर्वी मी महापौर असताना शहरात २ टाईम साफसफाई करण्यात येत होती मात्र आता बोजबारा उडाला आहे. अधिकारी येथील आणि जातील मात्र कर्मचार्‍यांनी महापालिकेशी प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे. कर्मचार्‍यांना वारस हक्काच्या नोकर्‍या मिळाव्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला असल्यामुळेच ते शय झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार २० कर्मचार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लाहारे, युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव अनंद वायकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़, ऋषिकेश भालेराव, भरत सारवान, बाबासाहेब राशिनकर, बाळासाहेब व्यापारी, महादेव कोतकर, दिपक मोहिते आदी उपस्थित होते आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की महापालिकेची
आर्थिक परिस्थिती बिकट असून जीएसटी पोटी राज्य सरकारकडून १२ कोटी रुपये मिळत असून सातवा वेतन आयोग लागू झाला असल्यामुळे महापालिकेला १ कोटी ७५ लाख रुपये भरावे लागतात. वर्षाकाठी २० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येत आहे. कर्मचार्‍यांनी देखील संस्थेच्या हितासाठी काम करावे असे ते म्हणाले. अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले की हाय कोर्टाच्या आदेशानुसार कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी युनियनच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी देखील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विषय
मार्गी लावून घेतला. आपल्या महापालिकेमुळे संपूर्ण राज्यातील मनपाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. आमदार संग्राम जगताप हे सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून प्रश्न मार्गी लावीत असतात त्यामुळे त्यांना महापालिकेत
दयावान म्हटले जाते. कर्मचार्‍यांनी देखील आपली संस्था आपली नोकरी याकडे लक्ष द्या कारण नसताना राजकारण आणू नका. आपण सर्वजण मिळून महापालिकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करून प्रशासनाला हातभार लावून चांगल्या कामाच्या
माध्यमातून मदत करू असे ते म्हणाले. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचार्‍यांच्या वारसाच्या नोकर्‍या प्रलंबित होत्या अनेक दिवस हायकोर्टामध्ये केस सुरू होते. युनियनच्या पाठपुराव्याला यश आले आणि आमदार संग्राम जगताप यांनी देखील राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे कामगारांना सेवेत घेण्यासाठी शासनाने
मंजुरी दिली. त्यामुळे २० कर्मचार्‍यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती कामगार युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी सांगितले.

आनंदऋषिजींनी दाखवलेल्या मार्गानेच जीवनाचे सार्थक

तुम्ही-आम्ही रामराज्य निर्माण करावे म्हणून प्रभू श्रीरामच वाट पहाताहेत : शंकर महाराज शेवाळे यांचे प्रतिपादन

नगर – तुम्ही-आम्ही रामराज्य निर्माण करावे म्हणून प्रभू श्रीरामच वाट पहात आहेत. तीर्थंकरानंतर तीर्थंकर झाले नाहीत. रामदास स्वामी, ज्ञानेश्वर, तुकोबा, शिवाजी महाराज परत झाले नाहीत. रामराज्य निर्माण करण्यास प्रभू श्रीराम परत येणार नाहीत तर त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्यालाच रामराज्य निर्माण करावे लागणार आहे, असे प्रतिपादन शंकर महाराज शेवाळे यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यान- मालेचे समारोपाचे पुष्प ’थोडं जगणं समाजासाठी’ या विषयावर गुंफताना आनंदधाममध्ये ते बोलत होते. सौ.मनिषा लोढा व सुदर्शन लोढा या माय-लेकांच्या हस्ते वत्यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमाला सुरू झाल्यापासून वृत्तपत्र प्रसिध्दीची सेवा निरपेक्षपणे करणारे पत्रकार मिलिंद महाराज चवंडके यांना शंकर महाराज शेवाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सौ.मनिषा लोढा यांना जैन सोशल फेडरेशनच्यावतीने डॉ.प्रकाश कांकरिया, सुरेश कटारिया व दिलीप गुगळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सौ.सरोजताई कटारिया यांनी सूत्रसंचालन केले.

श्री.शेवाळे पुढे म्हणाले, माणसांची खुप गर्दी झालीय या गर्दीतला माणूस शोधण्याची वेळ आलीय. डॉटर मंडळी आपल्याला समजणार नाही अशा लिपीत मेडिकलवाल्यास लिहितात की, मी लुटले तूही लुट! अशी परिस्थिती आहे. सर्वस्वाचा त्याग करून एकभुक्त रहात समाजासाठी जगा. पायाखाली मुंगीही मरू नये, याचा विचार करणारी आपली संस्कृती आहे, याचा विसर पडू देवू नका. नवकार महामंत्राचा जप करत जे समाजासाठी जगले त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र
दरवळतो आहे. आपण कोठून आलो? आपल्याला कोठे जायचे? याचे आत्मचिंतन करा. आनंदऋषिजींनी दाखवलेल्या मार्गाने गेलात तर जीवनाचे सार्थक होईल. आज झोपेच्या गोळ्या न खाता झोपणारा आणि घड्याळाचा अलाराम न लावता उठणाराच सुखी आहे. आपलं जीवन तपासून पहा. पिढ्यान् पिढ्या पैसा कमावणारे पैशांचा उपभोग स्वतःसाठीही घेत नाहीत. कोट्यावधींचा खर्च करून अलिशान बंगले उभारतात पण त्यात शांतपणे जगण्याचा आनंद घेत नाहीत.
आपली मनोभूमिका बदला. संकुचित जगणं सोडा. माझी संपत्ती, माझे सौंदर्य हे बाजूला ठेवून चंदनासारखे झिजा. भुकेलेल्यांना अन्न द्या. आपले नाव आगी लावणार्‍यांच्या यादीत आहे की विझवणार्‍यांच्या यादीत ते पहा. अलिकडे कुटूंब व्यवस्था बिघडत चाललीय. एकत्र राहूनही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. सरडा धोका पाहून रंग बदलतो तर माणूस मोका पाहून रंग बदलतो आहे. आईचे दूध पोषण आहार आहे हे सरकारला सांगावे लागते कारण सुशिक्षित आईला कळत नाही, अशी आई मुलं काय घडवणार? आपणं टॉयलेट-बाथरूम कसं साफ करावं, हे टिव्हीला सांगावं लागत, हे
आपल्या घराचं दुर्दैव म्हणावं लागेल. टिव्हीवरील सगळ्या जाहिराती फसव्या असतात. मोबाईलमुळे आपले डोळे निकामी होत चालले कर्णबधीरता वाढत चालली, हे कुठेतरी थांबवा. आपणं स्वतःसाठी आणि समाजासाठी जगणं विसरत चाललो
आहोत. माझं ते माझंच आणि दुसर्‍याचंही माझंच म्हणणारांनी आपण किती दिवस जगणार? याचा गंभीरतेने विचार करावा. आपली चिता पेटण्यापूर्वीच आपल्यातील चेतना जागृत करा. मृत्यू होण्याअगोदर थोडं स्वतः साठी थोडं इतरांसाठी जगा, अस सांगताना श्री.शेवाळे यांनी दिलेली विविध उदाहरणे उपस्थितांना आत्मचिंतन करायला लावणारी ठरली. व्याख्यानमालेच्या समारोप सोहळ्यास शहरासह उपनगरातील स्त्री-पुरूष उपस्थित होते. युवतींची संख्या लक्षणीय होती. सीमा मुनोत यांनी आभार मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सपना कटारीया, सिमरन मुनोत, प्रतिक संचेती आदींनी
परिश्रम घेतले

गायरान जमिनीवर अनेक वर्षापासून राहत असलेले कुटुंबीयांचे अतिक्रमण रद्द करून जमीन नावावर करा

नगर – मौजे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील
आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षापासून गायरान जमिनीवरचे अतिक्रमण न
हटवता तिथेच कायमस्वरूपी करून गायरान जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी
आदिवासी पारधी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कारल्यासमोर बोंबाबोंब आंदोलन
करण्यात आले. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले,
अध्यक्ष राजेंद्र काळे, अविनाश चव्हाण, मुकेश भोसले, आसाराम काळे, रामसिंग
भोसले, मनमास भोसले, रेवण भोसले, युवा भोसले, कानू भोसले, तेजस भोसले,
नवनाथ भोसले, अविनाश काळे, अक्षय भोसले, अंकुश काळे आदीसह कुटुंबीय
उपस्थित होते.

पुढे नियोजनात म्हटले आहे की, आदिवासी पारधी समाज संघटना ही गेल्या
अनेक वर्षांपासून लडत असून न्याय हक्क व आदिवासींच्या मुलांचे शिक्षण करीत आहे.
त्यामुळे मौजे लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असून हे गेली ५० ते ६० वर्षांपासून
गायरान जमीन कसुन खात आहे. त्या जमिनीमध्ये कपाशी, आंब्याचे झाडे, बोर व अनेक
झाडे असुन शेती करत आहे व ही गायरान जमीन ९ कुटुंब मिळून कसत आहे. काही
दिवसापूर्वी तेथील ग्रामसेवक सरपंच यांनी मिळून एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
सौर प्लांट केला व दुसरा सौर प्लांट करण्यासाठी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी व्यंकनाथ
येथील ग्रामसेवक यांनी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याचे नोटीस बजावलेले आहे
व नोटीस बजावून फार मोठा अन्याय केलेला असुन ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आदिवासी
पारधी समाजातील लोकांना वेटीस धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी नोटीसा
दिलेल्या आहे. हे नोटीस देऊन आदिवासी कुटुंबांना बेघर करण्यासाठी षडयंत्र रचले असून
तेथील आदिवासी कुटुंब उघड्यावर पडणार आहे. व हे अतिक्रमण नियमितकुल करण्यासाठी
वेळोवेळी शासन पत्र दिलेले आहे व त्याचे पीक पाहणी करून सातबारा नावे नोंद
करण्यासाठी वेळोवेळी निवेदन दिलेले आहे. शासनाच्या नियमानुसार व १९९० च्या
परिपत्रकानुसार गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमानकुल करून ७/१२ व
नावे नोंद करण्याचे पारित केलेले असून परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे आपणाकडे आलेले
आहे परंतु त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदरील प्रकरण प्रलंबित
पडलेले आहे. त्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंब व त्यांची घरे व मूलबाळ
उघड्यावर न आणता त्यांना सदरील जमीन वहीतीसाठी देऊन त्यांच्या नावे सातबारा
नोंद करावी व शासनाचा जो प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तातडीने रद्द
करण्यात यावा व मौजे लोणी व्यंकनाथ येथील इतर शासनाची पडीक जमीन वरती
प्रकल्प राबविण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब
आंदोलन करण्यात आले आहे.

आदिवासी पारधी कुटुंबांना बेघर करण्यासाठी षडयंत्र रुचले असून ते कुटुंबीय
उघड्यावर पडणार आहे असे न होता त्यांना तेथेच राहून देऊन शासनाच्या नियमानुसार
गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमितकूल करून सातबारा नावे नोंद करण्यात
यावी अन्यथा दुसर्‍या दिवशी मुलं बाळांसमवेत अमरण उपोषण करणार आदिवासी पारधी
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले.

रसिकोत्सव कार्यक्रम सांस्कृतिक क्षेत्रातील माईल्ड स्टोन

‘क्रेडाई’चे राज्य सचिव आशिष पोखरणा यांचे प्रतिपादन; रसिक ग्रुपचा गुढीपाडवा रसिकोत्सवाची जय्यत तयारी सुरु

नगर – रसिक ग्रुपच्या रसिकोत्सव गुढीपाडवा सांस्कृतिक  महोत्सवाने अहिल्यानगरची पूर्ण  राज्यात वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. यासाठी जयंत येलुलकर व त्यांच्या सहकारींचे काम कौतुकास्पद आहे. गेल्या २२
वर्षापासून राबवला जात असलेला हा उपक्रम नगरकरांसाठी  मोठी मेजवानी ठरत असल्याने रसिकोत्सव कार्यकम सांकृतिक क्षेत्रातील माईल्ड स्टोन ठरला  आहे, असे गौरवोद्गार क्रेडाई संघटनेचे राज्य सचिव आशिष पोखरणा यांनी काढले.
ग्रुपच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नव वर्षाच्या स्वागतासाठी अहिल्यानगरमध्ये गेल्या २२ वर्षांपासून ‘रसिकोत्सव’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार्‍या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी ४० बाय ६० फुटाचे स्टेज उभारणीच्या
कामास सुरवात झाली आहे. स्टेजच्या कामाचा शुभारंभ आशिष पोखरणा व कायनेटिक कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत गुळवे यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. यावेळी ग्रुपचे संस्थापक जयंत येलुलकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
संयोजन समितीच्या स्नेहल उपाध्ये म्हणाल्या, नगर शहराचा ऐतिहासिक व सांकृतिक वारसा जपत ही चळवळ तळमळीने पुढे नेणारे जयंत येलुलकर यांच्या पुढाकाराने व संयोजनाने नगरमध्ये होणारा रसिकोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा
गुढीपाडवा सांस्कृतिक सोहळा आहे. या सोहळ्याची नगरकर आतुरतेने वाट बघत असतात. या वर्षीही राज्यात नावाजलेले अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. प्रास्ताविकात प्रसन्न ऐखे म्हणाले, सर्वांसाठी
मोफत असलेल्या रसिकोत्सव सोहळ्यासाठी जॉगिंग पार्कच्या मैदानात स्टेज उभारणीस सुरवात झाली आहे. मैदानात सुमारे ३० ते ४० हजार प्रेक्षक बसून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटू शकतील अशी बैठक व्यवस्था येथे करण्यात येत आहे. त्याच बरोबर एलईडी स्क्रीन, आकर्षक विद्युत रोषणाईची तयारी सुरु झाली आहे. यावेळी संयोजन समितीचे सदस्य सुदर्शन कुलकर्णी, समीर पाठक, तेजा पाठक, दिपाली देऊतकर, निखिल डफळ, श्रीकृष्ण बारटक्के, मीनाक्षी पाटील, प्रशांत आंतेपेल्लू, कुणाल आंतेपेल्लू, बालकृष्ण गोटीपामूल, हनीफ शेख, स्वाती आहेर आदी उपस्थित होते.

लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात

नगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५  ते २५ मार्च या  कालावधीत अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडला. कोतवाली पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव
दराडे, पत्रकार सुधीर लंके, प्रा. डॉ. शेषराव पठाडे, शिबिर संचालिका लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर, लावणी
सम्राज्ञी आरती काळे नगरकर, मार्गदर्शक ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी, हार्मोनियम वादक लक्ष्मणराव भालेराव, लोककला अभ्यासक बाबाजी कोरडे, सिने अभिनेते मोहिनीराज गटणे, सिने अभिनेते
राधाकृष्ण कराळे आदी उपस्थित होते. प्रारंभी शिबिरार्थींनी पारंपारिक गण, मुजरा, गवळण, बतावणी व लावणी असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमानंतर सहभागी शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते
प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पत्रकार सुधीर लंके, प्रा. डॉ. शेषराव पठाडे, लोककला अभ्यासक बाबाजी
कोरडे, ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी, अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी मनोगत व्यक्त केले. नटराज
पूजन व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक शिबिर संचालिका राजश्री काळे नगरकर यांनी केले.
सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी केले. आरती काळे नगरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिबिरार्थींचे पालक
व रसिक उपस्थित होते.

स्वस्थ जीवन आणि रोग मुक्तिचा संदेश देणार्‍या व्याख्यानाने अहिल्यानगरमधील श्रोते भारावल

नगर – निसर्गाच्या सान्निध्यात राहून शुध्द शाकाहार केल्यास कोणताही आजार आपल्या जवळ फिरकूही शकत नाही, हे अतुल शहा (मुंबई) यांनी ठामपणे आणि स्वानुभवातून सांगितले. स्वस्थ जीवन आणि रोग मुक्तिचा संदेश देणार्‍या या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व
१२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या
प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प ’आहार आणि आरोग्य’ या विषयावर गुंफताना
आनंदधाममध्ये ते बोलत होते. निखिलेंद्र लोढा व सुरेश कटारिया यांच्या हस्ते वत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शहा पुढे म्हणाले, आपल्या आरोग्याबाबत आपण सदैव जागृत राहिले पाहिजे. आपला आहार व विहार निरोगी जीवनाची गुरूकिल्लीच आपल्या हाती देतो. मेडिकल सायन्सकडे उपाय नसलेला आजार मला
झालेला असताना मी आहार शुध्द शाकाहारी घेऊन आजारावर यशस्वीपणे मात करू शकलो. भगवंताने
बनवलेले आपले मानवी शरिर अद्भूत आहे. ते आतूनच आपोआप दुरूस्त होत जाते त्याकरिता औषधं घ्यायची
गरज नसते. ९०% आजार शरीरच बरे करते. आजार एकदम होत नाहीत. त्याची लक्षणे ५ ते १० वर्षे अगोदर
दिसतात. त्याकडे दुर्लक्ष केले तरच आजाराची एन्ट्री होते.

जंगलातील पशु-पक्षी आजारी पडले तर कोणता डॉटर त्यांच्यावर उपचार करतो? असा प्रश्न करून त्यांनी उपस्थितांचे वास्तव परिस्थितीकडे लक्ष वेधले. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या शाकाहारी भोजनापासून माणूस भटकल्याने आजारी पडू लागला. नैसर्गिक भोजन हे अमृत आहे. पृथ्वी (अन्न), जल (पाणी), अग्नि (सूर्यकिरण), वायू (श्वास) आणि आकाश (उपवास) या पंचतत्वांचे संतुलन आपले स्वास्थ उत्तम ठेवते. हे संतुलन बिघडले की माणूस आजारी
पडतो. शरिराच्या क्षमतेपेक्षा जास्त खाणारे सारखे आजारी पडतात. भगवान महावीरांनी सांगितले आहे
की एका हातावर बसेल इतकेच खा. पाणी शरिराची सफाई करते म्हणून थंडीत दररोज दीड लिटर
आणि उन्हाळ्यात दररोज अडीच लिटर पाणी पिलेच पाहिजे. तसेच नियमितपणे किमान २०
मिनिटं प्राणायाम केला पाहिजे. आठवड्यातून किमान एक तास सकाळच्या उन्हात बसलेच
पाहिजे. प्राण्यांमध्ये सर्वांत जास्त बुध्दीमान मानव प्राणी असूनही निसर्गाची साथ सोडत चालल्याने
आणि काय खावे? हे न कळल्याने आजारी पडू लागला आहे. अल्पोपहार करताना सॅलड खा. फलाहार करा.
भाज्यांचा रस काढून प्या. आज भोजन म्हणजे जीभेचे चोचले आणि मनोरंजन झाले आहे. सारखे खाणे आणि
जरूरी नसताना भरपेट जेवणे यामुळे पोट बाहेर येते. पाणीही न पिता उपवास करा. वर्षभरात एकदा आठवडाभर
उपवास करा आरोग्य सुधारेल. आजारमुक्त रहाल. आपल्या देशाची प्रगती आपण आजारमुक्त रहाण्यातून होणार आहे.
एकमेव भारत देशात ताजे भोजन मिळते. चांगले खा. मस्त रहा. आजारमुक्त जीवनाचा आनंद घ्या, असे श्री. शहा
यांनी विविध उदाहरणे देत स्लाईड शो आधारे सांगितले. व्याख्यानास शहरासह उपनगरातील ज्येष्ठ स्त्री-पुरूष
उपस्थित होते. सरोजताई कटारिया यांनी आभार मानले.

श्री संत गोरोबा काकांचे मंदिराची प्रास्तावित कमानची जागा बदला अन्यथा महाराष्ट्र कुंभार महासंघ व समाज संघटनेचे २ एप्रिलला उपोषण

शासन स्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदनाद्वारे इशारा

नगर – महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व कुंभार समाज संघटना अहिल्यानगरच्या वतीने श्री क्षेत्र तेर (जि. धाराशिव)
येथील श्री संत गोरोबा काकांचे मंदिराची प्रास्तावित कमानची (महाद्वार) जागा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासकीय स्तरावर हा प्रश्न न सुटल्यास जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांच्या वतीने २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालया
समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व कुंभार समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष
डॉ. अशोकराव सोनवणे, सरचिटणीस विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष नितीन घोडके, पांडुरंग क्षीरसागर, गणेश डेंगळे, कैलास राऊत, भगवान खटावकर, रवी देशमुख, कुमार सुसरे, सागर राजापुरे, नितीन राजापुरे, संतोष मेहेत्रे, विठ्ठलराव मोरे, भरत जगदाळे, भानुदास गोरे, सुभाष जोर्वेकर, विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

मौजे तेर (जि. धाराशिव) येथील श्री संत गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्टचे परिसरात पाण्याच्या टाकीजवळ (महाद्वार) कमानच्या कामाचे उद्घाटन आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. परंतु या ठिकाणी पाण्याची टाकी व पुढील जागा शिल्लक आहे. त्यामुळे ती कमान मुरुड रस्त्यालगत जागेत करण्यात  यावी, अशी मागणी अहिल्यानगर कुंभार समाजच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच श्री संत गोरोबा काकांच्या जुने मंदिराचे पूर्व बाजूच्या भिंतीचे काम अनेक वर्षापासून अद्याप पर्यंत झालेले नाही. त्यामुळे जे महाद्वाराचे काम आहे ते काम दक्षिण बाजूस न करता पूर्व बाजूस करावे.
पूर्व द्वारातून बाहेर आल्यानंतर समोरच मागे पत्रव्यवहार करून सुद्धा शौचालयाचे काम मंदिराच्या पूर्व बाजूस केलेले आहे, तरी ते शौचालय पाडण्यात येऊन ते मंदिराच्या दक्षिण बाजूस करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. या मागणीसाठी धाराशिव येथे माजी सरपंच महादेव खटावकर २ एप्रिल रोजी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ व सर्व कुंभार समाज अहिल्यानगरच्या वतीने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन अहिल्यानगरच्या
जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पाणीपट्टी वाढवली पण वाढीव रक्कम बजेटमध्ये नाही दाखवली

नगर – स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा
कडाडून विरोध असताना महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत
डांगे यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून आपला प्रशासकीय
अधिकार वापरत पाणीपट्टीत वाढ केली. थोडी थीडकी नाही तर तब्बल
९०० रुपयांनी वाढ करून पंधराशेची २४०० केली. नगरकरांवर हा
जिझिया कर मेहरबान आयुक्तांनी लादला. पण चालू बजेटमध्ये ही वाढीव
पाणीपट्टी दाखवली गेलीच नाही त्यामुळे यावर्षी महानगरपालिकेला वाढीव
पाणीपट्टी आकारता येणार नाही. कारण की पाणीपट्टीची डिमांड सन
२०२३-२४ या आर्थिक वर्षात ३० कोटी करण्यात आली होती. आता
चालू अर्थ संकल्पात ९०० रुपयांनी वाढ केलेली आहे ती रक्कम ५ कोटी
३१ लाख रुपयांनी वाढते. परंतु आयुक्त साहेबांनी १३ मार्च रोजी एका
तासात स्थायी समिती आणि महासभा घेऊन पाणीपट्टी वाढीव जाहीर
केली. नवीन अर्थसंकल्पात ३५ कोटी ३१ लाख रक्कम दाखवली गेली पाहिजे होती,
प्रत्यक्षात ही रक्कम ३० कोटीच दाखवण्यात आली. त्यामुळे पालिकेला ती वाढीव रक्कम
वसूल करता येणार नाही त्याबद्दल आयुक्तांचे आभार, असे पत्रक दीप चव्हाण यांनी
काढले आहे.
चालू बिलामध्ये वाढीव पाणीपट्टी बजेट सादर आणि मंजूर करताना ती दाखवलेली
नाही. त्यामुळे पालिकेला वाढीव दराची पाणीपट्टी आकारता येणार नाही त्याबद्दल चव्हाण
यांनी आभार व्यक्त केले आहे. पालिका प्रशासन महानगरपालिका अधिनियमाच्या
आधारे नेमून दिलेल्या कायद्यानुसार चालते. आता बजेटमध्ये वाढीव पाणीपट्टीला
मंजुरी घेतलीच नाही तर मग नियमाप्रमाणे पाणी पुरवठा विभागाला वाढीव दराने ती
आकारण्याचा अधिकार उरत नाही.
नगरकरांचे दुर्दैव २००३ मध्ये तत्कालीन नगरपालिकेची महानगरपालिका झाली. तेव्हा पालिकेवर
प्रशासक आला. त्यावेळी राजगोपाल देवरा यांनी पाणीपट्टी ती वाढवली. त्यावेळी ती
आठशे रुपये होती.
२०१६ मध्ये पालिकेला राहुल द्विवेदी यांच्या रूपाने दुसरे प्रशासक लाभले. तेव्हा
त्यांनी आपला अधिकार वापरून ८०० ची पाणीपट्टी पंधराशे केली. आता तिसर्‍यांदा
प्रशासक यशवंत डांगे लाभले. तेव्हा १२ मार्च रोजी ती वाढवली.
वास्तविक हा ठराव पालिकेच्या महासभा क्रमांक ३१, प्रशासक ठराव क्रमांक
१०८, हा दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजीच मंजूर करण्यात आला पण या उल्लेख
कोठेच नाही. १२ मार्च रोजी झालेल्या दोन्ही सभांमध्ये याची वाच्यता झालेली नाही.
तसेच या सभेच्या प्रोसिडिंगमध्ये फक्त आयुक्तांनी ठराव मांडला आणि तो बहुमताने
मंजूर झाला. पण याचे खंडन किंवा समर्थन, सदस्यांच्या मतमतांतराचा उल्लेख यात
नाही.
या दिवशी अजेंडा महापालिका सर्वसाधारण सभेचा काढला आणि त्यातच स्थायी
समितीची पण पण मंजुरी घेतली हे कसे एकाच दिवसात
शय होते. पालिकेचा अर्थसंकल्प यावर्षी जो मंजूर झाला
त्या अर्थसंकल्पीय सभेत सादर केलेला अर्थसंकल्प तो
पेपरात छापून येणार्‍या बातमीप्रमाणे वाचण्यात आला. त्याचे ताळेबंद
पत्रक, अंदाजपत्रके, पुस्तक जमाखर्चाचा हिशोब हे सर्व अर्थसंकल्पाचे
पुस्तक छापून कुठेच मांडला गेला नाही.
पालिकेची पाणीपट्टी जेव्हा जेव्हा तत्कालीन नगरपालिका आणि
मनपावर प्रशासक येतो तेव्हाच वाढते हे दुर्दैवी आहे.
या अगोदर जे महापौर झाले त्यावेळी त्यांनी नगरला २४ तास
दररोज पाणी मिळेल असे आश्वासन दिले होते. पण शेवटच्या झालेल्या
अर्थसंकल्पीय सभेत मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी
आपण नगर शहराला दररोज पाणी देऊ शकत नाही हे मान्य केले पण
पाणीपट्टी वाढवण्याचा हेका लावून धरला आणि तो ठराव पास देखील केला.
२०१० ला नगरकरांना दररोज पाणी मिळेल या अपेक्षेत केंद्र आणि राज्य शासनाने
फेज २ आणि २०१६ ला अमृत योजना दिली. या दोन्ही योजनेत आतापर्यंत झालेला
खर्च ३०० ते ४०० कोटी झाला आहे. त्यात टाया बांधल्या. पाईपलाईन केली.
पण टायात एक थेंब पाणी आलेले नाही. टाकलेले पाईप त्यांना गंज लागला आहे.
प्लास्टिकचे पाईप कुजलेले आहेत. रस्ते दुरुस्तीच्या कामात या पाईपची टूट फूट
झाली आहे. अनेक ठिकाणी तर पालिका कर्मचार्‍यांना ते पाईप कोणत्या रस्त्याने
टाकले हेच माहीत नाही. कारण कर्मचारी नवीन आहेत.
नगरकरांना वेळेवर पाणी मिळतच नाही आणि या दोन्ही योजना वर्षानुवर्षे चालू
आहेत. फेज टू ला पंधरा वर्षे, अमृत योजनेला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अजून
दोन्ही योजना रखडलेल्याच आहेत. असा कुठे पालिकेचा कारभार असतो का?
उपनगरात तर तीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होतो. अनेक भागात टँकर
चालू आहेत. त्यावर दरमहा अडीच कोटी म्हणजे आतापर्यंत चाळीस कोटी रुपये
खर्च झाले. मुळा आणि विळद पंपिंग स्टेशन येथे पंप वाढवून देखील टँकरमुक्त शहर
झाले नाही. हे चाळीस कोटी आणि विज बिल थकलेले तसेच सौर ऊर्जा प्रकल्पावर
केंद्राच्या निधीतून या विभागात झालेला खर्च, याचा विचार करता पालिकेचे विज बिल
शून्य व्हायला हवे होते. पालिकेच्या सर्व ऊर्जा प्रकल्पांच्या पॅनलवर मातीचा जाड थर
साचलेला आहे. मग वीज निर्मिती होणारच कशी? अनेक सौर प्रकल्प फक्त उभारून
ठेवले आहेत. ते चालू झालेलेच नाहीत किंवा त्याचं साहित्य गायब आहे. मग विज
बिल शून्य होणारच कसे? ते बिल भरण्यासाठी आपण पाणीपट्टी वाढवली. नगरकरांनी
ती मान्य देखील केली. पण आता अर्थसंकल्पातून वाढीव पाणीपट्टीचा हिशोब घेतलेला
नाही. मग ती आणखी कोणत्या अधिकारात आकारायची की एकाधिकारशाही वापरून
आपण ती आकारत राहणार? याचा आपण विचार करावा, असे त्यांनी पत्रकात नमूद
केले आहे.

शहरातील १६७२२ मालमत्ताधारकांनी घेतला महापालिकेच्या शास्ती माफी योजनेचा लाभ

सवलतीसाठी अखेरचे सात दिवस शिल्लक; सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालये, भरणा केंद्र सुरू राहणार नागरिकांनी सवलत घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, अन्यथा जप्ती कारवाई : यशवंत डांग

नगर – महानगरपालिकेने जानेवारी महिन्यापासून तीन टप्प्यात दिलेल्या शास्ती माफी योजनेमध्ये शहरातील
१६७२२ मालमत्ता धारकांनी ८ कोटी ८८ लाखांची सवलत घेऊन १७.१६ कोटींचा कर जमा केला आहे. शास्तीमध्ये ५० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी वसुली कार्यालये व भरणा केंद्र ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत  कराचा भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
महानगरपालिकेने ८ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत १०० टक्के शास्ती माफ केली होती. तर, २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. मार्च अखेरपर्यंत शास्तीमध्ये ५० टक्के सवलत दिली जात आहे. सवलत काळात थकबाकीदार करदात्यांनी ८.८८ कोटींची सवलत घेऊन १७.१६ कोटींचा कर जमा केला आहे. त्यामुळे एकूण थकबाकीपैकी २६.०७ कोटींची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे ७७ कोटींची वसुली झाली आहे. अखेरच्या सात दिवसांत अधिकाधिक वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात
येत आहे.

नागरिकांना अद्यापही ५० टक्के सवलत घेण्याचीसंधी आहे. ही अखेरची संधी असून या नंतर शास्तीमध्ये सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कर भरावा. नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. कर न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वसुली विभागाला कर वसुलीसाठी कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीदारांपर्यंत जाऊन त्यांना सवलतीचा लाभ देऊन कर वसूल करावा, कर न भरल्यास कारवाई करावी, असे आदेश यशवंत डांगे यांनी दिले आहेत